Book Title: Satya Asatya Na Rahasya Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust
Catalog link: https://jainqq.org/explore/034327/1

JAIN EDUCATION INTERNATIONAL FOR PRIVATE AND PERSONAL USE ONLY
Page #1 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान कथित सत्य-असत्याचे रहस्य Page #2 -------------------------------------------------------------------------- ________________ PORAN OSHO दादा भगवान कथित सत्य-असत्याचे रहस्य मूळ गुजराती संकलन : डॉ. नीरूबहन अमीन अनुवाद : महात्मागण EAN Page #3 -------------------------------------------------------------------------- ________________ (प्रकाशक : श्री अजित सी. पटेल दादा भगवान आराधना ट्रस्ट, दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद - 380014, गुजरात. फोन - (079) 39830100 © All Rights reserved - Shri Deepakbhai Desai Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India. No part of this book may be used or reproduced in any manner whatsoever without written permission from the holder of the copyrights. प्रथम आवृत्ति : 5,000 अगस्त 2017 भाव मूल्य : 'परम विनय' आणि ___ 'मी काहीच जाणत नाही', हा भाव! द्रव्य मूल्य : 20 रुपये मुद्रक : अंबा ऑफसेट B-99, इलेक्ट्रोनीक्स GIDC, क-6 रोड, सेक्टर-25, गांधीनगर-382044 फोन : (079) 39830341 Page #4 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र વર્તમાન નીક ધીરું મંઘર માં नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाण नमो उवज्झायाणं नमो लोए सव्वसाहू एसो पंच नमुक्ारो, सव्व पावप्पणासणो मंगलाणं च सव्वेसिं, पढमं हवड़ मंगलम् ॥ १॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥२॥ ॐ नमः शिवाय ॥३॥ जय सच्चिदानंद Page #5 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान कोण? जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनवर अलोट गर्दी होती. रेल्वेच्या प्लेटफॉर्म नंबर तीनच्या बाकावर बसलेल्या श्री अंबालाल मूळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरुपात कित्येक जन्मांपासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रकट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भूत आश्चर्य! एका तासात विश्वदर्शन लाभले! मी कोण? भगवंत कोण? जग कोण चालवत आहे? कर्म म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांची रहस्ये संपूर्णपणे प्रकट झाली. अशाप्रकारे निसर्गाने विश्वाला प्रदान केले एक अद्वितीय, संपूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातच्या चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय करणारे आणि तरीही पूर्ण वीतराग पुरुष. त्यांना प्राप्ती झाली तशी ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञानाची प्राप्ती करवित असत, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोगाद्वारे. त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हटले जाते. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढणे! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग! शॉर्ट कट! ते स्वतः प्रत्येकाला 'दादा भगवान कोण?' ह्याबद्दलची फोड करून देताना म्हणायचे की, "हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत. हे तर ए.एम. पटेल आहेत. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रकट झाले ते दादा भगवान आहेत. दादा भगवान तर 'चौदालोक'चे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात आहेत आणि येथे' माझ्या आत संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! माझ्या आत प्रकट झालेले 'दादा भगवान' यांना मी पण नमस्कार करतो." व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. या सिद्धांताने त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. संपूर्ण जीवनात त्यांनी कधीही, कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत, उलट स्वत:च्या व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवित असत. Page #6 -------------------------------------------------------------------------- ________________ आत्मज्ञान प्राप्तीची प्रत्यक्ष लींक मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धि प्रदान करणार आहे. नंतर कोणीतरी हवा की नको! नंतर लोकांना मार्ग तर हवाच ना? - दादाश्री परम पूज्य दादाश्री गावोगावी, देशविदेश परिभ्रमण करून मुमुहूंना सत्संग आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करवित होते. दादाश्रींनी आपल्या हयातीतच पूज्य डॉ. नीरूबहन अमीन (नीरूमा) यांना आत्मज्ञान प्राप्त करवून देण्याची ज्ञानसिद्धी प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलयानंतर नीरूमा त्यांच्याप्रमाणेच मुमुक्षूना सत्संग व आत्मज्ञानप्राप्ती निमित्त भावाने करवित असत. पूज्य दीपकभाई देसाई यांना दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धी प्रदान केली होती. पू. नीरूमांच्या उपस्थितीतच त्यांच्याच आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कित्येक ठिकाणी जाऊन मुमुक्षूना आत्मज्ञानप्राप्ती करवून देत होते, हे कार्य नीरूमांच्या देहविलयानंतर आजसुद्धा चालूच आहे. या आत्मज्ञानप्राप्ती नंतर हजारो मुमुक्षु या संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असताना सुद्धा मुक्त राहून आत्मरमणतेचा अनुभव घेत आहेत. पुस्तकात मुद्रित वाणी मोक्षार्थीला मार्गदर्शनासाठी अत्यंत उपयोगी सिद्ध होईल, परंतु मोक्षप्राप्तिसाठी आत्मज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. अक्रम मार्गाने आत्मज्ञानप्राप्तीचा मार्ग आजसुद्धा मोकळा आहे. जसा प्रज्वलित दिवाच दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित करू शकतो, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आत्मज्ञानींकडून आत्मज्ञान प्राप्त करूनच स्वतःचा आत्मा जागृत होऊ शकतो. Page #7 -------------------------------------------------------------------------- ________________ निवेदन परम पूज्य ‘दादा भगवान' यांच्या प्रश्नोत्तरी सत्संगात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांच्या श्रीमुखातून अध्यात्म आणि व्यवहार ज्ञानासंबंधी जी वाणी निघाली, ती रेकॉर्ड करून, संकलन व संपादन करून पुस्तकांच्या रुपात प्रकाशित केली जात आहे. त्याच साक्षात सरस्वतीचे अद्भूत संकलन ह्या पुस्तकात झाले आहे, जे आम्हा सर्वांसाठी वरदानरुप ठरेल. प्रस्तुत अनुवादाची वाक्यरचना मराठी व्याकरणाच्या मापदंडावर कदाचित खरी ठरणार नाही, परंतु दादाश्रींच्या गुजराती वाणीचे शब्दशः मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणे करून वाचकांना असा अनुभव व्हावा की दादाजींचीच वाणी ऐकली जात आहे. पण तरीसुद्धा दादाश्रींच्या आत्मज्ञानाचे अचूक आशय, जसे आहे तसे तर तुम्हाला गुजराती भाषेतच अवगत होईल. ज्यांना ज्ञानाचा गहन अर्थ समजून घ्यायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी या हेतुने गुजराती भाषा शिकावी अशी आमची नम्र विनंती आहे. अनुवादातील त्रूटींसाठी आपली क्षमा प्रार्थितो. वाचकांना... ह्या पुस्तकातील मुद्रित पाठ्यसामग्री मूळत: 'सत्य-असत्य ना रहस्यो' या गुजराती पुस्तकाचे मराठी अनुवाद आहे. * जिथे जिथे 'चंदुभाऊ' या नावाचा उल्लेख केला आहे, तिथे वाचकांनी स्वत:चे नाव समजून वाचन करावे. पुस्तकातील कोणतीही गोष्ट जर तुम्हाला समजली नाही, तर प्रत्यक्ष सत्संगात येऊन त्याचे समाधान मिळवावे अशी नम्र विनंती. दादाश्रींच्या श्रीमुखातून निघालेले काही गुजराती शब्द जसेच्या तसे 'इटालिक्स' मध्ये ठेवले आहेत, कारण त्या शब्दांसाठी मराठीमध्ये तसेच कोणतेही शब्द उपलब्ध नाहीत की ज्यामुळे त्याचा अर्थ पूर्णपणे समजता येईल. पण तरीही त्या शब्दाचे समानार्थी शब्द () कंसात लिहिलेले आहेत. Page #8 -------------------------------------------------------------------------- ________________ संपादकीय सत्याला समजण्यासाठी, सत्याला