Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
( ४२ )
परिग्रहावर अतिशय प्रेम उत्पन्न होतें. व चौर माझ्या वस्तु चो रून तर नेणार नाहीत ना? अशा तऱ्हेच्या चिन्तेनें त्याचें मन सदैव व्याकुल असतें. तेव्हां व्याकुल झालेल्या माणसाला परम शुक्ल ध्यानाची प्राप्ति कशी बरे होईल !
यामुळे मुनि तिळमात्र देखील परिग्रह आपल्याजवळ ठेवीत नाहींत. त्यांनी एखादी लंगोटी जरी ठेविली तरी तिच्या पासून त्यांना बरेच त्रास सोसावे लागतील. ती मळाली असतां धुवावी लागेल; त्यामुळे जलकाधिक जीवांची हिंसा होईल. एखाद्यावेळेस चोराने चोरून नेल्यास मनामध्ये वाईट वाटण्याचा सम्भव आहे. ती मिळण्यासाठी श्रावकलोकापाशीं तोंड वेंगाडण्याचा प्रसंग आल्यामुळे अयाचकवृचीला तिलाञ्जलि देणे भाग पडेल. आणि हमेशा लंगोटीवर प्रेम उत्पन्न झाल्यामुळे शुक्लध्यानाची प्राप्ति होणार नाहीं. ह्मणून त्यांना दिशा
च वस्त्र आहे. याचप्रमाणे आहार करण्यासाठी आपल्याजवळ .ले कोणतेच पात्र ठेवीत नाहींत. कारण, पात्र ठेवल्यापासून देखील बरेच दोष उत्पन्न होतात. व पाणिपात्राहारवृत्ति सोडून द्यावी लागेल. पात्रामध्यें भोजन केल्यास काय दोष उत्पन्न होतो, याचेही वर्णन विद्यानन्द स्वामीनें मजेदार केलेले आहे. तें असेंः
स्वभाजनगतेषु पेयपरिभोज्य वस्तुष्वमी | यदा प्रतिनिरीक्षितास्तनुभृतः सुसूक्ष्मात्मिकाः । तदा कचिदपोज्झने मरणमेव तेषां भवेदथाप्यभिनिरोधनं बहुतरात्मसम्मूर्च्छनम् ॥ १ ॥ दिगम्बरतया स्थिताः स्वभुजभोजिनो ये सदा । प्रमादरहिताशयाः प्रचुरजीवहत्यामपि ॥ नबन्धफलभागिनस्त इति गम्यते येन ते ।
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org