________________
हिंसेशिवाय कोणतीही प्रवृत्ति केली जात नाहीं; ह्मणून अशा प्रकारच्या संपूर्ण अहिंसेचे पालन करण्याचा तर हा अर्थ होऊ शकतो की, मनुष्याने आपल्या सर्व जविन क्रिया बंद करून, योग्यासारख समाधिस्थ होऊन ह्या नरदेहाचा नाश बळजबरीने करून टाकावा. असे केल्याशिवाय अहिंसेचेही पालन करणे आणि जीवनाचे ( आयुष्याचे ) संरक्षण करणे, हे तर आकाशांतील फुलाच्या सुगंधाच्या अभिलाषेसारखेच निरर्थक आणि निर्विचार आहे. ह्मणून पूर्ण आहिंसा हा फक्त विचाराचाच विषय होऊ शकतो, आचाराचा नाही. __हा प्रश्न यथार्थ आहे, ह्या प्रश्नाचे समाधान अहिंसेचें भेद आणि आधिकारी याविषयी निरूपण केल्याने होईल. याकरितां आधी आहंसेचें भेद दाखविले जातात. जैनशास्त्रकारांनी अहिंसेचे अनेक प्रकार दाखविलें आहेत. जसें:- स्थल अहिंसा आणि सूक्ष्म आहिंसा; द्रव्य आहिंसा आणि भाव आहंसा; स्वरूप अहिंसा आणि परमार्थ अहिंसा; देश आहंसा आणि सर्व आहिंसा वैगरे. कोणत्याही हालत्या चालत्या प्राण्यास किंवा जीवास जाणून बुजून न मारण्याच्या प्रतिज्ञेचे नांव स्थूल आहिंसा आहे आणि सर्व प्रकारच्या प्राण्यांना सर्व प्रकारचे क्लेश न पोहोचविण्याविषयी आ. नाव सूक्ष्म अहिंसा आहे. कोणत्याही जावास आपल्या इरीमान दुःख न देण्याचे नांव द्रव्य अहिंसा आहे आणि सर्व आ म्याविषयी कल्याणाच्या भावनेचें नांव भाव अहिंसा आहे. हचि गोष्ट स्वरूप आणि परमार्थ अहिंसेविषयीं देखील सांगितली जाऊ शकते. काही अंशी आहिंसेचे पालन करणे, ती देश आहिंसा ह्मणविली जाते आणि सर्व प्रकारे ह्मणजे परिपूर्णतेने अहिंसेचे पालन करणे, ती सर्व आहिंसा झणविली जाते.