________________
३४
रूपिणी.
मात्र लागली! आपल्या भाषणाचे अखेरीस त्याने तिला जी उपमा दिली होती तीस अनुसरून अभिनय करणेही जरुर वाटल्यामुळे तो तिजपुढे गुढघे टेकून बसला होता तो अजूनपर्यंत तसाच होता ! -
पण तिची लाथ लागतांच तो अतिशय खवळून गेला, आणि संतापाच्या भरांत ताडकन उठून ह्मणालाः ___ " अग ! हलकट स्त्रिये ! तुझी ऐवढा वेळ विनवणी केली तरी तुला नाहींना द्रव आला? मला घरादाराचे वाटोळे करावयास आणि सर्वस्वावर पाणी सोडावयास लावून शेवटी माझी अशी निर्भत्सना करितेस ? अरेरे स्त्रियांची जात खरोखर महा दुष्ट ! महाअधम ! महापाजी ! महाबेइमान---!"
"चूप ! नीच पुरुषा !" रूपिणी अतिशय संतापाने मध्येच ह्मणाली:-----''मजसारख्या एखाद्या पापी स्त्रीच्या वर्तनावरून सरसकट सर्व स्त्रीजातीवर असा निंद्य दोषारोप करूं नकोस ! मजसारख्या ज्या पातकी स्त्रिया आहेत, त्यांची तरफदारी करावयाची माझी इच्छा नाही. तथापि तुला मी खातरीपूर्वक सांगते की, त्यांच्यापैकी प्रत्येकीच्या पापप्रवृत्तीच्या मुळाशी कोणी तरी पुरुषच सांपडेल ! खचित पुरुष जात स्त्रियांविषयी खरा पवित्रभाव हृदयांत धारण करील तर पाप हा शब्दच स्त्रीवर्गात सांपडावयाचा नाहीं ! खरोखर त्या महात्म्याच्या हजाराव्या हिशाने जरी एखादा सद्गुणी पुरुष मला आरंभींच भेटता तर मी दुर्विचारांच्या खोल खड्डयांत अशी बुडाली नसते !"
"बस ! बस्स ! रूपिणी,तुझें ब्रह्मज्ञान ऐकण्याकरितां मी येथे आलों । नाही किंवा पुरुषजात पापी की स्त्रीजात पापी या वादाशीही मला काही करावयाचे नाही. यावेळी तुझ्या प्रेमाने मी अगदी वेडा