Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
हरिहरहिरण्यगर्भादयः । परे भवतोऽन्ये क्व ? उभयत्र क इत्यनेन महदंतरं सूच्यते । किविशिष्टास्ते ? बुद्धिलवोद्धवक्षताः, बुद्धेः सकल. विषययाया लवो लेशः तेन उद्धवो गर्वो दर्पस्तेन क्षता नाशिताः संसारसरिक्लेशपातिताः । यत एवं ततस्तस्मात्कारणात्स्वनिःश्रेयसभावना. परैः स्वस्यात्मनो निःश्रेयसं निर्वाणं तस्य भावना रत्नत्रयाभ्यासः तस्या परास्तन्निष्ठास्तैः । इत्थम्भूतः बुधवेकैः बुधानां प्रवेकाः श्रेष्ठाः प्रधा• ना गणधरदेवादयस्तैः । है जिन करि विनाशक । शीतल शीतलाभिधान ईड्यसे।
मराठी अर्थः--हे जिनेश शीतलनाथ ! आपले ज्ञान परम सीमेला जाऊन पोहोचले आहे, व पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही अशा स्थितीस आपण जाऊन पोहचला आहात, अर्थात् आपण संसारातीत झालात तसेंच आपण पूर्ण सुखी झाला आहात. तेव्हां परमज्ञानी संसारातीत व सुखसागर असे आपण कोणीकडे व थोड्याशा ज्ञानाने फुरंगटलेले व ह्मणूनच भवनदीत गटंकळ्या खाणारे असे ब्रह्मा विष्णु व महेश हे कोणीकडे ! है जिनेश ! आपल्यामध्ये व या अहंमन्य कुदेवामध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे. यास्तव आत्म्यास मोक्षप्राप्ति करुन देणाऱ्या रत्नत्रयाचा अभ्यास करण्यांत तयार असलेल्या विद्धच्छेष्ठ गणधरांनी आपण नेहमी स्तविले जाता.
तात्पर्य-या श्लोकांत हरिहरादिकांना 'बुद्धिलवोद्धवक्षता . हे विशेषण दिले आहे याचा अर्थही व्यक्त केला आहे. परंतु येथे हे विशेष समजावयाचें की, ज्यास ज्ञान नाही अशा व्यतीस परिश्रमाने कोणताही विषय समजाऊन सांगितला तर त्याला तो पटतो. व. ज्याला थोडे ज्यास्ती ज्ञान. झाले आहे अशा मनुष्यास तर फारच लौकर समजाऊन सांगता येते. परंतु थोड्याशा ज्ञानाने गर्विष्ठ बनलेल्या मनुष्यास आपण
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org