________________
आभू आणि जगहू, बगैरे जैन राजद्वारी पुरुषां करितां में स्थान आहे, ते दसऱ्या करितां नाही. फक्त गजराथच्याच इतिहासांत नाही, परंतु साधारणपणे भारताच्या इतिहासांत देखील ह्या अहिंसाधर्माची परम उपासना करणाऱ्यांच्या पराक्रमाशी सारखेपणा ठेविणारी मनुष्ये फारच कमी मिळतील. ज्या धर्माचे परम अनुयायी स्वतः असे शर वीर आणि पराक्रमी होते, तसेंच ज्यांनी आपल्या पुरुषार्थाने देश आणि राज्यास विशेष समध्द आणि सत्वशील बनविले होते, त्या धर्माच्या प्रचारामुळे देशाची किंवा प्रजेची अधोगति कशी हाऊ शकेल ? देशाची परतंत्रता किंवा प्रजेची निर्वीर्यता यामध्ये केव्हाही अहिंसा कारणीभूत होऊ शकत नाही.
ज्या देशांत हिंसेचा विशेष प्रचार आहे, जे अहिंसेचे नांव देखील जाणत नाहीत, ज्यांचे नेहमी फक्त मांसाचेच भक्षण आहे आणि पशूपेक्षाहि जे अधिक क्रूर असतात, ते नेहमी स्वतंत्रच राहतात काय? रोमन साम्राज्याने कोणत्या दिवशी अहिंसेचें नांव ऐकिले होते ? आणि मांस भक्षण सोडिलें होतं ? मग त्याचे नांव जगांतून नाहीसे का झाले? तुर्कस्थानच्या प्रजेमधून हिंसेची भावना केव्हां नष्ट झाली होती ? आणि क्रूरतेचा केव्हां लोप झाला होता? मग त्याच्या सम्राज्याची आज अशी दीनंदशा कां होऊन राहिली आहे ? आयलंड देशांत अहिंसेची उद्. घोषणा केव्हां केली होती ? मग तो देश आज शेकडो वर्षांपासून स्वतंत्र होण्याकरितां कां तडफडत आहे. दुसऱ्या देशांच्या गोष्टी जाऊं घा, खुद्द भारतवर्षाचेच उदाहरण घ्या. मोगलमामाज्याच्या चालकांनी केव्हां अहिंसेची उपासना केली होती ? त्यामुळे त्यांचे प्रभुत्व नामशेष होऊन गेले आणि त्याच्याविरुध्द पेशव्यांनी केव्हां मांस भक्षण केले होते ? ह्मणून त्यांच्या ठिकाणी एकदम वीरतेचा वेग उघडकीस आला ? यावरून स्पष्ट दिसते की देशाच्या राजनौतिक उन्नतींत हिंसा कारणी