Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
(५६) तते त्यन्त भिन्नैरनेकसुखादिपर्यायैः संबंधेन तत्रानेकत्वव्यवहारात् इति नेयायिकादयः । अत्राह मृषोपचार इत्यादि । मृषा असत्यः । कः ? उपचारो भेदान्वयज्ञानादस्खलद्भपात्तत्र भेदाभेदयोर्वास्तवयोः प्रसिद्धः । तदन्यतरापहवे दूषणमाह । अन्यतरेत्यादि । अन्यतरस्यानेकत्वस्यैकत्वस्य वा लोपेऽभावे । तच्छेषलोपोऽपि तस्माल्लुप्ताच्छषस्यान्यतरस्यापि लोप: स्यात् द्रव्यपर्याययोरन्योन्याविनाभावित्वात् । ततोऽनुपाख्यं तत्स्यात । उपाख्या एकत्वानेकत्वादिस्वभावः सा न विद्यते यस्य तदनुपाख्यं निःस्वभावमिति यावत् । तथाच अवाच्यं तत्स्यात् । स्वभावाभावेन केनचि. द्रूपेण तस्य वक्तुमशक्यत्वात् ।
मराठी अर्थ:-ही जीवादि सात तत्वे अनेक स्वभावा. ला धारण करणारी आहेत. ह्मणजे सुख, दुःख,बालपणा, कुमारावस्था इत्यादि पर्यायोकडे आपण दृष्टि फिरविली झणजे या सात तत्वांत आपल्याला अनेक धर्म आढळून येतील. तसेंच ही तत्वे एकस्वरूपाची देखील आहेत. जसें सुख, दुःख बाल्याबस्था व कुमारावस्था इत्यादि पर्यायामध्ये जीव एकच असतो कारण तो संपूर्ण अवस्थेमध्ये भिन्नपणाने दिसून येत नाही. जसे जपमाळेतील सर्व मण्यांतून एक दोरा असतो तद्वत् सर्व पर्यायामध्ये हा जीव एकच आहे. यावरून पर्यायांच्या अपेक्षेनें ही तत्वे अनेक स्वभावाने भरलेली आहेत. व द्रव्याची अपेक्षा घेतली तर ही द्रव्ये एक स्वभावी आहेत. तसेच या तत्वांमध्ये या जीवादि पदार्थांमध्ये भेद व अभेद विषयक जी दोन शाने उत्पन्न होतात ती खरी आहेत. सुख, दुःख, स्नेह द्वेष इत्यादि भिन्न भिन्न विकारांचे में शान होतें तें भेदशान होय. व सुख दुःख, वालपणा तरुणपणा इत्यादिकामध्ये मी एकच आहे असे जे ज्ञान होतें तें अभेदशान होय. जसें पूर्वी मी लहान होतो आतां मी मोठा झालो आहे. या उदाहरणांत लहान व मोठा
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org