________________
उपसंहार
खारेपाटण, दामल, नाशिक, अंजिनी गुंफा, अंकरगुंफा, चांदवड, इगतपुरी गुंफा, चांभारलेणे, सिमर, मांगीतुंगी वगैरे. गोवें प्रांतांतहि प्राचीन जैनमंदिरे आहेत. आता देशावरील जिल्यांचा विचार करूं. नंदुरबार, तुरनमाल, यावलनगर, भामरे, निजामपुर, पीतळ खोरे जैनफा, अजिंठा जैनगुंफा, क-हाड, वांई, पोमलवाडी, फलटण, बेलापूर, दहीगांव, कोल्हापूर, चावलगुंफा, रायबाग, खेद्रापूर, बीड, हेरले, कुंडल, कुंभोज, स्तवनिधी, बमनी, सावगांव वगैरे याशिवाय जगदंबा करवीर, पंढरीचा विठ्ठल ही प्रसिद्ध मंदिरे व इतरहि अनेक मंदिर पूर्वी जिनालयेच होती.
भाता ज्या राज्यांत आमचे वास्तव्य आहे त्या हैद्राबाद संस्थानचाच विचार करूं. इ. स. ना पूर्वी या भागावर आघ्राचे राज्य होते व त्यावेळी ते बहुतेक जैनच होते. इ. स. ५५० पर्यंत चालुक्यांनी राज्य केले. यांची राजधानी कल्याणपट्टग होय. या घराण्यातील हे बहुतेक राजे जैन होते. नंतर ते शैव व 'वैष्णव झाले. मलखेडला राष्ट्रकुटानी इ. सनाच्या आठव्या शतकापर्यंत व नंतर यादवांनी राज्य केले. यादवांची राजधानी देवगिरी होती. दुधनीहून पांच मैलांवर आतनुवंद्रनाथाचे मंदिर आहे. चंद्रप्रभतीर्थकरांची दोन हात उंच पद्यासनस्थ मूर्ति आहे. दीड फूट उंचीच्या तीन नग्न मूर्ती व चोविस तार्थकरांची एक मूर्ति आहे. आळंदहन सोळा मैलांवर अष्टं म्हणून गांव आहे. तेथे शके ५२८ मधील विघ्रहर पार्श्वनाथाचे मंदिर आहे. वाटेत अचलेश्वरगांवी जे शिवालय आहे, तेंहि पूर्ण जिनालय होते. परभणी जिल्ह्यांतील किगेली स्टेशनाहुन चार मैलांवर उखलेदगांवीं नेमिनाथांची भव्यप्रतिमा पूर्णानदीचे कांठी आहे. औरंगाबादेहून वीस मैलावर कचनेर गांवी पार्श्वनाथाचे विशालमंदीर आहे. बारशी शहरापासून वीस मैलांवर कुंथलगिरी आहे. हे सिद्ध क्षेत्र असून देशभूषण कुलभूषण मुनि येथून मोक्षाला गेले. त्यांचे चरणचिन्ह तेथे आहे. अलेरेस्टेशनापासून चार मैलावर कुलपाक गांवी माणिकप्रभूचे स्थान आहे. ती मूर्ति आदिनाथांची आहे. गाणगापुराहून बारा मैलांवर तडकत्वगांवीं शांतिनाथांचे मंदिर आहे. गुलबर्गा जिल्ह्यांतील शाहाबाद स्टेशनापासून दोन मैलावरील वंकुरगांवीं प्राचीन जैनमंदिर आहे. मलखेडचे प्राचीन नांव मलयाद्री होते. हचि जैनसम्राट अमोघवर्षाची राजधानी. अकलंकदेव व जिनसेनाचार्यासारखे जैनविद्वान् येथेच होऊन गेले. चाहिन बारा मैलांवर सांवरगांवीं पार्श्वनाथांचे जुने मंदिर आहे. होनसलगीला