Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
आपल्या विषयामध्ये प्रवृत्त होतो. यास्तव हे नय आपआपल्या विषयाचें मुख्य रीतीने प्रतिपादन करून इतर विषयास गौण करतात. ज्यावेळेस जो नय ज्या धर्माचे वर्णन करतो त्यावेलेस वस्तूमध्ये तो धर्म मुख्य समजला जातो व इतर धर्म गौण समजले जातात. यास्तव हे विमलनाथ ! आपल्यामतामध्ये नयांना गौणता व मुख्यता मानली गेली आहे. तसेंच हे जिनेश ! सामान्य धर्माला मुख्यता दिली झणजे विशेषधर्म हा गौण समजला जातो व सामान्यधर्माचे वर्णन करणाऱ्या नयाला त्या समयीं मुख्यता प्राप्त होते. विशेष धर्माला मुख्यता दिल्याने सामान्य धर्माला गौणता प्राप्त होते व विशेष धर्माचे वर्णन करणा-या नयांस प्रमुखत्व मिळते.
ननु सामान्यविशेषमोः कुतश्चिदपि प्रमाणादप्रसिद्धेः
__कथं ते तन्मातृकाः इत्याशंक्याह । । सामान्य व विशेष था धर्माची कोणत्याही प्रमाण ज्ञानाने अद्यापि सिद्धि न झाल्यामुळे नय या धर्माचे स्वरूप कसे जाणतात
या शंकेचे उत्तर आचार्य या श्लोकांत सांगतात. परस्परेशान्वयभेदलिगतः,
-- प्रसिद्धसामान्यविशेषयोस्तव । समग्रतास्ति स्वपरावभासकं,
यथा प्रमाणं भुवि बुद्धिलक्षणम् ॥६३॥ परस्परेत्यादि । परस्परमन्योन्यमीक्षा अपेक्षा ययोस्तौ च तौ अन्वयभेदी च सामान्यविशेषौ तयोर्लिङ्गं ज्ञानं । लिङ्ग ज्ञायते सामान्यविशेषौ येनेति न्युत्पत्तेः । तस्मात्ततः । किमियाह-प्रसिद्धेत्यादि । प्रसिद्धौ तौ च सामान्यविशेषौ च । अन्वयलिङ्गतो ह्यभेदज्ञानापरपर्यायात् सामान्यं -
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org