________________
५२
रूपिणी.
"पण मी हे सर्व पंचाक्षरीय मुहुर्तही बरोबर साधले पण त्यांचा कांही उपयोग झाला नाही! उलट माझी फजिती व हाल मात्र बरेच झाले!"
“या साधनासाठी रात्री फिरत असतांना केक वेळां चोर समजून पुष्कळ लोकांच्या हातचा मला खरपूस मार खावा लागला. आणि नदीत गळ्याइतक्या पाण्याचा शोध करितां करितां कधी कधी त्याच्या तळाशींच जाण्याचा प्रसंग आला. एखादे वेळी नदीत उभे राहून मंत्रोच्चाराकरितां ह्मणून तोंड उघडावें, तोच त्यांत पाणी शिरून ते कायमचे बंद होण्याचा प्रसंग यावा ! याशिवाय घंटेच्या घंटे अशा प्रकारे थंड पाण्यात घालविल्याने हीवतापाने महिनेच्या महिने अंथरुणावर खिळून राहण्याचे प्रसंग येत ते निराळेच !"
"एकदां अशाच एका साधनासाठी एका झाडाला टांगून घेत असतां उलट तेच माझ्या अंगावर आले. मग मला कोठे कळले की, आपण व्यास टांगून घेत होतो तें झाड फारच कोवळे आहे. "
" तथापि एकदा एका स्मशानांत मजवर जो प्रसंग गुदरला, तो फारच भयंकर होता ! त्याचे स्मरण झाले झणजे माझ्या अंगावर अजूनही कांटा उभा राहतो. अमावास्येची रात्र होती आणि साधन उताणे निजून करावयाचे होते. मंत्रोच्चार करावयाचा तो मनांतल्यामनांत, आणि वाटेल ते झाले तरी तोंडांतून 'ब्र' ह्मणून काढावयाचा नाही, असा आमच्या पंचाक्षांचा सक्त हुकूम. झालें ! याप्रमाणे मी साधनास आरंभ करून कांहीं थोडा वेळ लोटला नाहीं तोच त्या गांवांतील काही मंडळीनी तेथें एक प्रेत दहन करण्याकरितां आणिलें. अंधारामुळे त्या लोकांस मी प्रथम दिसलों नाहीं ! पण पुढे त्यांनी पेटविलेल्या चितानीचा प्रकाश जेव्हां चोहीकडे पसरला