________________
महावीरचरित्र
व माशाचे चैतन्य मोटारीचे चैतन्य व मुंगीतील चैतन्य; थोडक्यात सांगावयाचें म्हणजे पंच भूतांतील चैतन्य व प्राणीमागांतील चैतन्य किंवा आत्मतत्वांतील चेतन्यशक्ति व जडत्वांतील स्फुरणशक्ति यांतील भेद बहिरात्म्यांना किंवा बाळजीवांना उमगत नाही व म्हणून ते पंचभूतांच्या रसायनांतूनच आत्मतत्व उत्पन्न होईल असे मानतात किंवा हे विश्व म्हणजे एकमेव आत्मतत्वाचीच लीला आहे असे समजतात. पण या दोन्ही तत्वांतील भेद जर अनुभव चाने जाणला तर त्या दोन्ही तत्वांत जमीनअस्मानाचा फेर आहे हे कळून आल्याशिवाय राहणार नाही. चेतन व जड ही दोन्ही तत्वे शाश्वत पण परिवर्तनशील व म्हणूनच एकच स्वरूपाच्या दृष्टीने अशाश्वत आहेत. दोहोंची रूपांतर होतात पण दोन्ही कधीहि सर्वथा नाश पावत नाहीत. म्हणूनच सर्वज्ञ तीर्थकर व सिद्धांनी चेतन व जड़ ही दोन्ही तत्वे भिन्न असून अनाद्यनंत आहेत असे म्हटले आहे.
जड व चेतन ही दोन्ही तत्व अनादि व अनंत असल्यामुळे त्या दोघांचे संबंधहि अनादि व अनंतच असणार. बरेवाईट व सुखदुःख ही द्वंद्वहि त्या संबंधामुळेच उत्पन्न झाली व तीहि अनाद्यनंतच आहेत. जडाहन चैतन्य अधिक शक्तिमान व शाश्वत मुखमय आहे, असा सर्व शान्यांचा अनुभव आहे. प्राकृतिक सुखापेक्षा आत्मिक मुख श्रेष्ठ होय व जडत्वाहून स्मात्मतत्वाकडे अधिक लक्ष पुरविणे हे प्रकृतिपुरुषयुक्त अशा मानव देहधान्याचे कर्तव्य आहे असा सिद्धान्त सर्व ज्ञानी महात्म्यांनी एकमताने प्रस्थापित केलेला आहे. म्हणूनच बुद्ध आत्म-तत्व हैं बरें व जडबद्ध आत्मतत्व वाईट होय. हा बऱ्यावाईटाचा झगडा नेहमीचाच आहे, व तो सर्व धर्मग्रंथांतून वणिलेला आहे. आत्मवृत्ति व कषाय, देव व दानव, अहुरमज्द व अहिरमन बुद्ध व मार, सत्प्रवृत्ति व अमत्प्रवृत्ति, पांडव व कौरव आणि वानर व राक्षस, पवितात्मा व सेतान वगैरे झगडे ब-या व वाईट प्रवृत्तिमधीलच होत. हा झगडा प्रत्येक व्यक्तीच्या हृदयातहि सतत चालूच आहे. कधी ब-याचा प्रभाव तर कधीं वाईटाचा प्रभाव दिसून येतो. कालाचेहि उत्सर्पिणी व अवसर्पिणी असे भेद या दृष्टीनेच पडलेले आहेत. बऱ्यावाईटामध्ये कर्माजास्त प्रमाण दिसून येईल, पण सर्वस्वी नाश कधीहि होणार नाही. म्हणून धर्म व अधर्म ही दोन्ही अशी अनाद्यनंतच आहेत. वरील दृष्टीने विचार केला असता अलीकडील धर्मशास्त्र्यांची व इतिहास