________________
१२
यद्यपि आत्म्यास अमरत्वाच्या प्राप्तीकरितां आणि संसाराच्या सर्व बंधनापासून मुक्त होण्याकरितां अहिंसेचें आचरण संपूर्ण रूपानें कर फारच आवश्यक आहे, तसे केल्याशिवाय केव्हांही मुक्ति मिळू शकत नाही; तथापि संसारांतील सर्वच मनुष्यांमध्ये एकदम अशा पूर्ण अहिंसेचें पाटन करण्याची शक्ति आणि योग्यता येऊ शकत नाहीं. ह्मणूनच कमी जास्त शक्ति आणि योग्यता असणाऱ्या मनुष्याकरितां वर दाखवि ल्याप्रमाणे तत्वज्ञनी अहिंसेचे भेद करून क्रमशः या विषयांत मनुष्यास उन्नत होण्याची व्यवस्था दाखवून दिली आहे. अहिंसेच्या ह्या प्रकारामुळेच तिच्या अधिकान्यामध्यें भेद करून दिले आहेत. जीं मनुष्य अहिंसेचे पूर्णपणे पालन करूं शकत नाहीत; ते गृहस्थ - श्रावक - उपासक - अणुव्रती देशव्रती बंगरे ह्मणविले जातात. जोपर्यंत ज्या मनुष्यामध्ये संमारांतील सर्व प्रकारचे मोह आणि प्रलोभनास सर्वथा सोडून देण्याइतकी आत्मशक्ति प्रकट होत नाहीं, तोपर्यंत तो संसारांत - राहत असतां आणि आपल्या गृहरुयवहारास चालवीत असतांना हळुहळू अहिंसात्रताचे पालन करण्यामध्ये त्यानें उन्नति करीत जावें. जयपर्यंत होऊ शकेल तेथपर्यंत त्याने आपल्या स्वार्थास कमी करीत जावे आणि स्वतःच्या स्वार्थाकारता प्राणीमात्रांना मारन - ताडन - छेदन - आक्रोशन वगैरे क्लेश उत्पन्न करणाऱ्या व्यवहारांचा निषेध करीत जावा. अशा गृहस्थाकरितां कुटुंब, देश किंवा धर्माचें संरक्षण करण्याकरितां जर स्थूल अहिंसा करावी लागली, तर त्यास आपल्या व्रतांत कांहींच भंग होत नाहीं; कांकीं जेथपर्यंत तो गृहस्थाश्रमी अर्थात् संसारी अवस्थेत आहे, तेथपर्यंत समाज, देश आणि धर्माचे यथाशक्ति रक्षण करणे, हें त्याचें परम कर्तव्य आहे. जर एखाद्या भ्रांतीच्या वश होऊन तो आपल्या कर्तव्यापासून भ्रष्ट झाला, तर त्याचे नैतिक अध: पतन होते आणि नैतिक अध: पतनहि एक सूक्ष्म हिंसा आहे; काकी