________________
महाराजे होते, यांच्या राज्यकाळी कोणत्याही परचक्राने येऊन भारतास पीडित केले होते काय? आहंसातत्त्वाचे अनुयायी चक्रवर्ती सम्राट श्रीहर्ष होते, त्यांच्यावेळी भारतास कोणीही पददलित केले होते काय ? अहिंसा मताचे पालन करणारा दक्षिणस्थ रा कूट वंशांतील नृपति अमोघवर्ष आणि गुजराथेतील चालुक्य वंशीय प्रजापति कुनारपाल होता, यांच्या अहिंसेविषयीं उपासने पासून देशाची स्वतंत्रता नष्ट झाली होती काय ? इतिहास तर साक्ष देऊन राहिलेला आहे की, ह्या राजांच्या राजत्वकाळी भारतवर्ष अभ्युदयाच्या शिखरावर पोहोंचलेला होता. जेथपर्यंत भारत वर्षांत बौद्ध आणि जैनधीचा जोर होता, तसेंच जेथपर्यंत हे धर्म राष्ट्रीय धर्म ह्मणविले जात होते, तेथपर्यंत भारतवपति स्वतंत्रता, शांति, संपत्ति वगैरे पूर्णरूपाने राहिलेली होती. अहिंसेची उत्कृष्ट उपासना करणाऱ्या ह्या राजे लोकांनी अहिंसा धर्माचे पालन करीत असतांना सुब्दां पुष्कळशी युध्द केलीत. पुष्कळश शबंचा पराजय केला आणि पुष्कळशा दुष्ट लोकांना दंडही केला. यांच्या अहिंसेच्या उपासनेनें देशाला परतंत्र बनविले नाही व प्रजेला पराक्रमशन्यही बनविलें नाही. ज्यांना गुजराथ आणि राजपुताना येथील इतिहासाविषयी थोडे फाराहे वास्तविक ज्ञान असेल, ते जाणूं शकतात की, ह्या देशांना स्वतंत्र, समुन्नत आणि सुरक्षित ठेवण्या करितां जैनांनी कोण कोणत्या प्रकारे पराक्रम करून दाखविले होते. ज्यावेळी गुजराथेतील राज्यकार्याचा भार जैनांच्या स्वाधीन होता अर्थात् महामात्य, प्रधान, सेनापति, कोषाध्यक्ष वगैरे मोठमोठाले अधिकार जैनांच्या स्वाधीन होते; त्यावेळी गुजराथचे ऐश्वर्य उन्नतीच्या चरम सीमेवर चढलेलें होतें. गुजराथच्या सिंहासनाचे तेज चोहोंकडे व्याप्त झालेले होते. गुजराथच्या इतिहासांत सेनापति विमलशाहा, मंत्री मुंजाल, मंत्री शांतु, महामात्य उदयन आणि बाहड, वस्तुपाल आणि तेजपाल