Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
(११)
केवलींना भूक लागली. तर त्यांच्या अनंत सुखाचा अभाव झाला असें ह्मणावे लागेल, एवढेच नव्हे तर त्यांच्या अनन्तज्ञान व अनन्तशक्ति व अनन्तदर्शन या गुणांचाही अभाव मानाया लागेल. कारण केवली भुकेने दुःखित झाल्यामुळे त्यांच्या शक्तीचा -हास व ज्ञानाचा क्षय आणि अनन्त दर्शनामध्येही व्यत्यय होणे साहजिक आहे, यास्तव त्यांना भूक लागत नाही हे मानणे फारच सयुक्तिक व निर्दोष आहे. अन्यथा केवलीला आपल्या अनन्त चतुष्टयाला तिलाजलि द्यावी लागेल. त्याचप्रमाणे केवली हे रागद्वेष रहित असल्यामुळे देखील आहार करीत नाहीत. कवलाहार केलातर यांना सराग ह्मणावे लागेल. कारण आहार हा स्मरण व इच्छा यांनी होतो. झणजे ज्यावेळेस आठवण होते व जेवण्याची इच्छा होते त्याचवेळेस मनुष्य जेवण्यास बसतो. ब पूर्ण पोट भरल्यावर अरुचि उत्पन्न होते त्यामुळे तो जेवण आटोपतो. तेव्हां अभिलाषा अरुचि वगैरे विकार उत्पन्न झाल्यामुळे केवलीस कसे बरें वीतराग ह्मणतां येईल. यावरून केवली आहार करीत नाहीत हे सिद्ध होते. जर केवली आहार करीत नाहीत तर त्यांचे शरीर पुकळ कालपर्यंत टिकून रहाणार नाही हे मणणेही उचित नाही. बाहुबलि, भगवान् आदितीर्थकर वगैरे साधुजनाच्या शरीरांची स्थिती आहारावाचून वर्षपर्यंत टिकून राहिली असे आपण पुराणांतरी ऐकतो. यास्तव याठिकाणी शरीर टिकून राहण्याला आयुकर्मच प्रधान कारण आहे, जेवण वगैरे गौण कारण आहे. तसेंच लाभान्तराय कर्माचा अमाव झाल्यामुळे प्रत्येकसमयीं शरीर पुष्ट करणाऱ्या दिव्य परमाणूंचा सामः होऊन केवली. शरीर पुष्कळ काळ आहाराभावी देखील टिकून राहते.
असातावेदनीय कर्माच्या उदयाने भूक लागले. हा मोष्टः
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org