Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
। २११) तपस्विनस्ते किं कुर्यु
रपात्रं त्वन्मतश्रियः ॥ ९९ ॥ ये इत्यादि। ये एकांतवादिनः परस्मिन्ननेकांते स्खलित दोषो विरोधादिस्तस्मिन्नुन्निद्राः न्यपगतनिद्राः तदर्शने पटवः, स्वदोषभनिमीलिनः स्वस्मिन्सदायेकांते सुखनीलादेविरोधादिदोषे इभनिमीलनं येषां । यथेभः पश्यन्नपि अपश्यन्निव वर्तते तथैते स्वदोषं पश्यं. तोऽपि न पश्यंतीति । कथम्भूतास्ते ? तपस्विनो वराकाः । किं स्व. पक्षसाधनं परपक्षदूषणं वा कुर्युः ? नैव । कुतः ? अपात्रं अभाजनं ते यतः । कस्याः ! त्वन्मतश्रियः तव मतं त्वन्मतं द्वादशांगादिलक्षणं तस्य श्रीर्यथावद्वस्तुस्वरूपविवेचकत्वं तस्याः । __ मराठी अर्थः-एकांतवादी अनेकांतमतामध्ये विरोधादि दोष आहेत असे अणून ते दाखविण्यास सदा आपली तयारी दा. खवीत असतात. व शून्यकांत, सत्ताद्वैत वगैरे एकांतांतील दोषाकडे हत्तीप्रमाणे दुर्लक्ष्य करितात. जसे हत्ती पदार्थांना पहात असनही पहात नसल्याप्रमाणे दाखवितो. तद्वत् हे ए. कांतवादी देखील आपल्यामतांतील दोषाकडे पहात असूनही पक्षपातवश होऊन एकांतमतच निर्दोष आहे असे मानतात. पक्षपातग्रस्त झालेले हे एकांतवादी स्वपक्षसिद्धि व परपक्षखंडन कसे करू शकतील. असो. हे अरजिनेश ! हे एकांतवादी आपल्या द्वादशांगवर्णित पदार्थाचे निर्दोष वर्णन करण्यास अपात्र आहेत-अयोग्य आहेत. - विशेष स्पष्टीकरण--अनेकांतामध्ये विरोधादिक आठ दोष उत्पन्न होतात; यामुळे ते मत ग्राह्य नाही असे एकांतवादी लोक मणतात. परंतु विचार केला असता त्यांचे आणणे योग्य दिसत नाही. परंतु ते आठ दोष कोणते व त्यांचा अनेकांत
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org