________________
एक आणिबाणीचा प्रसंग |
रात्र प्रियपत्नीच्या सहवाससुखांत घालवून पहांटेस पुन्हा नव्या उमेदीने व उल्हासाने जागत होऊन शेतास जावे असा त्याचा 'नित्यक्रम असे.
या क्रमाप्रमाणे तो एके दिवशी पहाटेस कोंबडा आरवतांच जागा झाला, व शेताकडे जाण्यास निघाला. जाते वेळी तो आपल्या बायकोस जागे करून जात असे. त्याप्रमाणे आजही त्याने तिला उठविले. जागृत होतांच ती त्याजबरोबर अंगणांत आली. पण तेथें येतांच आपला नवरा आज नेहमीपेक्षां फार लौकर शेतांत जात आहे असे तिला दिसून आले. अशा अपरात्री बाहेर जाणे बरे नाही असे तिला वाटून, तिने त्याप्रमाणे त्यास कळविले. पण ' ही पहाट आहे अपरात्र नाही, नुकताच कोंबडा ओरडला होता, तेव्हां भिण्याचे कारण नाही, असे त्याने तिला कळविलें,
"ओरडला असेल मेला कोंबडा ! त्याला काय ? " त्याच्या भाषणाने समाधान न पावतां रूपिणी ह्मणाली. "केव्हां तरी ओरडावयाचे ? पांखराला काही अक्कल कां असते ?". ___ "वेडी आहेस तूं!" तिचा नवरा ह्मणाला. "पांखरांला काही कांहीं भबतीत मनुष्यापेक्षाही जास्त अक्कल असते, समजलीस ? आणि त्यांतून कोंबडे तर पहांट झाल्याखेरीज कधीच आरवावयाचे नाहीत."
'बरें, आपण ह्मणतां तसे असेल. पण मेली माझ्या मनाला थोडी रुखरुख वाटते, तर जरा उशिरां कां जाणे होईना ! एखादे दिवशी झाला तर झाला उशीर. पण गडे ! आतां नाहींच जायचे आँ !" पतीच्या गळ्यास मिठी मारून त्याच्या तोंडापुढे तोंड. नेऊन रूपिणी मोठ्या लडिवाळपणाने ह्मणाली.