________________
महावीरचरित्र
म्हणाला, हे वर्धमान, दीक्षा घेण्याची वेळ जवळ आली आहे. तपोलक्ष्मी अतिशय उत्कंठित होऊन आपल्याकडे झपाटयाने येऊ लागली आहे. जन्मतःच उत्पन्न झालल्या भशा निर्मल तीन मानांनी हे प्रभो, आपण युक्त आहांत. ज्यांना तत्त्वांचे थोडेबहुत स्वरूप समजले आहे अशाकडून आपणाला मोक्षाचा उपदेश कसा बरे केला जाईल? म्हणून आमचें हें कथन औपचारिकच आहे. हे भगवन् तपश्चरणाने घातिकर्माच्या कुर्ताचा नाश करून व केवलज्ञानाची प्राप्ती करून घेऊन भवभ्रमणाच्या भयाने त्रस्त झालेल्या भव्यजीवांना मोक्षोपाय दाखवून द्या. याप्रमाणे विसी करून देवगण निवन गेला. महावीर स्वामीनी अवधिज्ञानाने आपल्या आयुकर्माचाहि स्थिति जाणली व दीक्षा घेण्याचा निश्चय केला. मातापितरांनी त्यांची मनोवृत्ति प्रथमपासूनच ओळखली होती. विवाहासाठी त्यांना अनेक वेळां आग्रह करण्यांत आला, पण तो त्यांनी जुमानला नाही. (श्वेतांबर ग्रंथानुसार त्यांनी विवाह केला होता व त्यांना एक मुलगीहि झाली होती अशी मान्यता आहे.) तथापि विवाह नाही तर नाही, पण घर सोडून तपश्चर्यला महावीरस्वामी जाणार ही वाता ऐकून मात्र मातापितरांना फार दुःख झाले. हे दांपत्यहि धर्मज होते पण मोहापुढे त्या धर्मज्ञानाचे काही चालेना. महावीरस्वामींच अनंतबल बाळपणींधि दृग्गोचर झाले असूनहि खडतर तपश्चर्येचे त्रास तुझ्याकडून कसे माहन केले जाणार म्हणून त्रिशलादेवी त्यांना विचारू लागली. येथे झाले तरी तपश्चरण चालले आहे; श्रावकांची बारा व्रतें घेतलंच आहेत. म्हणून आम्हाला दुःखांत टाकून तं दीक्षा घेऊन घर सोडून जाऊ नकोस असें मातेचे म्हणणे होते. पण महावीरस्वामींनी तिला खालीलप्रमाणे उत्तर दिले. 'पूज्य मातोश्री, संसार मृगजलाप्रमाणे आहे. मोहाधपणामुळे सांसारिक जीवांना सांसारिक वस्तु मूळ रूपाहून भिन्न दिसतात. ज्याला मोक्षप्राप्तीची इच्छा असेल त्याने सांसारिक वस्तुसंबंधींचा अनुराग सोडून संन्यस्तवृत्ति धारण केली पाहिजे. दृश्य सांसारिक वस्तु पाण्यावरील बुडबुझ्याप्रमाणे क्षणिक आहेत. राग, शोक, परिताप ही सतत मागे लागलेलीच आहेत. शारीरिक बलाला व सौंदर्याला ती क्षीण करतात, मग वैषियिक सुख तरी कोठून मिळणार मृत्यू तर क्षणोक्षणी मागे लागलेलाच असतो. वेळ भरतांच तो झडप घालतो. मृत्युनंतर जीवाबरोबर त्याच्या कर्माशिवाय दुसरे कांही जात नाही. अशा स्थितीत माते, अरण्यांत जाऊन आत्मध्यानांत लीन होणेच माझें मुख्य कर्तव्य
(६६)