________________
६२
रूपिणी.
भगिनी! या अधमाला आपल्या कृतकाचा पश्चात्ताप वाटण्यास, याचे सर्व नीच मनोविकार शांत होण्यास, किंबहुना याचे सर्वस्वी परिवर्तन होण्यास तुझेच अढळ सद्गुणप्रेम कारणीभूत झाले म्हणून हा जन्मजन्मांतरीही तुझा ऋणीच राहील !" ___ यावेळी ज्याच्या डोळ्यांतून अश्रुबिंदू निघाले नसतील असा मनुष्य तेथें विरळाच असेल !
रूपिणीने त्याला अंतःकरणपूर्वक क्षमा करितांच तो तेथून निघून गेला.
नंतर अभयकुमाराने रूपिणीच्या नवऱ्याचा हात तिच्या हातांत देऊन म्हटलें:__“प्रिय भगिनी ! पुन्हा एकदां तुझ्या खन्या पतीशी मी तुझें पाणी गृहण करवितो! परमात्म्याच्या कृपेने मला या कामांत यश येऊन, तुझ्या सद्णाचे गोड फळ तुला मिळाले याबद्दल मला अतिशय आनंद वाटत आहे ! तूं में व्रत घेतले आहेस ते अशाच निश्चयाने चालीव ! संकटाला बिलकूल भिऊ नकोस ! सद्गणी माणसांच्या अढळ निश्चयापुढे संकटाचा बिलकुल टिकाव लागत नाही, हे आतां तुझ्या उदाहरणावरूनच उघड होते. आपले पातिव्रत्य भंग न होऊ देण्याविषयींचा तुझा निश्चय पाहून मा जो आनंद झाला तो व्यक्त करितां येणे अशक्य आहे ! जा ! आता तुम्ही उभयतां सुखाने नांदा ! परमात्मा तुमचे सदैव कल्याण करो !"
या वेळी अभयकुमाराचे न्यायचातुर्य आणि रूपिणीची सद्गणनिष्ठा यांविषयी तेथें सारखा जयजयकार झाला !