प्राप्त करण्यासाठी प्रत्येक परमार्थी जीव तोडून पुरुषार्थ करीत असतो. पण सत्य-असत्याची यथार्थ भेदरेखा न समजल्याने गोंधळून जातो. सत्, सत्य आणि असत्य, अशा तीन प्रकारे स्पष्टीकरण देऊन आत्मज्ञानी संपूज्य दादाश्रींनी सर्व गुंतागुंतीस सुलभतेने सोडवले आहे. सत् म्हणजे शाश्वत तत्व आत्मा. आणि सत्य-असत्य हे तर व्यवहारात आहे. व्यवहार सत्य सापेक्ष आहे. दृष्टीबिंदच्या आधारे आहे. जसे मांसाहार करणे हे हिंदूंसाठी चुकीचे आहे पण मुस्लिमांसाठी ते बरोबर आहे. यात सत् कुठे आले? सत् सर्वांना स्वीकार्य असते. यात काही परिवर्तन होत नाही. ब्रह्म सत्य आणि जगही सत्य आहे. ब्रह्म रियल सत्य आहे आणि जग रिलेटिव सत्य आहे. हा सिद्धांत देऊन दादाश्रींनी कमालच केली. ह्या जगाला मिथ्या मानणे कुणाच्याही मनास पटत नाही. प्रत्यक्ष अनुभवास येणाऱ्या वस्तुला मिथ्या कशाप्रकारे मानू शकतो?! तर मग खरे काय? ब्रह्म अविनाशी सत्य आहे आणि जग विनाशी सत्य आहे! त्यामुळे इथे समाधान होऊन जाते. मोक्षमार्गात सत्याची अनिवार्यता किती? जिथे पुण्य-पाप, शुभअशुभ, सुख-दुःख, चांगल्या-वाईट सवयी यांसारख्या अनेक द्वंदांचा अंत येतो, जिथे रिलेटिवला स्पर्श करणारा एक परमाणू सुद्धा राहत नाही, अशा द्वंद्वातीत दशेत, ‘परम सत् स्वरुपात', जगाने मानलेले 'सत्य' किंवा 'असत्य' कितपत 'खरे' ठरते? जिथे रियल सत् आहे तिथे व्यवहारातील सत्य किंवा असत्य ग्रहणीय किंवा त्याज्य न होता निकाली होतात, ज्ञेय स्वरुप बनतात! संसार सुखाची कामना आहे तोपर्यंत व्यवहार सत्याची निष्ठा आणि असत्याची उपेक्षा गरजेची आहे. चुकून असत्याचा आश्रय घेतला तर तिथे 'प्रतिक्रमण' रक्षक बनते. पण जिथे आत्मसुखाच्या प्राप्तीची आराधना Page #9 -------------------------------------------------------------------------- ________________ सुरु होते, स्वत:च्या परम सत् स्वरुपाची भजना सुरु होते, तिथे व्यवहार सत्य-असत्याची भजना किंवा उपेक्षा समाप्त होते, तिथे मग व्यवहार सत्याचा आग्रह पण अंतरायरुप बनतो! व्यवहार सत्यही कसे असायला हवे? हित, प्रिय आणि मित असेल तरच त्या सत्याला सत्य म्हटले जाते. वाणी, वर्तन आणि मनाने सुद्धा कुणाला किंचित्मात्र दु:ख न देणे हे आहे मूळ सत्य, पण ते व्यवहार सत्य आहे! अशाप्रकारे 'ज्ञानीपुरुष' व्यवहार सत्याची उपेक्षा न करता त्यांना त्यांच्या यथास्थानावर प्रस्थापित करून यथार्थ समज देतात! ह्या सत्, सत्य आणि असत्याची सर्व रहस्ये इथे प्रस्तुत संकलनात उलगडली जातात, जे जीवनाच्या मार्गात संतुष्टी देतात! -डॉ. नीरूबहन अमीन Page #10 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य सत्य, विनाशी आणि अविनाशी प्रश्नकर्ता : सत्य आणि असत्य, या दोन्हींमधील फरक काय ? असत्य दादाश्री : असत्य हे तर असत्य आहेच. परंतु हे जे सत्य आहे ना, ते व्यवहार सत्य आहे, खरे सत्य नाही. हा जावई तो काय कायमचा जावई नसतो, सासरा सुद्धा कायमचा नसतो. निश्चय सत्य असते त्यास सत् म्हटले जाते, ते अविनाशी असते. आणि जे विनाशी असते त्यास सत्य म्हटले जाते. पण पुन्हा हे सत्य देखील असत्य होऊन जाते, ठरते. पण तरी सांसारिक सुख पाहिजे असेल तर असत्यावरुन सत्यावर आले पाहिजे. आणि मोक्षाला जायचे असेल तर हे (व्यवहार) सत्यही जेव्हा असत्य ठरेल तेव्हा मोक्ष होईल ! म्हणजे हे सत्य आणि असत्य दोन्हीही फक्त कल्पितच आहेत. पण ज्याला सांसारिक सुख पाहिजे, त्याने सत्याची कास धरावी की ज्यामुळे दुसऱ्यांना दुःख होणार नाही. परम सत्य (सत्) प्राप्त करेपर्यंतच या सत्याची गरज आहे. 'सत्' मध्ये नाही कधी बदल अर्थात् हे जे ‘सत्य-असत्य' आहे ना, ह्या जगाचे जे सत्य आहे ना, ते भगवंतांपुढे पूर्णपणे असत्यच आहे, ते सत्य नाहीच. हे सर्व पापपुण्याचे फळ आहे. जग तुम्हाला 'चंदुभाऊ 'च ( चंदुभाऊच्या जागी वाचकाने स्वत:चे नाव समजायचे) म्हणेल ना ? प्रश्नकर्ता : हो. दादाश्री : तेव्हा भगवंत म्हणतील, 'नाही, तुम्ही शुद्धात्मा आहात'. सत् एकच प्रकारचे असते, कुठेही गेलात तरी प्रत्येक जीवात सत् एकाच Page #11 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य रहस्य प्रकारचे असते. सत् तर अविनाशी आहे. आणि हे सत्य तर प्रत्येकाचे वेगवेगळे असते, म्हणून ते विनाशी ठरते. हे सत्य खोटेपणाच्या आधारावर टिकून आहे. 2 प्रश्नकर्ता : सनातन सत्य यास तुम्ही मानता का ? दादाश्री : सनातन सत्य नाही, पण सनातन सत् आहे. हे 'इटर्नल' (शाश्वत) म्हटले जाते. मूळ तत्व अविनाशी आहे आणि त्याची अवस्था विनाशी आहे. प्रश्नकर्ता : मग सत्य म्हणजे काय ? दादाश्री : एक आहे व्यवहार सत्य, जे संपूर्ण जगात रिलेटिव सत्य म्हणून ओळखले जाते आणि एक आहे रियल सत्य, त्यास सत् म्हटले जाते, त्यास सत्य म्हटले जात नाही. अविनाशी अस्तित्वाला 'सत्' म्हणतात आणि विनाशी अस्तित्वाला 'सत्य' म्हणतात. नाही सामावत, सत् कशातही ... प्रश्नकर्ता : मग सत् म्हणजे काय ? दादाश्री : सत्चा दुसरा काही अर्थ नाहीच. सत् म्हणजे कुठलीही वस्तू जी अविनाशी असते, तिला सत् म्हणतात. त्याचा दुसरा कुठलाही अर्थ नाहीच ह्या जगात. फक्त एक सत् हेच ह्या जगात अविनाशी आहे आणि ते कुठल्याही वस्तुत सामावेल असे नाही, या हिमालयाच्याही आरपार निघून जाईल असे ते आहे. त्याला भिंतींचे बंधन किंवा असे कोणतेही बंधन नडत नाही ! रिलेटिव सत्याचे उद्भवस्थान ? प्रश्नकर्ता : आत्म्याचे एक सत्य आहे. पण हे दुसरे रिलेटिव सत्य, हे कशाप्रकारे उत्पन्न झाले ? दादाश्री : झाले नाही, आधीपासूनच आहे. रिलेटिव आणि रियल आहेच! आधीपासूनच रिलेटिव आहे. हा तर मी इंग्रजी शब्द बोललो, Page #12 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य बाकी त्याचे नाव गुजराती भाषेत 'सापेक्ष' आहे. सापेक्ष शब्द ऐकला आहे का? तर सापेक्ष आहे की नाही हे जग ? ! हे जग सापेक्ष आहे आणि आत्मा निरपेक्ष आहे. सापेक्ष म्हणजे रिलेटिव, इंग्रजीत रिलेटिव म्हणतात. हल्लीचे लोक गुजराती भाषेचा सापेक्ष शब्द समजत नाही, म्हणून मी 'रिलेटिव' हा इंग्रजी शब्द बोलतो. तुम्ही चकीत झालात की काय ? ! 3 दोन प्रकारचे सत्य आहे. एक रिलेटिव सत्य आहे आणि एक रियल सत्य आहे. रिलेटिव सत्य समाजाच्या आधीन आहे, कोर्टाच्या आधीन आहे. मोक्षासाठी ते उपयोगी पडत नाही. ते तुम्हाला 'डेवलपमेन्ट'चे साधन म्हणून उपयोगी पडेल, डेवलपमेन्टसाठी उपयोगी ठरते. आपले नाव काय ? प्रश्नकर्ता : चंदुभाऊ. दादाश्री : चंदुभाऊ हे रिलेटिव सत्य आहे. ते अगदीच खोटे नाही. ते इथे तुम्हाला ‘डेवलप' होण्यासाठी उपयोगी होते. पण जेव्हा स्वत: च्या स्वरुपाला ओळखायचे असेल, तेव्हा ते सत्य उपयोगी पडणार नाही. तेव्हा तर हे सत्य अगदीच खोटे ठरेल. पुन्हा 'हे माझे सासरे आहेत' असे बोलतो, पण ते कुठपर्यंत बोलेल ? बायकोने 'डायवोर्स' घेतला नाही तोपर्यंत. हो, नंतर म्हणायला गेलो की 'माझे सासरे' तर ? प्रश्नकर्ता : नाही म्हणू शकत. दादाश्री : म्हणून हे सत्यच नाही. हे तर रिलेटिव सत्य आहे. प्रश्नकर्ता: ' सासरे होते' असे म्हटले तर ? प्रश्नकर्ता : 'होते' असे म्हटले तरी शिव्या देतील. कारण त्याचे डोके फिरले आहे आणि आपण असे म्हणाल, त्यापेक्षा मेरी भी चूप आणि तेरी भी चूप! आता रिलेटिव सत्य रिलेटिवमधूनच उत्पन्न होते, असा नियम आहे. आणि रिलेटिव सत्य म्हणजे विनाशी सत्य. जर तुम्हाला हे सत्य, विनाशी Page #13 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य सत्य आवडत असेल तर त्यातच खुष राहा. आणि जर हे आवडत नसेल तर ह्या रियल सत्यात या. 