________________
परीसस्पर्श.
आहेस काय ! आपणास सुख व्हावें या आशेने ज्याने मोठ्या आनंदाने तुझें पाणिग्रहण केलें, व ज्याच्याशी कोणत्याहि प्रकारे प्रतारणा करणार नाही असें तूं लग्नाचे वेळी वचन दिलेंस त्या तुझ्या पतीची, त्या तुझ्या देहाच्या अधिपतीची, तुझ्या या बेइमानी वर्तनाने काय अवस्था होत असेल, हजारों विंचवानी नांग्या मारिल्याप्रमाणे किंवा रखरखीत निखाऱ्यावर धरल्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणास कशा वेदना होत असतील याचे चित्र तूं आपल्या डोळ्यापुढे घर."
या वेळी रूपिणीच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या पण मुनीवांनी तिकडे लक्ष न देतां आपला वाक्प्रवाह तसाच चालू ठेविला.
"पापिणी !' ते ह्मणाले. “आपले घर साक्षात् नरक बनविणारी ही अघोर विषयवासना मुखकारक आहे असें तुला वाटते तरी कसे ? शिवाय या नरकांतील यातनांचा अनुभव तुजबरोबर तुझ्या आप्तांनाहि घणे भाग पडत आहे ! केवढें अघोर कर्म हे, खरोखर हिंसा, लबाडी, चोरी, विश्वासघात, वचनभंग या दारुण पातकांचे मूळ हा व्यभिचारच नव्हे काय ? आणि जगांतील अशांततेच्या मुळाशी तर या खेरीज दुसरे कोणते कारण आहे ? भ्रष्टचरिते, बोल ! या अशांततेच्या कारणास, या दुर्गतीच्या मुळास, या मनस्तापाच्या बीजास, या गृहिणी पदाच्या कलंकास, या उभय कुलांच्या मुखावर फांसलें जाणाऱ्या काजळास, या पतिविषयक बेइमानपणास, या अखिल पातकांच्या राशीस, या निःशेष अनर्थाच्या पायास, या परम निंद्य व्यभिचारास तूं सुग्व समजतेस काय ? ही पहा तुझ्या या वर्तनाने असह्य मनोयातना होऊन केवळ मरणाचीच वाट पाहत असलेली तुझी सामुसासरे, आणि