________________
१८
रूपिणी.
असते, अनेक प्रकारची भये तुझ्या हृदयास प्रतिक्षणी कशी फाडित असतात, निरनिराळ्या प्रसंगी नवीन नवीन काय युत्त्या योजाव्यात आणि कसल्या थापा द्याव्यात या विवंचनेने अशांतता तुझ्या मागे कशी सारखी हात धुऊन लागली आहे आणि सुखाच्या निद्रेनेहि तुला कसे सोडविले आहे या सर्व गोष्टींचा नीट विचार कर ! हे मनस्तापाचे चित्र डोळ्यापुढे धर ! आणि या यातनांची भावी नरकयातनांशी तुलना करून याही तितक्याच असह्य आहेत की नाहीत ते सांग ? येथला हा मनस्ताप तेथल्या तापलेल्या लोखंडी पुतळ्याच्या आलिंगनाच्या तापाहून कोणत्या प्रकारें कमी आहे ? तापलेल्या तेलाच्या कढईत तळली जात असतांना तेथलें तुझें तळमळणे आणि अशांतीमुळे येथे होणान्या तुझ्या जिवाची तळमळ यांत काय भेद आहे ? आणि तेथे भाले, बरच्या, सुया, दाभणे वगैरे तीव्र शस्त्रांचे शरीरांत भोसकणे आणि प्रत्येक पापप्रसंगी ' आपण हे निंद्य कर्म करीत आहोत' अशा प्रकारचा सदसद्विवेक बुद्धीच्या तीव्र तरवारीचा येथे तुझ्या हृदयावर होणारा असह्य घाव यांत तूं कोणता फरक समजतेस ? त्याचप्रमाणे या दुर्गुणांमुळे येथे होणारे अब्रूचे धिंडवडे हे तर तेथे होणाऱ्या शरिराच्या चिंधड्यापेक्षांहि नि:संशय दुःसह होत ! आणि या सर्व यातना, रूपिणी, तूं नित्य अनुभवित असतांनाहि आपण सुखोपभोगच अनुभवीत आहोत असें तुला वाटते काय ? केवढा हा तुझा भ्रम ! पितांना गोड लागते, एवढ्यासाठींच तूं हे अत्यंत दारुणपरिणामी विष, अमृत समजून प्राशन करीत आहेस, पण याचा वाईट परिणाम तुझ्यावरच होऊन थांबत । नाही : तुझ्याबरोबर तुझ्याशी ज्यांचा ज्यांचा संबंध आहे त्यांच्याहि हृदयाला ते अघोर यातना देत आहे ! याचा तूं कधीं विचार केला