________________
महावीर समकाल
सरणीत खोल उतरून कांहीं लाभ होणार नाहीं. त्यांच्या सर्व शिकविणीचे सार हेंच कीं, शुभ प्रयत्नांची मुळींच जरूर नाहीं व जी कांहीं स्वाभाविक प्रवृत्ति आहे तिला रोकण्याचीहि आवश्यकता नाहीं. त्यामुळे धर्माचरणाचा लोप व स्वेच्छाचारास पाठबळ मिळत असल्यामुळे अर्थातच या तोतया तीर्थकरांच्या नाद बहुसंख्यांक मूढ समाज लागला असल्यास त्यांत कांहींच नवल नाहीं. मनाला वाटेल तसे वागा. तुमच्या कर्माना तुम्ही जबाबदार नाहीं व तुम्हांला जाब विचारणाराहि कोणी नाहीं असें सांगणारा भेटल्यावर मूढ जनांना आणखी काय पाहिजे ? असो.
वैदिक धर्मीयांच्या लीला तर याहूनहि अधिक घातुक होत्या. त्यांनीं तर मांसाशन व सुरापान आणि इतर स्वेच्छाचार मोक्षसाधकच ठरविला होता. त्यामुळे तयागांना ऊत आला होता, मूक पशुंच्या हिंसेला सीमा नव्हती व पुरुषार्थाला थाराच नव्हता. सम्यकर्मापासून समाज फार दूर गेल्यामुळे तो दुःखाच्या खोल गर्तेत अधिकाधिक पडत होता. पण त्यांच्या धर्मगुरूंनी त्याला इतकें भारून सोडलें होतें कीं, वरवर सुखकारक दिसणारा मार्गच शाश्वत सुखदायक मोक्षाचा आहे, असेंच त्याला वाटे. अशा वेळी या मूढ जीवांना व मूक प्राण्यांना दुःखांतून सोडवून खन्या सुखाच्या मार्गाला लावणारा कोणी तरी पाहिजे होताच व अशा योग्य वेळी महावीर तीर्थंकर आल्यामुळे इतर कांहीं तीर्थंकराच्या काळाला जें महत्व आलें नाहीं में महत्व महावीरकाळाला आले यांत शंका नाहीं. उत्तरष्टवाकडील नैसर्गिक वर्णनाना वैदिकांनीं जें एकदां देवता व अर्चन मंत्र म्हणून कल्पिलें तें कायमचेच. त्या देवतांचे नांवाने अजूनहि यज्ञ चालू आहेतच. भारतीय तत्वज्ञानाची छाप जरी आयीवर पडली तरी त्यांचे एक निरच वैदिक तत्वज्ञान बनले. ईश्वर, सृष्टि, आत्मा, मोक्ष, मोक्षसाधन वगैरे कल्पना आर्याना भारतवर्षात आल्यावर जरी मुचल्या तरी मूळ भारतीय तत्वज्ञानाहून त्यांचे तत्वज्ञान अगदी भिन्न आहे. यज्ञसमारंभ हे या तत्वज्ञानाचें मुख्य अंग होय. वीरकाली तर वैदिकधर्म म्हणजे हिंसात्मक यज्ञ व तें करणें म्हणजेच धर्मसाधन अशीच हल्ली ज्याप्रमाणे हिंदुधर्म म्हणजे जातिधर्म अशी कल्पना आहे, तशी कल्पना रूढ होती. तत्वज्ञानाची चर्चा यज्ञकालीं, पितृतर्पण यज्ञकालीं, राजकीय उहापोह यज्ञकालीं, किंबहुना प्रत्येक गोष्ट यज्ञद्वारींच त्यावेळी केली जात असे. मूल जन्मल्यावर यज्ञ, अध्ययनारंभीं यज्ञ, विवाहसमयीं यज्ञ व मेल्या( ३९ )