________________
महावीरचरित्र
नंतर तो देवगतीला पोहोचला. तेथून तो जीव श्वेतिविका नामक नगरींत अग्निभूति व गौतमी या अग्निहोत्री जोडप्याचे पोटीं अग्निसह नांवानें जन्मला. बरीच वर्षे अग्निहोत्र करून शेवटी त्याने संन्यास घेतला व मेल्यानंतर तो सनत्कुमार स्वर्गात देव झाला. तेथून तो मंदिरपुरांत गौतमब्राह्मणाचे पोटी अग्निमित्र नांवाने जन्मला. या जन्मांतहि ब्रह्मकर्म करून तो जीव देवगतीला गेला. पुढे स्वास्तिमति नगरीत संतशयन ब्राह्मणाचे पोर्टी भारद्वाज नांवानें तो जन्मला. शेवटी संन्यास घेऊन मेल्यानंतर तो देवगतीला पोहोचला. तेथे बराच काल घालवून पुढे तो जीव नरक, एकेद्रिय, द्वीदिय वगरे गतींतून भटकत राहिला. पापबंध संपल्यावर शुभ कर्मोदयामुळे राजगृह नगरीत शांडिल्य व पाराशरी या ब्राह्मणजोडप्याचे पोर्टी स्थावर नांवानें तो जन्मला. ब्रह्मकमे करून शेवटीं संन्यास घेऊन तो ब्रह्मस्वर्गात देव झाला. नंतर राजगृहीं नगरांत विश्वभूति राजाचे पोटी हा जीव विश्वनंदी नांवाने जन्मला. काही दिवस संसार सुख भोगल्यानंतर आपला भाऊ विशाखभूती यास राज्य देऊन विश्वभूति राजा साधु झाला व आपला मुलगा विश्वनंदी यांस त्याने युवराजपद दिले. विशाखभूतीचा मुलगा विशाखनंदी यास विश्वनंदीबद्दल मत्सर उत्पन्न झाला व विशाखभूतीनहि मुलाचीच कड घेऊन युद्ध केले, पण विश्वनंदीचा पक्ष न्याय्य असल्यामुळे प्रजेने त्यालाच अधिक मदत केली व म्हणून त्याचा विजय झाला. तथापि त्याला वैराग्य प्राप्त होऊन त्याने दीक्षा घेतली. नंतर विशाखभूतीनहि विशाखनंदीकडे राज्यकारभार सोपवून दीक्षा घेतली. प्रजेच्या मनांतन विशाखनंदी उतरला असल्यामुळे पुढे पदच्युत झाला. एकदा विश्वनंदी मुनि रस्त्याने चालले असतां गायीने मारल्यामुळे खाली पडले. ते पाहून विशाखनंदी हांसला. त्यामुळे विश्वनंदीला अतिशय संताप चढला व त्या भरांत तो मृत होऊन दहाव्या स्वर्गात देव झाला. तेथन तो जीव पोदनपुरचा राजा प्रजापति व राणी मृगावति यांच्या पोटी त्रिपिष्ट नांवानें जन्मला. त्रिपिष्ट चक्रवर्ती झाला व अनेक पापें आचरल्यामुळे नरकाला गेला. नरकांतील कर्मभोग संपल्यावर प्रविपुळ पर्वतांत सिंहाच्या जन्माला गेला. हा सिंहहि मरून नरकाला गेला व पुन्हा तो वराह पर्वतांत सिंहाचेच जन्मास गेला. शुभकर्मोदयामुळे त्या सिंहाला अमितकीर्ति व अमितप्रभु नामक दोन चारण मुनींचे दर्शन झाले. त्यामुळे मेल्यावर तो जीव सौधर्मस्वर्गात हरिध्वज- . नामक देव झाला.
(३४)