________________
महावीरचरित्र
करून मोक्षप्राप्ती करून घेतली. ऋषभतीर्थकरांनीहि तपश्चरण करून केवल ज्ञानप्राप्ती करून घेतली व ते कैलासपर्वतावरच निर्वाणाप्रत पावले.
इ. स. पू १९७२९४७१०१ ते इ. स. पू. ३१३७ पर्यंतचा काल वेदकाल मानला जातो. वेदांच्या ऋचा निरनिराळ्या काळी व निरनिराळ्या ऋषींनी रचिलेल्या आहेत. ऋग्वेद हा एकच मूलवेद असून त्यांतील ऋचा घेऊन इतर तीन वेद रचिलेले आहेत. ऋग्वेदांतीलहि दहा मडलेच काय ती प्राचीन आहेत. या दहा मंडलांतूनच ऋषभतीर्थकरांचे नांव फार आदराने उल्लेखिलेले आहे. या शब्दाचा अर्थ वेदशास्त्रसंपन्न लोक वाटेल तसा फिरवितात; पण खालील ऋचा इतकी स्पष्ट आहे की, ती निग्रंथ जैन मुनीबद्दलच असली पाहिजे. 'ॐ पवित्रं नग्नमुपविप्रसामहे येषां नमाजाति येषां वीराः ॥ ही ती ऋचा होय. त्या वेळी कपड्याच्या अभावी इतरहि लोक नग्न रहात असतील, त्यांचा उल्लेख वरील ऋत नाही. जे पवित्र दिगम्बर मुनि आहेत व जे आत्मबलशाली आहेत, त्यांचीच आपण स्तुति करतों असें ऋषांनी म्हटले आहे. ऋग्वेद अ. १ अ. ६ वर्ग १६ ही ऋचा खालीलप्रमाणे आहे स्वस्तिनो इंद्रोवृद्धश्रवास्वस्तिनः पूषा विश्व वेदाः । स्वस्तिन स्ताक्ष्योऽरिष्टनेमिः स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु ॥" यांत नेमिनाथ तीर्थकरांचें नांव आले आहे. यज्ञमार्गी वैदिक त्या शब्दाचा अर्थ अन्नीला उद्देशून करितात पण प्राचीनकालीहि त्याचा अर्थ तोच असेल असें म्हणता येत नाही. यजुर्वेद अ. ९ मन्त्र २५ वा खालीलप्रमाणे आहे. वाजस्यन प्रसव भाबभूवे माच विश्वा भुवनानि सर्वतः । स नेमिराजा परियाति विद्वान्जां पुष्टिं वर्धयमानोऽस्मै स्वाहा ॥ जे नेमिनाथ स्वामी केवल ज्ञानाचे राने आहेत व ज्यांच्या उपदेशामुळे प्रजेला आत्मपुष्टि प्राप्त होते त्यांना स्वाहा म्हणजे त्यांचा जयजयकार असो, असा वरील मंत्रांचा भावार्थ आहे. सेमरसाचा अर्थ दारू, व भज म्हणजे स्वयंभू आत्मा या शब्दाचा अर्थ बोकट करणाऱ्या वदिकांनी वरील मंत्राचाहि अर्थ वाटेल तो केला म्हणून त्यांचे तोंड बंद कोण करणार ? ऋग्वेद अ. २ अ. ७ वर्ग १७ वी ऋचा खालील आहे. “ अर्हन बिभर्षि सायकानि धन्वाहभिष्कं यजनं विश्वरूपम् । अहन्निदं दयसे विश्वम-वं नवा ओ जीयो रुद्रत्व हस्ति"॥ हे अरिहंत, धर्मरूपी बाण, उपदेशरूपी धनुष्य व विश्वरूप प्रकाशक केवळज्ञान आपल्याजवळ आहे. तुम्ही या विश्वांतील सर्व जीवांचे रक्षण करतां. कामादि कषयांना जिंकणारा तुमच्यासारखा बलवान् दुसरा कोण आहे? असा
(१८)