________________
जैनधर्माचे प्राचीनत्व
वरील ऋचेचा भावार्थ आहे. यजुर्वेद अ. १९ मंत्र १४ वा असा माहे " अतिप्यरूपं मासरं महावीरस्य नमः । रूपमुपसदाम हे ताजस्रिो रात्रिः सुरासुजा ॥ यांतील महावीर शब्दाचा अर्थ अग्नि वगैरे देवतापर करण्यांत येतो; व त्या नम किंवा सवस्त्र वाटेल तशा मानतां येतात. याप्रमाणे शुद्ध वेदांचे वाटेल तसे अर्थ फिरवून ज्यांनी पिंडपोषण केले त्यांना घिःकार असो. कारण त्यांच्यामुळे दुनिया मिथ्यात्वाचा प्रसार झाला. तात्पर्य हे की, ऋषींनी ज्ञानमय व त्यागप्रधान जैनमुनींची स्तुतिस्तोत्रं वेदांतून गायिली असल्यामुळे वेदकालीं व तत्पूर्वीहि जैनधर्माचे अस्तित्व होते असे सिद्ध होते.
भतीर्थकर किंवा आदिनाथस्वामी होऊन पुष्कळ वर्षे लोटल्यानंतर अजितनाथ तीर्थकर झाले. अयोध्या नगरीत इक्ष्वाकुवंशाचा धरणीधर नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या मुलाचे नांव त्रिद संजय देव. त्यांची राणी इंदुरेखा. हिच्या पोटी जितदानु राजा जन्मला. याचा विवाह पोदनपुरचे राजा व्यानंद यांची मुलगी विजया ईच्याशी झाला. या जोडप्यापासून अजितनाथ जन्मले. जितदामु राजाला विजयसागर नावाचा दुसरा एक भाऊ होता. त्याचे पोटी सगर चक्रवर्ती जन्मला. यांचे वर्णन वैदिकपुराणग्रंथांतूनहि आहे. अजितनाथ तीर्थकर वैशाख शु. ॥ त्रितीयेस जन्म पावले. त्यांनी अनेक राजकन्यांशी विवाह केला होता व बरीच वर्षे राज्य केले. एकदां वनक्रीडा करीत असतांना नुकतेच उमललेलें फूल कोमेजलेलें त्यांना दिसले, त्याबरोबर त्यांना वैराग्य उत्पन्न झाले व त्यानी दीक्षा घेतली. बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांना केवलज्ञान झाले. नंतर धर्मप्रचार करून त्यांनी नव्वद गणधर किंवा पट्टशिष्य, एक लाख मुनि व तीन लाख अर्जिका बनविल्या. सगर चक्रवर्तीने हि शेवटी दीक्षा घेतली, पण त्यांस केवलज्ञानप्राप्ति झाली नाही. त्याचा पुत्र भगीरथ याने मात्र घनघोर तपश्चर्या करून मोक्षप्राप्ती करून घेतली. देवांनी त्याला अभिषेक केला व तेच गंगाजल अशी आख्यायिका आहे. अजितप्रभु सम्मेद शिखरावरून मोक्षाला गेले. यांची स्तुति यजुर्वेदांत आहे. अजितनाथ होऊन असंख्य वष लोटल्यानंतर श्रावस्ती नगरीत इक्ष्वाकुवंश व काश्यप गोत्राचे राजा दृढरथराय किंवा जितारी व राणी सेना किंवा सुषेणा यांच्या पोटीं श्रीसंभवनाथ मार्गशीर्ष शु।। १४ स जन्मले. यांचे कालापासूनच शंभुमहादेवाची भक्ति सुरू झाली. यशद्वारा इंद्रादिदेवांची उपासना पुरू होण्यापूर्वीपासून शिवपूजा प्रचलित अस
(१९)