________________
तीर्थंकर माहात्म्य
निर्गुण व निराकारवाल्यांची ईश्वराची व्याख्या परिपूर्ण नाहीं व हिंदूंची व्याख्या अतिव्याप्त आहे. तीमध्यें ईश्वरीयत्वाच्या विरुद्ध असलेले गुणहि आलेले आहेत. पण जैनांची ईश्वराची व्याख्या परिपूर्ण व शुद्ध आहे. प्रारंभी दिलेल्या वचनाप्रमाणे ज्या जीवानें ज्ञानावरणीय, दर्शनावरणीय, मोहनीय अंतराय अशा चार प्रकारच्या घातिकर्माचा नाश केला आहे व जो अनंतज्ञान, अनंतदर्शन, अनंतसुख व अनंतवीर्य असा अनंतचतुष्टयधारी आहे, ज्याचें शरीर सुंदर आहे
आत्मा शुद्ध आहे तो अरिहंत देव समजावा; तोच खरा बलशाली व पवित्र परमात्मा होय. तो सृष्टयुत्पत्तिस्थितिलय करण्याच्या भानगडीत पडत नाहीं व कोणा जीवांच्या पापपुण्याचा फलदाताहि बनत नाहीं. स्वतः शुद्धात्मस्वरूपी
नून इतर आत्म्यांना मात्र शुद्धस्वरूपी बनण्याचा मार्ग दाखवितो. असा उत्कृष्ट ध्येयस्वरूपी जैनांचा देव आहे व तोच तीर्थकर होय. किंबहुना जितके जीवात्मे मुक्त होऊन सिद्ध पदवीला गेले ते सर्व जैनांचे देवच होत. ते आपल्याप्रमाणेंच या भवसागरांत पडले होते; पण ते तरून गेल्यामुळे देव झाले व आपल्यासारख्या इतर सर्व प्राणिमात्रांना आदर्शरूप बनले. त्यांना आतां भक्त नाही व शत्रूहि नाही. त्यांना सर्व कांहीं सारखेच. त्यांचा आदर्श पुढे ठेऊन आपणहि त्यांच्याप्रमाणेच केव्हांना केव्हांतरी मुक्त होऊं एवढाच त्यांचा आपणांस उपयोग. इतर सिद्ध जीव आपल्या हयातीत उद्धरून जाण्यास थोड्याबहुत जीवांना कारणीभूत होतात व तीर्थकर असंख्य जीवांना मुक्त होण्यास कारणीभूत होतात हाच त्या दोहोमधील फरक. तीर्थंकरांची संख्या परिमित आहे व सिद्ध मात्र अनंत आहेत. प्रारंभी दिलेल्या दुसन्या श्लोकांत सिद्धात्म्यांचे वर्णन आहे. सर्व कर्माचा नाश करून सर्वत्र बनून जे स्वाभाविक स्थितीत शाश्वतपणे राहतात तेच सिद्ध होत, व तेच परमेश्वर होत.
तीर्थंकरांचे विशेष गुण वर वर्णिले आहेत. सामान्य जीव ज्या मार्गानें सिद्ध बनतो त्याच मार्गाने तीर्थंकरहि सिद्ध बनलेले असतात, व सिद्ध केवळी बनल्याशिवाय तीर्थंकरहि होऊं शकत नसल्यामुळे आतां सिद्ध पदवीच्या गुणांचा विचार करू. सिद्धपद प्राप्त करून घेण्यासाठी एकादशप्रतिमा सांगितलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे. पहिलीदर्शन प्रतिमा. ही प्रतिमा धारण केल्यानंतर संद्देव, सद्गुरु व सच्छास्त्र याशिवाय इतरांना न मानणें; मद्य, मांस, मध व पंचौदुम्बर सेवन न करणें; जुगार, मांसभक्षण, मद्यपान, वेश्यागमन, शिकार, चौर्यकर्म व
(९)