4 व्यक्ति-व्यक्तिंचे भिन्न सत्य प्रश्नकर्ता : सत्य प्रत्येकाचे वेगवेगळे असते का ? दादाश्री : सत्य प्रत्येकाचे वेगवेगळे असते, पण सत्याचा प्रकार एकच असतो. हे सर्व रिलेटिव सत्य आहे, हे विनाशी सत्य आहे. व्यवहारात सत्याची गरज आहे, पण ते सत्य निरनिराळे असते. चोर म्हणेल, 'चोरी करणे हे सत्य आहे. ' लबाड म्हणेल, 'लबाडी करणे हे सत्य आहे.' आपापले सत्य वेगवेगळे असतात. असे घडते की नाही ? प्रश्नकर्ता : घडते. दादाश्री : ह्या सत्याला भगवंत सत्य मानतच नाहीत. इथे जे सत्य आहे ना, ते तिथे सत्य धरले जात नाही. कारण, हे विनाशी सत्य आहे, रिलेटिव सत्य आहे. आणि तिथे तर हे रिलेटिव चालणार नाही, तिथे तर रियल सत्य पाहिजे. सत्य आणि असत्य हे दोन्ही द्वंद्व आहेत, दोन्ही विनाशी आहते. प्रश्नकर्ता : तर 'सत्य आणि असत्य' हे आपण स्वत:च मानून घेतले आहे का ? दादाश्री : सत्य आणि असत्य हे आपल्याला मायेमुळे दिसत असते की 'हे खरे आणि हे खोटे.' आणि पुन्हा हे 'सत्य आणि असत्य' सर्वांसाठी सारखे नाही. तुम्हाला जे सत्य वाटते ते दुसऱ्याला असत्य वाटते. ह्यांना जे असत्य वाटत असेल ते दुसऱ्यांना सत्य वाटते. अर्थात् सर्वांचे (मत) एकसारखे नाही. अरे, चोर काय म्हणतात की, 'भाऊ, चोरी करणे हा तर आमचा धंदा आहे. त्यात तुम्ही आमची निंदा का करता? आणि आम्ही तुरुंगातही जातो पण त्यात तुम्हाला का खटकते ? ! आम्ही आमचा धंदा करीत आहोत.' चोर, ही सुद्धा एक 'कम्युनिटी' (समाज) आहे. एक आवाज आहे ना, त्यांचा! खाटीक स्वतःचा धंदा करत असेल तर तो Page #14 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य आपल्याला म्हणेल, 'भाऊ, आम्ही आमचा धंदा करत आहोत. त्यात तुम्हाला काय अडचण आहे? प्रत्येकजण आपापल्या सत्याला सत्य म्हणत असतो, तर यात सत्य कशास म्हणावे? प्रश्नकर्ता : हे व्यवहार सत्य अनेकांगी आहे ना? दादाश्री : हे सर्व तर अनेकांगीच आहे. पण ते विनाशी आहे. हे व्यवहार सत्य, रिलेटिव सत्य मात्र विनाशी आहे. प्रश्नकर्ता : तुम्हाला सापेक्ष सत्य म्हणायचे आहे का? दादाश्री : हो, हे सापेक्ष सत्य आहे. म्हणजे हे जे जगाचे सत्य आहे ना, ते सापेक्ष सत्य आहे. आपल्या देशात जे नाणे चालत असेल ते नाणे इतर देशात चालत नाही. एका ठिकाणी जे सत्य मानले जात असेल, ते दुसऱ्या देशात सत्य मानले जात नाही. म्हणजे काहीही पद्धतशीर नाही. सत्य म्हणजे अनुभवातून मिळवलेले सार! तुमचे सत्य वेगळे, त्यांचे सत्य वेगळे, ह्यांचे सत्य वेगळे आणि पुन्हा कॉमन सत्य ते सुद्धा वेगळे. प्रश्नकर्ता : जे सत्य आहे त्या सत्यापर्यंत आपण पोहचू शकतो, पण सत्याला प्राप्त करू शकत नाही, असे म्हटले जाते. दादाश्री : हो, ते प्राप्त करू शकत नाही. हे जे सत्य आहे ना, ते सर्व स्वत:च्या 'व्हयू पॉइंट'चे सत्य आहे. आता 'व्हयू पॉइंट'च्या सत्यामधून खूप विचारवंतांनी कॉमन सत्य शोधून काढले, की कॉमन सत्य काय असले पाहिजे! हा विचारवंतांचा शोध आहे. हेच कॉमन सत्य आहे, त्यास कायद्याच्या रुपात ठेवले. बाकी, तेही सत्य नाही, ते सर्व व्यवहार सत्य आहे. म्हणजे एका अंशापासून ते तीनशे साठ अंशापर्यंतचे जे सत्य आहे ते सर्व निरनिराळे सत्य असते, शिवाय ते मतभेदवालेही असतात. म्हणून त्याचा कोणी थांग लावू शकत नाही. जे रियल सत्य असते त्यात बदल नसतो. तिथे सर्व एकमतच असते. रियल सत्य एक मतवाले असते. रिलेटिव सत्य वेगवेगळ्या मतांचे असते, वस्तुतः ते सत्य नाही. Page #15 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य रहस्य निश्चय म्हणजे पूर्ण सत्य आणि व्यवहार म्हणजे ठराविक मर्यादेपर्यंतचे सत्य होय. 'असत्' नसते भगवंतांकडे म्हणून सत्य आणि असत्य, ह्या दोन्ही 'वस्तू' नाहीतच. हा तर सामाजिक शोध आहे. म्हणून हे सर्व सामाजिक आहे, बुद्धिला धरुन आहे. काही समाजात दुसऱ्यांदा लग्न करणे हा गुन्हा आहे आणि फॉरेन वाले एका तासात पुन्हा लग्न करतात, त्यास ते लोक कायदेशीर मानतात. म्हणून ते वेगळे-वेगळे आहे, ही सापेक्ष गोष्ट आहे. पण ते सत्य अमुक नियमाच्या आत लपलेले आहे. प्रश्नकर्ता : सत्य आणि असत्य जे आहे, त्यात 'एडजस्टमेन्ट' कशा प्रकारे करावी? दादाश्री : सत्य आणि असत्य ही भ्रांतिजन्य वस्तू आहे. भगवंतांकडे एकच आहे. आणि हे तर लोकांनी दोन्ही वेगळे केले आहे. तुमच्यासाठी मांसाहार करणे ही हिंसा आहे आणि मुसलमानांसाठी मांसाहार करणे ही अहिंसा आहे. म्हणजे हे सर्व 'सब्जेक्टिव' (सापेक्ष) आहे आणि भगवंतासाठी तर एकच वस्तू आहे, एक पुद्गलच आहे. जसे भगवंतांकडे आहे तसे मला वर्तते आणि ते मी तुम्हाला शिकवतो. पण हे लोक तर यातच गुंतले, सब्जेक्टमध्ये गुंतले, त्यामुळे हे सर्व ज्ञान निघून गेले. बाकी, भगवंतांकडे असे सत्य आणि असत्य नाहीच. हे सर्व तर विनाशी आहे. आपण एकाच वस्तुचे दोन भाग पाडले. म्हणून हे सर्व सत्य असत्य आहे. हे सत्य खरेतर सामाजिक स्वभाव आहे. हो, सामाजिक रचना आहे. समाजात समोरासमोर दुःख होऊ नये म्हणून अशी रचना करण्यात आली. प्रश्नकर्ता : हे पण रिलेटिव सत्यच आहे ना? दादाश्री : हो, आहे रिलेटिव सत्य! पण त्यात सामाजिक रचना केली आहे की, 'भाऊ, हे सत्य मानले जाणार नाही.' तुम्ही घेतले आहे Page #16 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य रहस्य म्हणून तुम्ही असे जर म्हणाल की, 'हो, मी घेतले आहे.' आणि 'नाही घेतले' असे म्हणाल तर? सत्य म्हणजे काय? की जसे घडले असेल तसे सांगा, म्हणजे समाजाने ही रचना केली आहे, सत्याचा स्वीकार केला अशा रितीने! प्रश्नकर्ता : आंबा खाल्ला आणि तो गोड लागला, तर ही सत्य घटना म्हटली जाईल ना? दादाश्री : नाही, ही सत्य घटना नाही, तसेच असत्यही नाही. हे रिलेटिव सत्य आहे, रियल सत्य नाही. रिलेटिव सत्य म्हणजे जे सत्य काही वेळाने नाश पावणार आहे. म्हणून त्या सत्याला सत्य म्हणूच शकत नाही ना! सत्य तर कायमचे असले पाहिजे. देवी-देवतांची सत्यता कोणी म्हणेल, ‘ह्या शासन देवी वगैरे सर्व वास्तवात सत्य आहे ?' नाही, हे रियल सत्य नाही, रिलेटिव सत्य आहे. म्हणजे कल्पित सत्य आहे. जसे हे सासू, सासरे आणि जावई असा व्यवहार चालत असतो ना, तसाच हा देवी-देवतांबरोबर व्यवहार चालतो. जोपर्यंत इथे संसारात आहे आणि संसार सत्य मानलेला आहे, राँग बिलीफलाच राईट बिलीफ मानली आहे, तोपर्यंत याची गरज पडेल. स्वरुप, संसाराचे आणि आत्म्याचे... हा संसार म्हणजे काही अशी तशी वस्तू नाही, आत्म्याचा विकल्प आहे. स्वतः कल्प स्वरुप आणि हा संसार विकल्प स्वरुप! दोनच आहेत. विकल्पही काही काढून टाकण्यासारखी बाब नाही. विकल्प हे रिलेटिव सत्य आहे आणि कल्प हे रियल सत्य आहे. म्हणून ह्या संसाराचे जाणलेले सर्वच कल्पित सत्य आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत ना, ते सर्व कल्पित सत्य आहे. पण कल्पित सत्याचीही गरज आहे, कारण की स्टेशनवर जायचे असेल तर वाटेत जो बोर्ड आहे, ते कल्पित सत्य आहे. पण त्या बोर्डाच्या आधाराने आपण पोहोच शकतो ना? तरी देखील ते कल्पित सत्य आहे, वास्तवात ते सत्य नाही. आणि Page #17 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य रहस्य वास्तविक सत्य जाणल्यानंतर काहीही जाणून घेण्याचे उरत नाही आणि कल्पित सत्य कितीही जाणले तरी त्याचा अंत येत नाही. अनंत जन्मांपर्यंत जाणत राहिलो तरीही त्याचा अंत येत नाही. कमतरतेने सर्जित केले स्थापित मूल्य प्रश्नकर्ता : स्थापित मूल्य एखाद्या गुणधर्माच्या कारणाने बनले आहे का? दादाश्री : कमरतरतेच्या कारणाने! ज्याची कमतरता त्याची खूप किंमत !! बाकी, गणाचे एवढे महत्वच नाही. सोन्यात असे काही खास गुण नाहीत, तसे काही गुण आहेत, पण टंचाईमुळे त्याला किंमत आहे. आता जर खाणीतून भरपूर सोने निघू लागले, तर काय होईल? किंमत कमी होणार. प्रश्नकर्ता : सुख-दुःख, सत्य-असत्य, ह्या द्वंद्ववाल्या वस्तू आहेत. त्यांना सुद्धा स्थापित मूल्यच म्हणतात ना? या जगात खरे बोलण्याला किंमती म्हटले आहे, खोटे बोलण्याला चांगले म्हटले नाही. दादाश्री : हो, हे सर्व स्थापित मूल्यच आहेत आणि ही गोष्ट सुद्धा तशीच आहे. ते मूल्य आणि हे मूल्य एकच आहे. तुम्ही जे मानता की, 'हे खरे आहे आणि हे खोटे आहे' हे सर्व स्थापित मूल्यच मानले जाते. हे सर्व अज्ञानाचेच काम आहे. आणि ते ह्या भ्रांत स्वभावाने ठरवले गेले आहे, हा सर्व भ्रांत स्वभावाचा न्याय आहे. कोणत्याही स्वभावात न्याय तर असतो ना! म्हणून ही स्थापित मूल्ये सर्व वेगळ्या प्रकारची आहेत. अर्थात् हे 'सत्य-असत्य' सारे व्यवहारापुरते आहे. भगवंतांच्या दृष्टीने... ह्या व्यवहार सत्याचा, रिलेटिव सत्याचा दुराग्रह बाळगू नये. ते मूळ स्वभावानेच असत्य आहे. रिलेटिव सत्य कोणास म्हणतात? की समाज व्यवस्था निभावण्यापुरते सत्य! समाजापुरते सत्य, ते भगवंतापुढे सत्य नाही. जर भगवंताला आपण विचारले की, 'की हा असे छान काम करत Page #18 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य आहे.' तेव्हा भगवंत म्हणतात, हा ह्याचे फळ भोगेल आणि तो त्याचे फळ भोगेल. जसे पेरेल तसे फळ भोगेल. त्यात मला काही घेणे-देणे नाही. आंबा लावेल तर आंबा मिळेल, आणि दुसरे काही लावेल तर दुसरे मिळेल ! 