________________
तो
66
प्रकरण ६ वें .
देवदत्ताचा कबुलीजबाब !
तरुण बाहेर येतांच अभयकुमाराने ' ठेवा या हरामखोराला पकडून !' अशी एकदम गर्जना केली. त्याबरोबर त्यास चतुर्भुज केलें. नंतर अभयकुमार त्याजकडे वळून अत्यंत शांतपणानें
ह्मणाला:--
तरुण गृहस्था ! तुला अजूनही जर मजकडून दयेची अपेक्षा करावयाची असेल तर, आपलें खरें स्वरूप प्रगट करून आपली खरी हकीकत काय असेल ती सांग.
ܕܕ
आतां आढेवेढे घेण्यांत कांहीं अर्थ नाहीं हें त्या तरुण गृहस्वास कळून चुकलें ! आपण संपादन केलेल्या अलौकिक सामर्थ्याच्या जोडीस खरी अक्कल थोडीशी जरी आपल्या अंगांत असतीत्या खोलीतून बाहेर निघण्याचा अशाप्रकारें मूर्खपणा केला नसतातर रूपिणीच्या प्राप्तीची कांहीं तरी आशा होती. निदान आपणास खोदें ठरविण्याची तरी या न्यायाधिशाची प्राज्ञा नव्हती. पण आतां त्याचा काय उपयोग ? आतां आपले पहिलेच ह्मणणें कायम ठेवणें ह्मणजे जास्त गोत्यांत येणें होय ! त्यापेक्षां यांना सगळी खरी खरी हकीकत सांगून यांच्या दयेचीच अपेक्षा करावी, हें उत्तम. "
४