Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
( १७५)
स्तस्य गभस्तप: किरणाः संतानः संगत्वा भ्यास विवेकोपयोग पर मध्यानादयः तेषां तेजः प्रतापस्तगे सामर्थ्य असगघमर्कगभस्तितेजसा । यत एवं ततस्तस्मात्कारणात् । परं प्रकृष्टं । निर्वृतेर्मोक्षस्य धाम अनंतज्ञानादि तेजः । तावकं त्वदीयम् ।
मराठी अर्थ: - संपूर्ण परिग्रहांचा अभाव हाच कोणी एक ज्येष्ठ व आषाढ मासांतील सूर्य त्याच्या, निःसंगत्व, इंद्रियें तान्यांत ठेवण्याचा अभ्यास, विवेक, शुभोपयोग व परमध्यान, अशा दीप्त किरणांच्या तेजानें- उष्णतेनें, दुःखरूपी पाण्याने भरलेली, इहलोकभय, परलोकभय, मरणभय वगैरे भयरूपी लाटांच्या समूहानें हमेशा वर उसळणारी अशी ही विषय तृष्णारूपी नदी, हे जिनेश, अनंतनाथ आपण शोषून टाकली. यामुळेच अनंत ज्ञानादि चतुष्टय जें मोक्षाची प्राप्ति करून देते हंच तुझें तळपणारे तेज आहे.
ननु भगवान्स्तुतिकारिणे लक्ष्मी दन्तेऽन्यस्मै च दारिद्यमतः कथं वा ईश्वराद्विशिष्यते इत्याशंक्याह ।
भगवान् स्तुति करणाऱ्याचे मनोरथ पूर्ण करतात व आपली निंदा करणान्याचा नाश करतात तर मग वीतराग कसे व महादेव विष्णु व ब्रह्मा यांच्यापेक्षां भगवंतामध्ये काय विशेषता आहे ? याचे उत्तर पुढील श्लोकांत आचार्य देतात. सुहृत् त्वयि श्री सुभगत्वमश्नुते,
द्विषैस्त्वयि प्रत्ययवत्प्रलीयते ।
भवानुदासीनतमस्तयोरपि,
प्रभो परं चित्रमिदं तवेहितम् ॥ ६९॥
सुहृदित्यादि - सुहृद्भक्तिकरः । क ? त्वयि । किं करोति ? श्रीसुभगत्वमश्नुते । श्रीभगवं लक्ष्मीवल्लभवं अश्नुते प्राप्नोति । द्विषन्नभक्तः खयि मिथ्यादृष्टिः प्रत्यवत् प्रत्ययः क्विप् ज्ञानं वा तद्वत्पली
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org