9 प्रश्नकर्ता : हे असे का ? भगवंताने त्यात थोडातरी फरक केला पाहिजे ना ? दादाश्री : फरक केले तर ते भगवंतच नाहीत. कारण भगवंतासाठी ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. प्रश्नकर्ता : पण व्यवहारात जर असे करत गेलो तर अनर्थ होईल. दादाश्री : व्यवहारात असे करू नये. पण भगवंताकडे असा वेगळेपणा नाही. ते तर दोघांना समानच पाहतात. भगवंत कुणाचाही पक्षपात करत नाहीत. हो, कसे समंजस आहेत भगवंत ! समजदार आहेत ना ? ! आपल्या इथे तर कर्जबाजारीही असतात आणि श्रीमंत माणसेही असतात. आपले लोक कर्जबाजारी व्यक्तिला कुत्सित नजरेने पाहतात आणि श्रीमंताचे गुणगान गातात. पण भगवंत असे नाहीत. भगवंताला कर्जबाजारीही सारखे आणि श्रीमंतही सारखे. दोघांना रिझर्वेशन सारखेच देतात ! प्रश्नकर्ता : आपण हे निश्चितपणे कसे सांगू शकतो की भगवंतांने दोघांना समानच पाहिले आहे ? ! दादाश्री : कारण की देव द्वंद्वातीत आहेत, म्हणून द्वंद्वाला एक्सेप्ट (स्वीकार) करीत नाहीत. द्वंद्व हे संसार चालवण्यासाठीचे साधन आहे आणि भगवंत तर द्वंद्वातीत आहेत. म्हणून आपण असे म्हणू शकतो की भगवंत हे दोन्हीही एक्सेप्ट करीत नाहीत. व्यवहाराला ज्यांनी खरे मानले, त्यांना प्रेशर, हार्टअॅटॅक आणि असे सर्व झाले आणि व्यवहाराला ज्यांनी खोटे मानले ते तगडे झाले. दोन्ही किनाऱ्यावरील रखडत राहिले. व्यवहारात असूनही आम्ही वीतराग आहोत ! Page #19 -------------------------------------------------------------------------- ________________ 10 सत्य-असत्याचे रहस्य सत्य उभे असत्याच्या आधारावर... प्रश्नकर्ता : सत्य, खोट्याच्या आधारावर आहे, हे कशा प्रकारे? दादाश्री : सत्य कशा प्रकारे ओळखले जाईल? खोटे अस्तित्वात आहे म्हणून तर सत्य ओळखले जाते. म्हणजे हे सत्य तर असत्याच्या आधारावर टिकून राहिले आहे आणि असत्याचा आधार आहे म्हणून हे सत्य पण असत्यच आहे. बाहेर जे सत्य म्हटले जाते ना, त्याचा आधार काय? ते कशामुळे सत्य म्हटले जाते? असत्य आहे म्हणून सत्य म्हटले जाते. त्याचा आधार असत्य असल्या कारणाने ते स्वतः पण असत्य आहे. परम सत्च्या प्राप्तीचा पुरुषार्थ प्रश्नकर्ता : ते परम सत्य मिळविण्यासाठी मनुष्याने काय पुरुषार्थ करावा? दादाश्री : जगाला जे सत्य वाटते ते सत्य जेव्हा तुम्हाला विपरीत वाटेल तेव्हा तुम्ही सत्च्या बाजूने जाल. म्हणजे एखाद्याने चंदुभाऊला (आपल्याला) दोन शिव्या दिल्या तर मनात असे वाटेल की ते 'आपल्याला सत्कडे जाण्यासाठी ढकलत आहे. असत्कडे प्रत्येक जण ढकलतो पण सत्कडे जाण्यासाठी धक्का कोण मारणार? या जगातील लोकांचे जे विटामीन आहे ते परम सत् प्राप्त करण्यासाठी 'विष-पॉइजन' आहे. आणि ह्या लोकांचे-जगाचे जे विष आहे ते परम सत् प्राप्त करण्यासाठी विटामीन आहे. कारण, दोघांची दृष्टी वेगळी आहे, दोघांची रीत वेगळी आहे, दोघांची मान्यता वेगळी आहे. प्रश्नकर्ता : बरेच लोक निरनिराळे मार्ग दाखवतात. जसे की 'जप करा, तप करा, दान करा.' तर काही लोक नकारात्मक मार्ग दाखवितात की 'हे नका करू, ते नका करू.' तर यात खरे कोणते? दादाश्री : हे जप-तप-दान, हे सर्व सत्य म्हटले जाईल आणि सत्य म्हणजे विनाशी! आणि जर परम सत्य तुम्हाला पाहिजे असेल तर Page #20 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य ते सत् आहे आणि ते सत् अविनाशी असते. सत्चाच अनुभव करण्याची गरज आहे. जे विनाशी आहे त्याचा अनुभव निरर्थक आहे. प्रश्नकर्ता : तर परमसत्याची प्राप्ती कशा प्रकारे होईल? दादाश्री : 'मी कोण आहे' याचे भान नाही, पण 'मी आहेच' असे भान झाले म्हणजे परम सत्याची प्राप्ती होण्याची सुरुवात झाली. इथे तर 'मी आहे' याचेही भान नाही. हे तर, 'डॉक्टर साहेब, मी मरून जाईन' असे म्हणता! 'मी कोण आहे' याचे भान होणे ही तर नंतरची गोष्ट आहे. पण 'मी आहेच, माझे अस्तित्व आहेच,' असे भान झाले तर परम सत्याच्या प्राप्तीची सुरुवात झाली. अस्तित्व तर आहे, अस्तित्वाचा स्वीकारही केला आहे, पण अजून त्याचे भान झाले नाही. आता स्वत:ला स्वत:चे भान झाले म्हणजेच परम सत्याची प्राप्ती झाली. 'मी चंदुभाऊ आहे' अशी मान्यता आहे तोपर्यंत परम सत्य प्राप्त होतच नाही. 'चंदुभाऊ तर माझे नाव आहे आणि मी तर आत्मा आहे' अशी प्राप्ती झाली, आत्म्याचे भान झाले तर परम सत्य प्राप्त होते. 'मी तर आत्मा' हेच सत् आता खरे सत् कोणते? तुम्ही आत्मा आहात, अविनाशी आहात हे खरे सत् आहे ! ज्याचा कधी विनाश होत नाही ते खरे सत्. जे भगवंत आहे ते सत्च म्हटले जातात. बाकी, जगाने तर सत् पाहिलेलेच नाही. सत्ची तर गोष्टच कुठे असते! आणि हे जे सत्य आहे ते तर शेवटी असत्यच आहे. ह्या संसारातील जी सगळी नावे दिली गेली आहेत ते सगळेच सत्य आहे, पण विनाशी आहे. आता 'चंदुभाऊ' हे व्यवहारात खरे आहे, ते सत्य आहे पण भगवंतांकडे हे असत्य आहे, कशामुळे? स्वतः निनावी आहे. जेव्हा हा 'चंदुभाऊ' नामी (नाव असलेला) आहे. म्हणून त्याची तिरडी निघणार. पण निनावीची तिरडी निघत नाही. नाव असणाऱ्याची तिरडी निघते. पण निनावीची तिरडी निघते का? म्हणून हे सत्य व्यवहारापुरतेच सत्य आहे. नंतर ते असत्य होऊन जाते. Page #21 -------------------------------------------------------------------------- ________________ 12 सत्य-असत्याचे रहस्य 'मी चंदुभाऊ आहे' हे नावाच्या आधाराने खरे आहे, पण खरोखर 'तुम्ही कोण आहात' ह्या आधाराने खोटे आहे. खरोखर तुम्ही कोण आहात हे जर जाणून घेतले तर तुम्हाला वाटेल की हे खोटे आहे. आणि तुम्ही 'चंदुभाऊ' कुठपर्यंत? तर जोपर्यंत तुम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही 'चंदुभाऊ' आणि 'ज्ञान' प्राप्त झाल्यानंतर वाटते की 'चंदुभाऊ' सुद्धा असत्य आहे. सत्य, पण काळानुसार सत्य हे सापेक्ष आहे, पण जे सत् आहे ते निरपेक्ष आहे, त्यास कोणतीही अपेक्षा लागू होत नाही. प्रश्नकर्ता : सत् आणि सत्यात दुसरा काय फरक असेल? दादाश्री : सत्य विनाशी आहे आणि सत् अविनाशी आहे. दोन्ही स्वभावाने वेगळे आहेत. सत्य हे जगाला लागू होते, व्यवहाराला लागू होते आणि सत् हे निश्चयाला लागू होते. म्हणून व्यवहाराला जे सत्य लागू होते ते विनाशी आहे. आणि सच्चिदानंदचे सत् हे अविनाशी आहे, परमनन्ट आहे. बदलू शकतच नाही, सनातन आहे. जेव्हा सत्य तर वेळोवेळी बदलत राहते, त्यास पालटण्यास वेळ लागत नाही. प्रश्नकर्ता : म्हणजे सत्य हे आपल्या दृष्टीने सनातन नाही? दादाश्री : सत्यही सनातन वस्तू नाही, सत् हे सनातन आहे. हे सत्य तर काळाच्या आधाराने बदलत राहते. प्रश्नकर्ता : हे कशा प्रकारे? जरा समजवा. दादाश्री : काळानुसार सत्य बदलते. भगवान महावीरांच्या काळात जर कधी भेसळ केली ना, तर लोक त्यांना ठार मारुन जाळून टाकायचे. आणि आता? हा काळ तर असा आला आहे, की सगळीकडे भेसळ केलेलेच मिळत असते ना?! म्हणजे हे सत्य नेहमी बदलतच राहणार. ज्यास पूर्वीचे लोक बहुमूल्य वस्तू मानत होते, त्यास आपण निरर्थक समजून फेकून देतो. पूर्वीचे लोक ज्यास सत्य मानत होते त्यास आपण Page #22 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य असत्य मानतो. म्हणजे काळानुसार सत्यात परिवर्तन होतच राहते. म्हणून ते सत्य कालवर्ती आहे, सापेक्ष सत्य आहे आणि शिवाय विनाशी आहे. जेव्हा सत् म्हणजे अविनाशी. 