________________
THI
प्रकरण ३ रें.
कसोटीला उतरले. पिणीच्या नवन्याला आज आपल्या पत्नीचा कांहीं निराळाच अनुभव येऊं लागला ! तिच्या बोलण्याचालण्यांत व एकंदर वृत्तीत पडलेला फरक पाहून त्यास पराकष्टेचें आश्चर्य वाटलें ! पण देवा ! हें सर्व क्षणभंगुर तर नसेलना ? " असा विचार त्याचक्षणी त्याच्या मनांत आल्याखेरीज राहिला नाहीं. पण आपली ही भीति खोटी आहे हें पुढें लौकरच त्याच्या अनुभवास आलें.
CC
त्या दिवशी संध्याकाळी ते जोडपे मोठ्या आनंदाने घरी परतले. आजच्यासारखा आनंद, आणि आजच्या सारखें समाधान त्या उभतांस सान्या जन्मांतहि अनुभवल्याचें कधीं ठाऊक नव्हते ! सृष्टीचें स्वरूप तरी त्यांना आज किती रमणीय आणि सुखप्रद भासत होतें ! आज आपल्या हृदयावरचें कसले ओझें कमी झालें तें रूपिणीस कळेना ! तथापि आपले मन आज फार उल्हसित आणि हलके झाले आहे एवढें मात्र तिला खास वाटत होतें. नवऱ्याची प्रसन्न मुद्रा पाहून तर तिला किती तरी समाधान वाटलें ! या शुद्ध सुखाचा अनुभव तिला नवाच होता !
आपल्या मुलांत व सुनेंत उत्पन्न झालेले हे ऐक्य पाहून सासुसासन्यासही परमावधीचा आनंद झाला ? म्हातारपणीं त्यांची या शिवाय दुसरी कोणती इच्छा असणार ?