________________
महावीरचरित्र
वाढविले. एका शिवलिंगाशिवाय दुसरा देव नाहीं हेंच तें मत होय. बसवेश्वरानी विलक्षण क्रांती करून बहुतेक जैनांना लिंगायत बनविले. नंतर रामानुजाचार्य झाले व त्यांनी वैष्णवमताचा प्रचार केला; पण जगाला मूळ कारण तीन आहेत असें त्यांनी तत्वज्ञान सांगितले. जीव, ईश्वर व सष्टि ही तीन्ही तत्वें निराळी असून ती कधीहि एक होणार नाहींत असें त्याचें म्हणणे होते. याच नुनारास उत्तर हिंदुस्थानांतहि अनेक साधुसंत झाले व त्यांनी शैव, वैष्णव शाक्त वगैरे पंथाचा प्रसार केला. नंतर मध्वाचार्य व वल्लभाचार्य हे दोन आचार्य झाले व त्यांनी द्वैत व शुद्धाद्वैत वैष्णव मते स्थापिली. या सर्व पंथानी ईश्वरकर्तृत्वास प्राधान्य दिले व ईश्वरी कृपा व्हावी म्हणून उपासनामार्ग बराच वादविला. याप्रमाणे ही एकांतिक्रमते बरीच निघाली व वाढली तरी भ. महावीर व म. बुद्धाच्या अहिंसेचा उपदेश ते नाकारू शकले नाहीत व तो उपदेश त्यांना आपल्या उपदेशांत गोंवावाच लागला. म्हणून जैन व बौद्धांनीं अहिंसेचा जितका प्रचार केला तितका लिंगायत, वैणव व शैवानांहि करावा लागला.
या शैव व वैष्णवांच्या लाटेंन उत्तर हिंदुस्तानांतून जनलोकसंख्या वाहून गेली असे दिसतें. राज्यहि म्लेच्छांचेच सुरू झाल्यामुळे उच्च दर्जाच्या तात्विक विवेचनाला वावच राहिला नाहीं व शैव, वैष्णवासारख्या एकेश्वरीवाद्यांची मात्र भरभराट झाली. पुढे पुढे तर नानकासारखें एकेश्वरी व निर्गुणोपासकहि अवतरले. हा महंमदी संस्कृतीचा प्रभाव होय. दक्षिणेत अगदीं थेट सोळाव्या शतकांपर्यंत जैनराजे झाल्यामुळे जैनसमाज बराच मोठा उरला होता. शव व वैष्णव राजामध्येच लठ्ठालठ्ठी विशेष चालू असे. त्याचा शेक जैनराजांनाहि लागला व शेवटी सर्वच हिंदू राज्यें महंमदी व ख्रिस्ती परदेशी सत्ताधान्यांना बळी पडली असा हा दुःखपर्यवसायी इतिहास आहे. शैव, व स्मार्त वैष्णवांच्या झटापटीत सर्व जैनब्राह्मग त्यांपैकी कोणत्यातरी मताचें झालें; कारण क्षत्रिय राजेच त्या मताचे बनले. शूद्रादि इतर सामान्यसमाजहि ज्या मताची सरशी असे त्या मताप्रमाणे वागत. वैश्य माल स्वतंत्र होते व ते आपल्या जुन्या मतांना चिकटून राहू शकत. उत्तरेंत विशेषतः मारवाड व गुजराथेंत वैश्य वर्गच तेवढा जैन राहिला आहे याचे कारण तरी हेंच होय. दक्षिणेत माल बन्याच काळपर्यंत जैन राजे असल्यामुळे राज्य गेल्यानंतर त्यांनी शेती पत्करली पण धर्म सोडला ( १२२ )
•