13 सत्चा स्वभाव प्रश्नकर्ता : सत्-चित्- आनंद शब्दात जे सत् आहे ते सत् आहे की सत्य आहे ? आणि हे सत्य वेगळे आहे का ? दादाश्री : हे सत्य तर वेगळीच गोष्ट आहे. ह्या जगात ज्यास सत्य म्हटले जाते, ती पूर्णपणे वेगळीच गोष्ट आहे. सत्चा अर्थच हा आहे की ते अविनाशी असते. अविनाशी असते आणि त्याचबरोबर गुण-पर्याय सहित असते, तसेच अगुरु-लघु स्वभावाचे असते. अगुरु-लघु म्हणजे जे पूरण होत नाही, गलन होत नाही, वाढत नाही, कमी होत नाही, बारीक होत नाही, त्यास सत् म्हटले जाते. आत्मा हे सत् आहे. नंतर पुद्गल हे सुद्धा सत् आहे. मूळ जे पुद्गल आहे, परमाणुंच्या स्वरुपात ते सत् आहे, ते विनाशी नाही. त्यात पूरण- गलन होत नाही. सत् कधीही पूरण- गलन स्वभावाचे नसते. आणि जिथे पूरण- गलन आहे ते असत् आहे, विनाशी आहे. ‘देअर आर सिक्स इटर्नल्स इन धीस ब्रह्मांड ! ' ( ब्रह्मांडात अशी सहा शाश्वत तत्वे आहेत) या इटर्नल्स ना सत् लागू होते. सत् अविनाशी असते आणि सत्चे अस्तित्व आहे, वस्तुत्व आहे आणि पूर्णत्व आहे. उत्पाद - व्यय - ध्रौव जिथे आहे, तिथे सत् आहे!! आपल्याला या जगात समजण्यासाठी सत् म्हणायचे असेल तर आत्मा हे सत् आहे, शुद्ध चैतन्य हे सत् आहे. फक्त शुद्धात्माच नाही पण इतरही पाच तत्वे आहेत. पण ती अविनाशी तत्वे आहेत. त्यांना पण सत् म्हटले जाते. ज्याचे त्रिकाळ अस्तित्व आहे ते सर्व सत् म्हटले जाते आणि सामान्य व्यावहारिक भाषेत जे सत्य म्हटले जाते, ते त्या सत्याच्या अपेक्षेने असत्य म्हटले जाईल. ते तर क्षणात सत्य आणि क्षणात असत्य ! सच्चिदानंद आणि सुंदरम् हे सत् सच्चिदानंदचे सत् आहे. सत्-चित्-आनंद (सच्चिदानंद) यात जे सत् आहे ते इटर्नल सत् आहे आणि हे सत्य, व्यावहारिक सत्य हे तर भ्रांतिचे सत्य आहे. Page #23 -------------------------------------------------------------------------- ________________ 14 सत्य-असत्याचे रहस्य काय जगत् मिथ्या? म्हणून तुम्हाला जी विचारपूस करायची असेल ती करा. सर्व स्पष्टीकरण करून देईन. आत्तापर्यंत तुम्ही जे ज्ञान जाणले ते जाणलेले ज्ञान भ्रांतिज्ञान आहे. भ्रांतिज्ञान म्हणजे त्यात वास्तविकता नसते. जर वास्तविकता असती तर आत शांती राहिली असती, आनंद राहिला असता. आत तर संपूर्ण आनंदाचे धाम आहे! पण ते प्रकट का होत नाही? कारण वास्तविकतेत आलातच नाहीत ना! अजून तर 'फॉरेन' लाच 'होम' मानता. 'होम' तर पाहिलेलेच नाही. इथे तुम्ही सर्वकाही विचारु शकता, या जगातील कुठलीही अध्यात्म संबंधित असलेली गोष्ट विचारु शकता. मोक्ष काय आहे, मोक्षात काय आहे, ईश्वर काय आहे, हे सर्व कशाप्रकारे निर्माण झाले, आपण कोण आहोत, बंधन काय आहे, कर्ता कोण आहे, कशाप्रकारे जग चालते, हे सर्व तुम्ही इथे विचारु शकता. म्हणजे काही विचारपूस कराल तर खुलासा मिळेल. हे जग काय आहे? हे जे सर्व दिसते ते सर्व खरे आहे, मिथ्या आहे की खोटे आहे? प्रश्नकर्ता : खोटे आहे. दादाश्री : खोटे म्हणूच शकत नाही ना! खोटे कसे म्हणू शकतो? समजा ह्या इथे एखाद्याच्या मुलीला पळवून नेत असेल तर खोटे म्हणू. परंतु आपल्या मुलीला पळवून नेत असेल तेव्हा? खोटे म्हणूच कसे शकतो? तर मग हे जग खरे असेल की मिथ्या असेल? प्रश्नकर्ता : जगाला तर मिथ्या म्हटले गेले आहे ना! दादाश्री : जग मिथ्या असू शकत नाही. हे काय मिथ्या असेल? जग जर मिथ्या असेल तर मग काही हरकतच नाही ना? मग तर निवांतपणे चोराला सांगू की, 'काही हरकत नाही. हे तर मिथ्यात्व आहे ना!' रस्त्यावर एकही पैसा पडलेला दिसतो का? लोकांचे पैसे पडत नसतील? सगळ्यांचे पैसे पडतात, पण लगेच उचलून नेतात. म्हणजे पुन्हा रस्ता जसा होता तसा! म्हणून असा विचार करायला हवा. या जगाला मिथ्या म्हणूच कसे शकतो?! Page #24 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य पैसा कधीही रस्त्यात पडलेला राहत नाही, सोन्याची वस्तुही कधी पडलेली राहत नाही. अरे, नकली सोन्याचे असेल तर तेही उचलून घेऊन जातात. ___अर्थात् मिथ्या काहीही नसतेच. मिथ्या तर, जेव्हा दुसऱ्या कोणाच्या खिशातून लाख रुपये चोरले जातील ना, तेव्हा म्हणेल, 'अरे जाऊ द्या ना, ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या आहे! पण जेव्हा तुझे स्वत:चे पैसे चोरले जातील तेव्हा समजेल मिथ्या आहे की नाही! असे वाक्य बोलून लोकांनी दुसऱ्यांचे खिसे कापयाला लावले. वाक्य तर एक्ॉक्ट असले पाहिजे, माणसाला फिट (लागू) होईल असे असले पाहिजे. तुम्हाला असे नाही का वाटत की फिट होईल असे वाक्य असायला पाहिजे? प्रश्नकर्ता : हो, बरोबर आहे. दादाश्री : हे सर्व सुख सत्य नाही वाटत? प्रश्नकर्ता : वाटते. दादाश्री : खोटे असते तर कधीच सोडून पळून गेले असते. आणि हाच तर सत्याचा पुरावा आहे. म्हणून तर लोक यात मजा करतात. जिलबी खाल्ली असेल ना, त्याचीही चव येते आणि लोकं आंबे खात नसतील का? तेव्हा हे काय नकली आहे का? पुन्हा हे जग मृगजळासारखेही नाही. लोकांनी सांगितले 'मृगजळासारखे आहे!' पण ओहोहो! हे तर करेक्ट आहे. आत जळजळ होत असेल, तेव्हा कित्येकांना रात्रभर झोपही येत नाही! म्हणून या जगाला मिथ्या कसे म्हणता येईल? 'मिथ्या' म्हटले तर आपण खरे मानूया का? रात्री झोपी गेला असेल, तोंड थोडेसे उघडे असेल, आणि तोंडात जराशी मिरची घातली की मग आपण त्याला उठवावे लागेल? जर मिथ्या असेल, तर उठवावे लागले असते. हा तर आपोआपच जागा होतो ना! दुसऱ्यांना तर म्हणतील, 'भाऊ शांत रहा, तो मुलगा तर मेला, आता शांत रहा.' आणि जेव्हा स्वतःचा मुलगा मरतो तेव्हा?! स्वत:चा मुलगा Page #25 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य मरेल तेव्हा मिथ्यात्व दाखवा ना तुम्ही! हे तर दुसऱ्याचा मुलगा मरतो तेव्हा म्हणेल मिथ्यात्व(!) हे जग मिथ्या आहे हे खरे आहे का? हे तर परक्यासाठी मिथ्या, बरं का! स्वतः मात्र रडत बसतो! आपण शांत राहण्यास सांगू तेव्हा म्हणेल, 'भाऊ, मला तर रात्रभर आठवत होते, मी विसरुच शकत नाही.' अरे, तू तर मिथ्या म्हणत होतास ना? मग आता इथे 'ब्रह्म सत्य, जग मिथ्या' बोल ना! समजा आता जर एखादा माणूस स्वतःच्या बायकोसोबत जात असेल आणि कोणीतरी येऊन त्याच्या बायकोला पळवून नेले, तेव्हा काय तो पती 'मिथ्या आहे, मिथ्या आहे' असे बोलेल? काय बोलेल? तो तर सत्य मानूनच व्यवहार करेल ना? की मग 'मिथ्या आहे, मिथ्या आहे, घेऊन जा' असे म्हणेल? जग, रिलेटिव सत्य 'ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या' ही गोष्ट शंभर टक्के राँग आहे. जग मिथ्या ही गोष्ट खोटी आहे. प्रश्नकर्ता : सत्य आणि मिथ्या असे म्हटले गेले, यात सत्य हे कशाप्रकारे सत्य? आणि मिथ्या हे कशाप्रकारे मिथ्या? दादाश्री : हो, म्हणजे हे जग कधीही मिथ्या असू शकत नाही. ब्रह्म पण सत्य आहे आणि हे जग सुद्धा सत्य आहे. ब्रह्म हे रियल सत्य आहे आणि जग हे रिलेटिव सत्य आहे. बस, इतकाच फरक आहे. ब्रह्म अविनाशी करेक्ट आहे आणि जग विनाशी करेक्ट आहे. दोन्हींच्या करेक्टनेसमध्ये काही कमतरता नाही. जग सुद्धा सत्य आहे, असे स्पष्टपणे म्हटले पाहिजे ना? ज्या गोष्टीला मागून कोणी फुली मारेल ते काय कामाचे? 'ब्रह्म रियल सत्य आहे आणि जग रिलेटिव सत्य आहे' त्यास कोणी फुली मारू शकत नाही ना, ऍट एनी टाईम (कधीही)!! हे प्रतिभासित सत्य नव्हे प्रश्नकर्ता : संसार हे प्रतिभासित सत्य आहे, बाकी तर सर्वत्र ब्रह्मच आहे, असे म्हणतात ना? Page #26 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य दादाश्री : सर्वत्र ब्रह्मही नाही आणि प्रतिभासित सत्यही नाही. हे जग तर रिलेटिव सत्य आहे. ही बायको, हे प्रतिभासित सत्य आहे का? असे... खांद्यावर हात ठेवून चित्रपट बघायला जातात ना! एखादे मूल पण सोबत असते. म्हणजे हे रिलेटिव सत्य आहे, ही काही थाप नाही. प्रतिभासित नाही हे. प्रतिभासित तर कोणास म्हणतात? की आपण तलावात पाहिले आणि त्यात आपले तोंड दिसते हे प्रतिभासित म्हटले जाते. हे तर भ्रांतीच्या डोळ्यांनी सर्वकाही दिसते आणि ते अगदीच खोटेही नाही. व्यवहार आहे. व्यवहाराने हे सत्य आहे आणि आत्मा रियल सत्य आहे. हा सगळा व्यवहार रिलेटिव सत्य आहे. म्हणजे हे जे दिसते ती भ्रांती नाही, हे मृगजळ नाही. तुम्ही आत्मा आहात हे रियल सत्य आहे, हे सनातन आहे. मिथ्या मानले तर भगवंताची भक्ति होईल का? मग तर ती भक्ति सुद्धा मिथ्या झाली(!) म्हणजे जगत् मिथ्या ही गोष्टच खोटी आहे. लोक चुकीचे समजले आहेत. त्यांना अचूक समज दिली पाहिजे ना? हेही सत्य आहे, पण ते रिलेटिव सत्य आहे. प्रश्नकर्ता : म्हणतात ना की संपूर्ण जग जरी सोन्याचे झाले, पण आमच्यासाठी तर ते तृणवत् (गवतासमान) आहे ?! । दादाश्री : तृणवत तर खरे. पण तृणवत् ही वेगळी स्थिती आहे. प्रश्नकर्ता : संपूर्ण जग खरकट्यासारखे आहे असे म्हटले आहे ना दादाश्री : खरखट्यासारखे, तेही अमक्या परिस्थितीत. जगास खरखट्यासारखेही म्हणता येणार नाही. जगास आम्ही जसे आहे तसेच म्हणतो. एक मनुष्य मला म्हणाला की, 'तुम्ही या जगाला रिलेटिव सत्य का म्हणता? पूर्वीच्या शास्त्रकारांनी या जगाला मिथ्या म्हटले आहे ना!' त्यावर मी म्हणालो, हे जे मिथ्या म्हटले आहे ते साधु-आचार्यांसाठी म्हटले आहे, त्यागी लोकांसाठी म्हटले आहे. म्हणजे ते संसारी लोकांसाठी Page #27 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य म्हटलेले नाही. साधकांना उद्देशून म्हटले आहे. त्यास हे व्यवहारातील संसारी लोक धरुन बसले आहेत. म्हणजे मग ती चूक होणारच ना?! लोक उलटेच समजले. लोक तर चोपडण्याचे औषध पिऊन टाकतील असे आहेत. ज्यांनी हे औषध दिले असेल, (त्यांनी) हा शब्द ह्या अपेक्षेने म्हटला आहे. त्यागी लोकांना त्याग करण्याच्या अपेक्षेने म्हटले आहे. आता जर लावण्याचे औषध पिऊन टाकले तर काय होईल? खलास होऊन जाईल, सर्व संपून जाईल! 