________________
महावीरचरित्र
महावीरोचा जेव्हां जन्म झाला तेव्हां म. बुद्ध सहा वर्षांचे होते. महावीरस्वामींनी जेव्हां दीक्षा घेतली तेव्हां म. बुद्ध छत्तीस वर्षांचे होते व धर्मप्रचार करू लागले होते महावीर भगवानांना केवलज्ञानप्राप्ती होऊन तेहि जेव्हां धर्मप्रभावना करूं लागले तेव्हांपासून अर्थातच म. बुद्धाचा प्रभाव कमी झाला व म्हणून इ.स. पू.५०३ ते इ.स. ५५३पर्यंतची गौतमबुद्धाच्या जीवनाची हकीगत बौद्धग्रंथांतून मुळींच मिळत नाही. नंतर काही जैनराजे म. बुद्धाला मिळाल्यामुळे भगवान महावीरांची धर्मप्रभावना चालू असूनही फिरून म. बुद्धाचा प्रभाव पडूं लागला व त्यानंतर दहा वर्षांनी महावीर तीर्थकर निर्वाणाला गेल्यामुळे म. बुद्धाच्या आयुष्याची शेवटची दहा वर्षे भरभराटीत गेली. महावीरनिर्वाणाचे वेळी म. बुद्ध हयांत होते व त्यांनी निर्वाणवार्ता ऐकून एक प्रवचन भिक्षंना दिले होते. याप्रमाणे या दोन समकालीन थोर पुरुषांचा जीवनक्रम आहे. म. बुद्धाचा उपदेश स्त्रिस्ताच्या शिकवणीशी बराच जुळत असल्यामुळे पाश्चिमात्य विद्वानांचे बौद्ध इतिहासाकडे बरेच लक्ष वेधले. ब्रह्मदेश व सिलोनमधील बौद्ध भिक्षूनीहि प्राचीन बौद्धवाङ्मयाची बरीच सेवा केली असल्यामुळे बौद्धग्रंथ मुबलक मिळण्याची सोय झाली आहे. महावीरचरित्राचे बाबतीत व जैनवास्मयाचे बाबतींत जैनांनी विशेष प्रयत्न केले नाहीत. शिवाय ही दोन्ही अलौकिक असल्यामुळे सामान्य मानवी बुद्धीला आकर्षकहि वाटत नाहीत. त्यामुळे महावीर करित्राबद्दल व इतर जैन वाझ्ययाबद्दल इतर लोकांनीहि सायास केले नाहीत, तथापि अलिकडे जैन विद्वानांचे लक्ष या कार्याकडे वेधले असल्यामुळे इतर संशोधकांचेंहि वेधले व सत्य इतिहास मिळू लागेल अशी आशा वाटते. महावीर तीर्थकर हे ऐतिहासिक पुरुष होते, व त्यांच्या जीवनाचा आणि तत्वज्ञानाचा बराच प्रभाव म. बुद्ध व त्यांच्या तत्वज्ञानावर झाला आहे यांत मुळीच शंका नाही. या दोहोंपैकी श्रेष्ठ कोणते व प्राचीन कोणते ते भाता सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झालेले आहे.
(१०२)