________________
महावीरचरित्र
होण्याचे सामर्थ्य त्याच्यांत आहे. सात तत्वांमुळे किंवा नऊ पदार्थोंमुळे जीव शाश्वत मोक्ष मिळवू शकतो. सार्वेगिक साधनहि मोक्षासाठी सांगितलेलें आहे. विश्वाचे कोर्डे उलगडण्याचा प्रश्न बुद्धिग्राह्य नसल्यामुळे निश्चयपूर्वक सर्वच कांहीं सांगता येणार नाहीं व पटवून तर देतां येणार नाहींच व म्हणूनच वरवरहि मूर्खपणाची दिसणारी मतें सृष्टीच्या घडामोडीचे बाबतीत प्रचलित आहेत. पण त्या सर्वात तर्थकर प्रतिपादित मत जितकें शुद्ध व ग्राह्य वाटतें तितकें दुसरें कोणतेंच वाटत नाही. विश्वाच्या मूळ कोब्याच्या बाबतीत व धर्ममार्गाचे बाबतीत इतके शुद्ध व समर्पक विचार प्रदर्शित करण्याची पात्रता तीर्थकराशिवाय इतरांत नाहीं व तीर्थकर आणि सिद्धांतहि ती सर्वज्ञतेमुळे आली, अनंतदर्शनामुळे आली व शुद्ध चारित्राचे फळ म्हणून प्राप्त झालेल्या वीतरागता व निरूपाधिकत्वामुळे मिळालेल्या अनंतवीर्य व अनंतसुखामुळे आली. हे अनंत चतुष्टय तर्थकर व सिद्धाशिवाय इतरांना नाहीं व म्हणूनच त्यांचे अभिप्राय हि एकांतिक आहेत. तीर्थकर सर्वज्ञ होते हे त्यांचे ज्ञानच सांगते. अनंतदर्शनाशिवाय असलें ज्ञान प्राप्त होणार नाही. अनंतसुख व अनंतवीर्य तीर्थकरांना असतें व म्हणूनच सामान्य जीवांना जें असह्य कष्ट होत असतात ते त्यांना होत नाहींत. त्यांना अशक्य असें कांहीं नाहीं व दुःख कशापासूनहि होत नाहीं. सर्व तीर्थकरांच्या चारित्रावरूनहि हीच गोष्ट दिसून येते. या अनंतचतुष्टयाची पूर्ण कल्पना सामान्य जीवांना येणं अशक्य आहे. कांहीं जीवांना त्याची अंधुक कल्पना येऊ शकेल व असे धर्मात्मे जीवहि फारच थोडे असतात. हे अनंत चतुष्टय हा तीर्थकर व सिद्धांचा विशेष होय आणि म्हणूनच ते सार्वेगिक व सर्वप्राय असा उपदेश देऊ शकले.
एकंदरीत प्रत्यक्ष अनुभव घेऊन तीर्थकर व सिद्धानीं उपदेश केला असल्यामुळे त्यांचा उपदेश सर्वग्राह्य व त्रिकालाबाधित आहे व तो उपदेश सर्वाना लागू पडणारा असूनहि परस्परविरोधी नाहीं, आणि म्हणूनच तो त्रिकालाअधित व सार्वगिक आहे. जैन सिध्दान्ताची स्याद्वाद - शैली तर अप्रतिम आहे. डॉ. भांडारकरांनी त्यावर अभिप्राय देतांना खालील उद्गार काढले आहेत. कोणत्याही विषयासंबंधी विचार करण्याचे दोन मार्ग आहेत. एक द्रव्याकिनय व दुसरा पर्यायार्थिकनय. मूळ पदार्थाचे बाह्य स्वरूप पालटले म्हणजे त्याचा आपण पर्यायार्थिकनयाने विचार करतो त्या पदार्थाच्या मूळ स्वरू( १०६ )
<