'जग मिथ्या' असे म्हटले तर साधकांना यात रस-रुची राहत नाही आणि त्यांचे चित्त मग आत्म्याकडे राहते. म्हणून 'मिथ्या' म्हटले आहे. हे तर एक हेल्पिंग प्रॉब्लेम (अडचणींमध्ये सहाय्य करणारा) आहे. वास्तवात ही एक्झेक्टनेस नाही. तरच मिळते सत्याचे स्पष्टीकरण म्हणून आम्ही सत्य, रिलेटिव सत्य आणि मिथ्या असे तीन भाग पाडले. जेव्हा की जगाने दोनच भाग पाडले, सत्य आणि मिथ्या. पण तो दुसरा भाग लोकांना एक्सेप्ट होत नाही ना! 'चंदुभाऊने माझे बिघडवले' एवढेच जर ऐकण्यात आले, तो सांगणारा नंतर विसरुनही गेला असेल पण ही गोष्ट तुम्हाला रात्री हैराण करते. मग त्यास मिथ्या कसे म्हणू शकतो? आणि समजा आपण भिंतीला दगड मारला आणि नंतर झोपून गेलो, तरीही भिंतीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. म्हणून आपण तीन भाग पाडले की एक सत्य, दुसरे रिलेटिव सत्य आणि तिसरे मिथ्या! जेणेकरून त्याचे सविस्तर स्पष्टीकरण मिळते. अन्यथा असे स्पष्टीकरण मिळणारच नाही ना! फक्त आत्म्यालाच जर सत्य म्हटले तर काय हे जग पूर्णपणे असत्यच आहे ? मिथ्या आहे हे? यास मिथ्या म्हणूच कसे शकतो? जर मिथ्या आहे तर विस्तवावर हात ठेवून पाहा. मग लगेच समजेल की 'मिथ्या आहे की नाही!' जग रिलेटिव सत्य आहे. हे ज्यामुळे रडू येते, दुःख होते, भाजले जाते, त्याला मिथ्या कसे म्हणायचे?! प्रश्नकर्ता : जग मिथ्या म्हणजे इल्युजन नाही का? Page #28 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य दादाश्री : जग इल्युजन (भ्रम) नाहीच! जग आहे, पण सापेक्षित सत्य आहे. आपण या भिंतीला मारले आणि माणसाला मारले या दोन्हींत फरक असतो. भिंतीला मिथ्या म्हणायचे असेल तर म्हणू शकतो. आगीची ज्वाळा दिसते पण खरोखर तिथे आग लागलेलीच नसते, त्यास इल्युजन म्हणतात. 'मिथ्या' बोलून तर बिघडविले आहे सर्व. ज्याच्या आधारावर जग चालते त्यास मिथ्या म्हणायचेच कसे?! हे जग तर आत्म्याचा विकल्प आहे. ही काही अशी तशी वस्तू नाही. त्यास मिथ्या कसे म्हणायचे?! सुखाचे सिलेक्शन हे रिलेटिव सत्य टिकणारे नाही. जसे हे सुख टिकणारे नाही, तसे हे सत्य सुद्धा टिकणारे नाही. तुम्हाला जर टिकाऊ हवे असेल तर 'पलीकडे' जा आणि ज्याला तकलादी हवे असेल, तकलादीतच खूष राहण्याची ज्याला सवय असेल, तो यातच राहील. यात काय चुकीचे सांगितले ? हे तर 'ज्ञानी'चे शब्द आहेत की भाऊ, हे नाशवंत आहे, यात जास्त गुंतू नका, जास्त रममाण होऊ नका. अशा हेतुने हे सर्व सांगण्यात आले आहे. म्हणून तुम्हाला तात्पुरते सुख हवे असेल तर ते रिलेटिव सत्यात शोधा आणि शाश्वत सुख हवे असेल तर रियल सत्यात शोधा! तुम्हाला जशी आवड असेल तसे करा. तुम्हाला विनाशीत राहायचे आहे की रियलमध्ये राहायचे आहे? प्रश्नकर्ता : रियलमध्ये राहायचे आहे. दादाश्री : असे?! म्हणून आपले विज्ञान सांगते की ब्रह्मही सत्य आहे आणि जगतही सत्य आहे. जग विनाशी सत्य आहे आणि ब्रह्म अविनाशी सत्य आहे. सर्व सत्यच आहे. सत्याच्या बाहेर तर काही चालणारच नाही ना! जोपर्यंत तुम्हाला विनाशी आवडत असेल, विनाशी परवडत असेल, तोपर्यंत तेही सत्य आहे, तुम्ही त्यात राहा आणि जर ते विनाशी आवडत नसेल आणि तुम्हाला सनातन पाहिजे असेल तर अविनाशीत या. Page #29 -------------------------------------------------------------------------- ________________ 20 सत्य-असत्याचे रहस्य विश्वातील सत् वस्तू.... आतापर्यंत जे जाणले होते ते लौकिक होते. लोकांनी मानलेले, त्यास लौकिक म्हणतात आणि जे वास्तविक आहे त्यास अलौकिक म्हणतात. मग तुम्हाला वास्तविक जाणून घ्यायचे आहे की लौकिक जाणून घ्यायचे आहे ? प्रश्नकर्ता : वास्तविक. दादाश्री : त्याचे असे आहे, सहा अविनाशी तत्वांनी हे जग बनलेले आहे. प्रश्नकर्ता : पण पाच तत्वे आहेत ना ? दादाश्री : कोणकोणती ? प्रश्नकर्ता: पृथ्वी, जल, आकाश, तेज आणि वायु. दादाश्री : हे आकाश तत्व तर अविनाशी आहे आणि पृथ्वी, जल, वायु आणि तेज हे विनाशी आहेत. ही चार तत्वे मिळून एक तत्व तयार होते, ते तत्व पुन्हा अविनाशी आहे. ज्यास पुद्गल परमाणू म्हणतात, ते अविनाशी आहे आणि परमाणू रुपी आहे. म्हणजे ही जी चार तत्वे, पृथ्वी, जल, वायु आणि तेज आहेत, ते रुपी आहेत. म्हणजे तुम्ही जी पाच तत्वे सांगितली ना, ते तर दोनच तत्वे आहेत. या जगात ही पाच तत्वे मानली जातात आणि आत्म्याला सहावे तत्व मानले जाते, पण असे नाही. जर असे असते तर मग सगळा निकाल केव्हाच होऊन गेला असता. प्रश्नकर्ता : म्हणजे आपला असा अभिप्राय आहे की विश्वात मूळ सहा तत्वे आहेत! दादाश्री : हो, सहा तत्वे आहेत आणि हे जगत् सहा तत्वांनीच बनलेले आहे. ही अंतिम गोष्ट सांगतो. यात डोकं चालवण्यासारखे नाही. ही बुद्धिची पण गोष्ट नाही. ही बुद्धिच्याही पलीकडची गोष्ट आहे, म्हणजे ही चर्चेची गोष्ट नाही. हे कायमस्वरुपी, परमनन्ट लिहून घ्यायचे असेल तर लिहू शकतो. त्यात काहीच हरकत नाही, दुसऱ्या साऱ्या विकल्पी गोष्टी आहेत Page #30 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य आणि तेही ज्याने इथपर्यंत पाहिले तर इथपर्यंतचे लिहीले गेले, आणि कोणी त्याच्याही पुढचे पाहिले तर तिथपर्यंतचे लिहीले गेले. पण हे तर (दादाश्रींचे) संपूर्ण पाहिल्यानंतरचे दर्शन आहे आणि हे वीतरागांचे दर्शन आहे! महाव्रतही व्यवहार सत्यच प्रश्नकर्ता : शास्त्रकारांनी सत्याला महाव्रतात धरले आहे ना! तर ते सत्य कोणते आहे? दादाश्री : ते व्यवहार सत्य! निश्चयाने सर्व चुकीचे!! प्रश्नकर्ता : तर सत्य महाव्रतात त्या लोकांनी कशाकशाचा समावेश केला आहे? दादाश्री : जे सत्य मानले जाते त्याचा. असत्य तर लोकांना दुःखदायी होते. संसारातील धर्म, नाही तो मोक्षाचा मार्ग असे आहे ना, की हे सत्य-असत्य ह्या वस्तुच मोक्षासाठी (कामाच्या) नाहीत. हे तर संसारमार्गात दाखविले की हे पुण्य आणि पाप, ही सर्व साधने आहेत. पुण्य कराल तर कधीतरी मोक्षमार्गाकडे वळू शकाल. मोक्षमार्गाकडे कसे वळू शकतो? घर बसल्या-बसल्या खायचे मिळाले तर मोक्षमार्गाकडे वळू शकेल ना? पूर्ण दिवस कष्ट करण्यातच घालवेल तर मोक्ष कसा मिळेल? म्हणून पुण्याची प्रशंसा केली आहे, ह्या लोकांनी. बाकी मोक्षमार्ग तर फार सरळ आहे, सहज आहे, सुगम आहे. संसारमार्ग म्हणजे नात्यांची साखळी आणि इथे मोक्षमार्गात नातीच नाहीत. 