________________
..
महावीरचरित्र
प्रकरणांत दिल्याच आहेत. बुद्ध होण्यासहि पूर्वजन्मांतून तीन पारिमिता पूर्ण कराव्या लागतात असें बौद्धग्रंथांतून म्हटलेले आहे. मुख्य पारिमिता दहाच असून त्यांचे प्रत्येकी तीन भेद आहेत. साधारण, उप व परमार्थ असे ते तीन भेद होत. पहिली दानपारिमिता. भौतिक वस्तूंचे, दान, देहावयवदान व प्राणदान अशी तीन प्रकारची दाने केली असतां दानपारिमिता होते. शीलवतांचे पालन केल्याने शील पारिमिता होते. विरक्तावस्थेचा अभ्यास केल्याने नैसकर्मपारिमिता होते. बुद्धीचा विकास केल्याने प्रज्ञापारिमिता होते. पौरुष प्रगट केल्याने वर्यिपारिमिता होते. उत्कृष्ट प्रकारची सहनशीलता दाखविल्याने झांतिपारिमिता प्राप्त होते. सत्यव्रत पाळल्याने सत्तपारिमिता, आहिंसा किंवा दयाव्रत पाळल्याने मैत्री पारिमिता; दृढ़ संकल्प तडीस नेल्याने अदिष्ठान पारिमिता व शत्रुमिलांचे ठायीं समभाव राखल्याने उपेक्षापारिमिता प्राप्त होते. या पारिमिता प्राप्त करून घेण्यासाठी बुद्धाच्या जीवाला पूर्वी अनेक जन्म घ्यावे लागले होते व देवगतीत त्यांनी फारच थोडे जन्म घेतले असें बौद्ध ग्रंथांत वर्णन आहे. पण राजा शुद्धोदनाचे पोटी बुद्धाचा जीव देवलोकांतूनच आला होता. यावरून पूर्वभव व त्यामधील तयारी या दोहोंचे बाबतीत जनशास्त्राशी बौद्धशास्त्राची कल्पना बरीच जुळते असे दिसून येते. तीर्थकराला जसे अतिशय असतात तसे बुद्धालाहि विशेष गुण असतातं असें बौद्धशास्त्रांत मानलेले आहे. मानुषभव, पुरुषलिंग, महापुण्य, बुद्धोपासना, विरक्तता, ध्यानी, बुद्धपदावर विश्वास आणि बुद्ध होण्याचा निश्चय हे आठ गुण बुद्ध होणान्या जीवाला अवश्य आहेत. जन्मापूर्वी बुद्धाने पंच-महाविलोकन केले ते असें. शतायुषी मनुष्य, उत्तमक्षेत्र मगधदेश, जम्बुद्वीप, क्षत्रियवर्ण व महामायेची वुक्षी हे पंचमहाविलोकन बुद्धाने देवनगरीत केले. ते तुसित विमानांत संतुतुसित नामकदेव होते व तेथे सत्तावन कोटी साटलाख वर्षे आयुष्य त्याने व्यतीत केले असें बौद्ध ग्रंथांतून वर्णन आहे. संतुतुसित देवाच्या जीवानेच शुद्धोदन राजाची राणी महामाया हिच्या पोटी बुद्ध म्हणून जन्म घेतला. शुद्धोदन राजाची राजधानी कपिलवस्तु होती, व हे शाक्य गणराज्य होते. बुद्धाने वैशाख शु. २ ला जन्म घेतला. बालकाचा जन्म झाल्याबरोबर महामायेनें प्राण सोडला. ज्योतिष वगैरे पाहिल्यावर मुलगा संन्यासी होईल, असें दिसून आले, तेव्हा शुद्धोदन राजा फार खिम झाला. मुलाला वैराग्य