________________
भगवान महावीर व महात्मा बुद्ध.
दुःखसमुदाय, दुःखनिरोध व दुःखनिरोधगामिनिपतिपदा या चतुष्टयाचे ज्ञान नसणे म्हणजे बौद्धशास्त्रोत अज्ञान मानले आहे. धर्मास्तिकाय जैनशास्त्रांशिवाय अन्यत्र' कोणत्याहि शास्त्रांत नाही. याची कल्पना बौद्धांच्या पटिक्कसमुप्पाद यासंबंधीच्या कल्पनेशी जुळणारी आहे. निर्वाण व आकाशधातु याशिवाय इतर सर्व बौद्धशास्त्र अशाश्वत मानते. नरकाच्या कल्पना जैन व बौद्ध शास्त्रांत सारख्याच आहेत. संख्या व नांवें मात्र निराळी आहेत. बुद्ध व तीर्थकरांची संख्याहि समान आहे. नरकाप्रमाणेच स्वर्गलोकांचीहि कल्पना बौद्ध व जैनांची समान आहे. अर्थात् स्वर्गनरक बौद्ध मानीत नाहीत म्हणून त्यांना नास्तिक म्हणण्यांत येते असे जे म्हणतात ते चुकीचे आहे. आत्म्याचे भावी अस्तित्व ते विचारांत घेत नाहीत म्हणून नास्तिक गगले जातात. श्रावकाला काही धंदे निषिद्ध आहेत तसे बौद्ध भिक्षंच्या अनुयायांनाहि प्राण्यांची विक्री, शस्त्रव्यापार, मत्स्यविक्रय, मांसविक्रय व मदिराविक्रय हे पांच धंदे निषिद्ध आहेत. याला पनकवाणिज्य म्हटले आहे. सुखाचा मार्ग शोधून काढण्यासाठी गेल्यावर दीक्षा घेण्यापासून ते परिनिव्वाणापर्यंत म० बुद्धावर जैन तत्वज्ञानाची छाप पडत गेल्यामुळे बौद्धशास्त्रांत जैनसिद्धान्त बरेच आढळतात; पण त्यांचे पूर्णपणे आकलन न केलें गेल्यामुळे ते विपर्यस्त स्वरूपांत आढळतात. नंतरच्या बौद्धाचार्यानी तर जैनशास्त्राची नकलच केली पण तीहि विपर्यस्तच झाली. असो.
कोणत्याहि धर्मसाधनांची योजना भक्कम पायावर करावयाची असेल तर मूलसिद्धान्ताचे बाबतीत असंदिग्धपणा टेऊन चालणार नाही. म. बुद्धाची हीच चूक झाली. आत्मा म्हणजे काय ? हे विश्व काय आहे ? पुढे निर्णय कसा होईल ? चालू जन्मांतील खरें उग्न एगढ़े जरी ध्येय मानले तरी सुखाची व त्याच्या मार्गाची कल्पना येण्यास मूलभूत सिद्धान्तांचे ज्ञान होणे अगदर्दी आवश्यक आहे. म. बुद्धाला ते काही अंशी झाले होते व म्हणुनच ते काही अंशी का होईना; पण खच्या सुखाचा मार्ग उपदेशं शकले. पण तात्विक ज्ञान तितकें खोल नसल्यामुळे त्या वादविवादात आपण टिकू शकणार नाही असे म. बुद्धाला वाटले असले पाहिजे; म्हणूनच खालील प्रश्नांचे उत्तर म. बुद्धांनी दिलेले नाही. (१) लोक नित्य आहे काय ? (२) लोक अनित्य आहे काय ? (३) लोक नियमित आहे काय ? (४) लोक अनंत आहे काय ? (५) शरीर व आत्मा एकच काय ? (६) शरीर व आत्मा भिन्न आहेत काय?