'नो रिलेशन'!! प्रश्नकर्ता : तर ज्याने संसाराच्या सर्व प्रकारच्या धर्मांचे पालन केले असेल, त्यालाही मोक्षाची लिंक मिळू शकेल याची खात्री नाहीच ना? दादाश्री : मोक्षाची तर गोष्टच करायची नाही! ह्या अज्ञानाच्या जेवढ्या स्लाइस पाडल्या त्या सर्व प्रकाशरुप नसतात. एक सुद्धा स्लाइस प्रकाश देणारी असते का? Page #31 -------------------------------------------------------------------------- ________________ 22 सत्य-असत्याचे रहस्य प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : या बटाट्याच्या 'स्लाइसीस' केल्या, तर काय त्यात एखादी कांद्याची स्लाइस निघेल ? प्रश्नकर्ता : नाही. सगळ्या बटाट्याच्याच 'स्लाइस' निघतात. 4 दादाश्री : अशाप्रकारे हे लोक 'स्लाइसीस' करीत रहातात की 'आता उजेड येईल, आता येईल...' अरे, पण नाही येत. ह्या तर सर्व अज्ञानतेच्या स्लाइसीस ! अनंत जन्म डोकेफोड करून मरून जाशील, उलटे डोके करून देह टांगशील तरीही काही निष्पन्न होणार नाही. ते तर ज्यांनी (मोक्ष) मार्गाला प्राप्त केले आहे तेच तुला हा मार्ग प्राप्त करवितील, जाणकार असतील ते मार्ग प्राप्त करवितील. असे जाणकार तर नाहीत. उलट संसारात गुंतवणारे जाणकार आहेत, ते तुम्हाला गुंतवून टाकतील! सत्य काय? असत्य काय ? प्रश्नकर्ता : खरे आणि खोटे यात किती फरक आहे ? दादाश्री : तुम्ही एखाद्याला पाचशे रुपये दिले असतील, आणि नंतर तुम्ही त्याला विचारले की, 'मी तुम्हाला पैसे दिले होते' आणि तो जर खोटे बोलला की 'नाही दिले', तर तुम्हाला कसे वाटेल ? तुम्हाला दुःख होईल की नाही ? प्रश्नकर्ता : होईल. दादाश्री : मग तेव्हा आपल्याला समजेल ना, की 'खोटे' हे खराब आहे, दु:खदायी आहे ? प्रश्नकर्ता : हो, बरोबर आहे. दादाश्री : आणि खरे बोलला तर सुखदायी वाटते ना? खरी वस्तू स्वतःला सुख देईल आणि खोटी वस्तू दुःख देईल. म्हणजे खऱ्याची किंमत तर असतेच ना ? खऱ्याचीच किंमत. खोट्याची काय किंमत ? खोटे हे दुःखदायी असते! Page #32 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य 23 त्यातही सत्य, हित, मित आणि प्रिय आपण सत्य, हित, प्रिय आणि मित याप्रकारे काम करावे, एखादे गिहाईक आले तर त्याला प्रिय वाटेल अशाप्रकारे बोलावे, त्याला हितकारी होईल अशा गोष्टी कराव्यात. अशी वस्तू देऊ नये की जी त्याला निरुपयोगी असेल. म्हणून आपण त्याला सांगावे की, 'भाऊ, ही वस्तू तुमच्या कामाची नाही.' तेव्हा कोणी म्हणेल की, 'असे जर खरे सांगितले तर आम्ही धंदा कसा करावा? अरे, तू कोणत्या आधारावर जगत आहेस? कोणत्या हिशोबाने तू जगत आहेस? ज्या हिशोबाने तू जगत आहेस त्याच हिशोबाने धंदा चालेल. कोणत्या हिशोबाने हे लोक सकाळी उठत असतील? रात्री झोपून गेले, आणि मरून गेले तर? पुष्कळ माणसे अशी सकाळी पुन्हा उठलीच नव्हती! हे कशाच्या आधारावर? म्हणून भीती बाळगण्याची गरज नाही. प्रामाणिकतेने व्यापार कर. मग जे होईल ते खरे, पण असा हिशोब करत बसू नकोस. खऱ्याला ऐश्वर्य प्राप्त होते. जसजशी सत्यनिष्ठा आणि असे सर्व गुण असतील, तसतसे ऐश्वर्य प्रकट होते. ऐश्वर्य म्हणजे काय, तर प्रत्येक वस्तू त्याला घर बसल्या मिळते. त्याचा विश्वास कोण करणार? दादाश्री : कधी खोटे बोलतो का? प्रश्नकर्ता : बोलतो. दादाश्री : बऱ्यापैकी! प्रश्नकर्ता : नाही, कमी प्रमाणात. दादाश्री : कमी प्रमाणात बोलतो. खोटे बोलण्याने काय नुकसान होत असेल? आपल्यावरचा विश्वास उडूनच जातो. विश्वास बसतच नाही ना! प्रश्नकर्ता : समोरच्याच्या लक्षात येत नाही, असे मानून बोलतो. दादाश्री : हो, असे बोलतो, पण विश्वास उडून जातो. Page #33 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य एखाद्या वेळेस तुला बोरीवली स्टेशनवर पाठवले असेल, आणि त्यावेळी तुला तुझा मित्र भेटला, म्हणून तू स्टेशनला न जाता त्याच्याशी गप्पा मारत बसलास. किंवा तुला सांगितले असेल की तू जा, दादांना पाहून ये, आले आहेत की नाही, पाच वाजता येणार होते, आणि तू येऊन सांगितलेस, की दादा काही आलेले नसावेत. पण मी सत्संगात आलो असेन, आणि हे जर सगळ्यांना कळले, तेव्हा मग विश्वास उडून जातो. विश्वास गेला म्हणजे माणसाची किंमत खलास. 24 आपण खोटे बोलतो, कोणी आपल्याशी खोटे बोलतो तेव्हा आपल्याला समजायला हवे की हा मनुष्य माझ्याशी इतके खोटे बोलतो, तेव्हा मला एवढे दुःख होते, मग मी जर कुणाशी खोटे बोललो तर त्याला किती बरे दुःख होईल ? हे तुला समजते ना ? की नाही समजत ? ... तर सिग्नल शक्ति निघून जाते प्रश्नकर्ता : हे लोक जे धंदा करतात, जसे खिसा कापण्याचा किंवा चोरी करण्याचा, तेव्हा त्यांच्या आतील आत्मा त्यांना कधी सिग्नल देत असेल की नाही ? दादाश्री : एक-दोनदा चोरीचे सिग्नल देतो. आत्मा तर यात पडतच नाही म्हणा. एक-दोनदा आतून सिग्नल मिळतो की, 'हे करण्यासारखे नाही.' पण ते सिग्नल ओलांडले (दुर्लक्ष केले) की मग संपले, एकदा ओलांडले म्हणजे सिग्नलची शक्ति संपली. सिग्नल लागला असताना सुद्धा गाडीने सिग्नल ओलांडला तर सिग्नलची शक्ति निघून गेली. सिग्नल लागला नसताना ओलांडले जाणे ही वेगळी गोष्ट आहे. प्रश्नकर्ता: खऱ्या माणसांचे नेहमी शोषण होते आणि खोटी (अप्रामाणिक) माणसं आहेत ते गुंडगिरी किंवा वाईट कामच करतात, मौजमजा करतात, ते कसे काय ? दादाश्री : खरी माणसं तर खिसा कापायला गेली की लगेच पकडली जातात. आणि खोटा माणूस तर संपूर्ण आयुष्य करीत असेल तरीही तो पकडला जात नाही ! निसर्ग त्याला मदत करतो. पण त्या खऱ्या Page #34 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य 25 माणसाला निसर्ग मदत करत नाही, त्याला लगेच पकडवून देतो! त्याचे काय कारण असेल? प्रश्नकर्ता : कारण खऱ्या माणसाकडून काही चुकीचे काम होऊ नये म्हणून. दादाश्री : नाही, निसर्गाची इच्छा त्याला उच्च गतित घेऊन जाण्याची आहे. म्हणून त्याला सुरुवातीपासूनच ठोकर मारुन जागेवर ठेवतो. आणि त्या दुसऱ्याला खालच्या गतित घेऊन जाणार आहे. म्हणून त्याला मदत करत असतो. तुम्हाला नाही समजले का? खुलासा झाला की नाही? झाले मग! पुण्य-पाप, असे विभागले जातात तेथे प्रश्नकर्ता : कित्येक लोक खोटे बोलतात तरीही ते सत्यात मोडते. आणि कित्येक लोक खरे बोलतात तरीही ते खोट्यात मोडते. हे कसले पझल (कोडे) आहे? दादाश्री : ते त्याच्या पाप आणि पुण्याच्या आधारावर घडत असते. त्याच्या पापाचा उदय असेल तेव्हा तो खरे बोलला तरीही खोट्यात खपवले जाते. आणि जेव्हा पुण्याचा उदय असतो तेव्हा तो खोटे बोलला तरीही लोक त्याचे खरे मानून स्वीकारतात, त्याने कितीही खोटे केले तरी ते चालते. प्रश्नकर्ता : यात त्याला काही नुकसान नाही का? दादाश्री : नुकसान तर आहे, पण पुढील जन्माचे. या जन्मात तर त्याला मागील जन्माचे फळ मिळाले. आणि हे जे आता खोटे बोलला ना, त्याचे फळ त्याला पुढील जन्मी मिळेल. आता तर त्याने हे बीज टाकले. बाकी, हा काही अंदाधुंदी कारभार नाही की काहीही चालवून घेतले जाईल! तिथे अभिप्राय बदलावा आता तुम्ही दिवसभरात एखादे तरी कर्म बांधता का? आज Page #35 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य कोणकोणते कर्म बांधले? जे बांधाल ते तुम्हाला भोगावे लागेल. स्वत:ची जबाबदारी आहे. यात देवाची कुठल्याही प्रकारची जबाबदारी नाही. प्रश्नकर्ता : आपण खोटे बोललो असू, ते पण कर्म बांधले असेच म्हटले जाईल ना? दादाश्री : नक्कीच! पण खोटे बोलला असाल, त्याहीपेक्षा तुम्ही जे खोटे बोलण्याचे भाव करता ना, ते जास्त मोठे कर्म म्हटले जाईल. खोटे बोलणे हे तर समजा कर्मफळ आहे. पण खोटे बोलण्याचे भाव, खोटे बोलण्याचा आपला निश्चय, त्यामुळे कर्म बांधले जाते. आपल्या लक्षात आले का? हे वाक्य काही मदत करेल का तुम्हाला? कसे मदत करेल? प्रश्नकर्ता : खोटे बोलणे थांबवले पाहिजे. दादाश्री : नाही. खोटे बोलण्याचा अभिप्रायच सोडायला हवा. आणि खोटे बोलले गेले तर पश्चाताप झाला पाहिजे की, 'काय करू? असे खोटे बोलायला नको होते.' पण आता खोटे बोलणे बंद होणार नाही पण खोटे बोलण्याचा अभिप्राय मात्र बंद होईल. 'आजपासून खोटे बोलणार नाही, खोटे बोलणे हे महापाप आहे, दुःखदायी आहे आणि खोटे बोलणे हेच बंधन आहे', असा तुमचा अभिप्राय झाला तर तुमचे खोटे बोलण्याचे पाप बंद होऊन जाईल. आणि या पूर्वी जोपर्यंत तुम्ही हे भाव बंद केले नव्हते, तोपर्यंतच्या त्याच्या ज्या रिएक्शन्स आहेत तेवढ्या बाकी राहतील. तेवढा हिशोब तुमच्या समोर येईल. त्यामुळे मग तुम्हाला तेवढे खोटे अनिवार्यपणे बोलावेच लागेल. तेव्हा तुम्ही त्याचा पश्चाताप करा. आता जरी त्याचा पश्चाताप केला तरीही तुम्ही जे खोटे बोललात त्या कर्मफळाचेही फळ तर येणारच. आणि ते पुन्हा भोगावेच लागेल. म्हणजे तुम्ही ज्यांच्याशी खोटे बोलले असाल, ते लोक बाहेर तुमची बदनामी करतील की, काय हे चंदुभाऊ, चांगला शिकलेला माणूस, चक्क खोटे बोलला?! हीच काय त्याची लायकी?! म्हणजे पुन्हा बदनामीचे फळही भोगावे लागेल, जरी पश्चाताप केला असेल तरीही. आणि जर पहिल्यापासूनच ते पाणी बंद केले असेल, कॉजेस (कारण)च बंद Page #36 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य करण्यात आले, तर मग कॉजेसचे फळ आणि त्याचेही पुन्हा फळ, हे येणार नाही. __म्हणून आम्ही काय सांगतो? जरी खोटे बोलले गेले, पण 'खोटे बोलायला नको' असा तुझा विरोध आहे ना? हो, तर मग तुला खोटे बोलणे आवडत नाही हे नक्की झाले, असे म्हटले जाईल. खोटे बोलण्याचा तुझा अभिप्राय नाही ना, मग तुझी जबाबदारी संपली. प्रश्नकर्ता : पण ज्याला खोटे बोलण्याची सवयच असेल, त्याने काय करावे? दादाश्री : त्याने मग त्याचबरोबर प्रतिक्रमण करण्याची सवयही करून घ्यावी लागेल. आणि त्याने जर प्रतिक्रमण केले तर मग जबाबदारी आमची आहे. म्हणून अभिप्राय बदला! खोटे बोलणे हे जीवनाचा अंत करण्यासारखे आहे, जीवनाचा अंत आणणे आणि खोटे बोलणे हे दोन्ही एकसमान आहे, असे 'ठरवावे लागते. आणि पुन्हा सत्याचे शेपूटही धरुन बसू नका. द्रव्यात खोटे, भावात सत्य प्रश्नकर्ता : हा जो आम्ही व्यापार करतो, त्यात कुणाला सांगितले की, 'तू माझा माल वापर, तुला त्यातून एक-दोन टक्के देऊ.' हे तर खोटेच काम आहे ना? दादाश्री : खोटे काम होत आहे, ते तुम्हाला आवडते की नाही आवडत? प्रश्नकर्ता : आवडणे हा तर दुसरा प्रश्न आहे. पण आवडत नसेल तरीही करावे लागते, व्यवहारासाठी. दादाश्री : हो. म्हणून जे करावे लागते, ते अनिवार्य आहे. तर यात तुमची इच्छा काय आहे? असे करायचे की नाही करायचे? प्रश्नकर्ता : असे करण्याची इच्छा नाही, पण तरी करावे लागते. Page #37 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य दादाश्री : हे इच्छा नसताना अनिवार्यपणे करावे लागते, त्याचा पश्चाताप झाला पाहिजे. अर्धा तास बसून पश्चाताप केला पाहिजे, की 'हे करायचे नाही तरीही करावे लागते.' आपला पश्चाताप जाहीर केला म्हणजे आपण गुन्ह्यातून सुटलो. असे करण्याची आपली इच्छा तर नाही, तरीही ते जबरदस्तीने करावे लागते, याचे प्रतिक्रमण करावे लागते. आणि कित्येक लोक म्हणतात की, 'भाऊ, हे जे आम्ही करतो तेच बरोबर आहे, असेच केले पाहिजे.' तर त्यांचे उलटे होईल. असे करून खुष होतील, अशीही माणसं आहेत ना ! हे तर तुम्ही हळूकर्मी (हळवे कर्मवाले) आहात म्हणून तुम्हाला पश्चाताप तरी होतो. बाकी इतर लोकांना तर पश्चातापही होत नाही. 28 प्रश्नकर्ता : पण पुन्हा रोज तसे खोटे करणारच आहोत... दादाश्री : खोटे करण्याचा प्रश्न नाही. तुम्ही पश्चाताप करता तोच तुमचा भाव आहे. जे झाले ते झाले. ते तर आज 'डिस्चार्ज' आहे आणि डिस्चार्जमध्ये कुणाचेही चालत नाही. 'डिस्चार्ज' म्हणजे आपोआप स्वाभाविकपणे परिणमित होणे. आणि चार्ज म्हणजे काय ? की स्वत:च्या भावासहित असते ते. कित्येक लोक चुकीचे कृत्य करतात तरीही त्यांचा भाव असाच असतो की 'हे बरोबरच होत आहे' तर तो मारला गेलाच समजा. पण ज्याला पश्चाताप होतो, त्याची मात्र ही चूक संपेल. 'दोन नंबरचे' लुटारु प्रश्नकर्ता : पण आमच्या जीवनात तर असे काही प्रसंग येतात, तेव्हा आम्हाला खोटे बोलावेच लागते. तेव्हा काय करावे ? दादाश्री : कित्येक ठिकाणी खोटे बोलणे चांगले, आणि कित्येक ठिकाणी खरे बोलणे तेही चांगले. भगवंत तर 'संयम आहे की नाही' एवढेच पाहतात. संयम म्हणजे कोणत्याही जीवाला दुःख तर देत नाही ना? खोटे बोलून दुःख देऊ नये. कित्येक कायदे (नियम) कायमसाठी असतात आणि कित्येक कायदे टेम्पररी असतात. जे टेम्पररी आहे त्यास लोक कायमचे करून टाकतात म्हणून फार अडचणी येतात. टेम्पररीशी Page #38 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य 29 तर एडजस्टेबल होऊन, त्यानुसार निकाल करून पुढे जात राहायचे, त्यासाठी रात्रभर कशाला बसून राहायचे? प्रश्नकर्ता : मग व्यवहार कशाप्रकारे करावा? दादाश्री : विषमता उत्पन्न होऊ देऊ नये. समभाव राखून निकाल करावा. आपल्याला जिथून काम करवून घ्यायचे असेल तेथील मॅनेजर म्हणेल, 'दहा हजार रुपये द्याल तर तुमचा पाच लाखाचा चेक पास करून देईन. आता आपल्या प्रामाणिक व्यापारात नफा तरी किती असणार? पाच लाख रुपयात दोन लाख आपल्या घरचे असतात आणि तीन लाख लोकांचे असतात, मग ते लोक पैश्यांसाठी चकरा मारत राहतील हे बरे वाटते का? म्हणून आपण त्या मॅनेजरला सांगावे. 'भाऊ, मला नफा उरलेला नाही.' असे जेम-तेम समजावून, पाच हजारात जमवून घ्यावे. नाहीतर शेवटी दहा हजार देऊनही आपला चेक मिळवून घ्यावा. आता तुम्ही तिथे 'मी लाच का द्यावी?' असा जर विचार कराल, तर मग त्या सगळ्यांना कोण उत्तर देईल? तो मागणारा शिव्या देईल, मोठ मोठ्या! जरा समजून घ्या, जशी वेळ असेल त्यानुसार समजून काम करा! लाचेचा गुन्हा नाही. ज्यावेळेस, जो व्यवहार आला, त्या व्यवहारात तुला एडजस्ट होता आले नाही, त्याचा गुन्हा आहे. आता इथे तुम्ही किती आग्रह धरुन ठेवाल? असे आहे ना की, आपल्याकडून एडजस्ट होईल, म्हणजे जोपर्यंत लोक आपल्याला शिव्या देत नाहीत आणि आपल्याजवळ बँकेत पैसे असतील, तोपर्यंत आग्रह धरावा. पण तो खर्च बँकेतील जमा रकमेपेक्षा जास्त जात असेल, आणि पैसे मागणारे शिव्या देत असतील तेव्हा मग काय करावे? तुम्हाला काय वाटते? प्रश्नकर्ता : हो, बरोबर आहे. दादाश्री : मी तर आमच्या व्यापारात सरळ सांगत होतो की, 'भाऊ, देऊन या पैसे. आपण जरी चोरी करत नसू, किंवा काही चुकीचे करत नसू, तरीही पैसे देऊन या.' नाहीतर लोकांना चकरा मारायला लावणे, हे आपल्यासारख्या चांगल्या माणसांचे काम नाही. म्हणून लाच देणे यास मी गुन्हा मानत नाही. ज्या माणसाने आपल्याला माल दिला त्याला आपण Page #39 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य वेळेवर पैसे देत नाही त्यास मी गुन्हा मानतो. वाटेत लुटारुंनी पैसे मागितले तर तुम्ही देणार की नाही? की मग सत्यासाठी नाही देणार? प्रश्नकर्ता : द्यावे लागतात. दादाश्री : तिथे का देता? आणि इथे का देत नाही?! हे दुसऱ्या क्रमांकाचे लुटारु आहेत. तुम्हाला वाटत नाही का, की हे दुसऱ्या क्रमांकाचे लुटारु आहेत म्हणून?! प्रश्नकर्ता : लुटारु तर बंदूक दाखवून घेतात ना? दादाश्री : हा नवीन प्रकारची बंदूक दाखवतो. हा सुद्धा मनात भीती घालून देतो ना की, 'महीनाभर तुला चेक देणार नाही!' तरीही शिव्या खाईपर्यंत आग्रह धरुन ठेवणे आणि नंतर लाच देण्यासाठी तयार होणे, त्याऐवजी शिव्या मिळण्या आधीच दगडाखालून हात काढून घ्या' असे भगवंताने सांगितले आहे. दगडाखालून सांभाळून हात काढा, नाहीतर त्या दगडाच्या बापाचे काही जाणार नाही. तुमचा हात मोडणार. काय वाटते तुम्हाला? प्रश्नकर्ता : अगदी बरोबर आहे. दादाश्री : आता असा वेडेपणा कोण शिकवणार? आहे का कोणी शिकवणारा? सगळेजण सत्याचे शेपूट धरतात. अरे, नाही हे सत्य. हे तर विनाशी सत्य आहे, सापेक्ष सत्य आहे. हो, म्हणून कोणाची हिंसा होत असेल, कोणाला दुःख होत असेल, कोणी मारला जात असेल, असे सर्व व्हायला नको. एकीकडे बिचारा मागणारा गळ्यापर्यंत आलेला आहे आणि दुसरीकडे मॅनेजर गळ्यापर्यंत आलेला आहे, 'तुम्ही दहा हजार नाही दिले तर मी तुमचा चेक देणार नाही.' तेव्हा हा दुसरा, सेकन्ड प्रकारचा लुटारु! हा सुधारलेला लुटारु, आणि तो बिनसुधारलेला लुटारु! हा सिविलाइज्ड लुटारु, आणि तो अनसिविलाइज्ड लुटारु! Page #40 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य 31 सत्य ठरवल्याने, बनते असत्य! प्रश्नकर्ता : सत्याला सत्य ठरवायला गेल्याने, तसा प्रयत्न केल्याने ते असत्य होऊन जाते. दादाश्री : या जगात फक्त वाणीच सत्य-असत्यापासून वेगळी आहे. ती सत्यात घेऊन जायची असेल तर घेऊन जाऊ शकतो, आणि असत्यात घेऊन जायची असेल तरीही घेऊन जाऊ शकतो. पण दोन्हीही आग्रहपूर्वक बोलू शकत नाही. आग्रहपूर्वक बोलले ते पॉइजन ! शास्त्रकारांनी सांगितले आहे की, अत्याधिक आग्रह केला म्हणून ते असत्य आहे, आणि आग्रह केला गेला नाही म्हणून सत्य आहे. जिथे सत्याला जर सत्य ठरवायला जाल तर असत्य होऊन उभे राहील, अशा जगात तुम्ही सत्य ठरवता?! म्हणून सत्य-असत्याच्या भानगडीत पडू नये. भानगड करणारे कोर्टात जातात. पण आपण काही कोर्टात बसलेलो नाही. आपण तर इथे दुःख होणार नाही इतकेच पाहायचे. सत्य बोलल्याने समोरच्याला दुःख होत असेल म्हणजे आपल्याला बोलणेच जमत नाही. शोभते सत्य, सत्याच्या रुपात त्याचे असे आहे, सत्याची प्रत्येक ठिकाणी गरज आहे. आणि जर सत्य असेल तर विजय होतो. पण सत्य सत्याच्या रुपात असले पाहिजे, त्याच्या व्याख्येत असले पाहिजे. स्वतःचे खरे ठरवण्यासाठी लोक मागे लागतात. पण खऱ्याला खरे ठरवू नका. सत्यात जर, समोरची व्यक्ति तुमच्या सत्यासमोर विरोध करीत असेल तर समजावे की तुमचे (मत) खरे नाही, काहीतरी कारण आहे त्यामागे. म्हणून सत्य कशास म्हणतात? खऱ्या गोष्टीला खरी गोष्ट केव्हा मानली जाते? तर फक्त सत्यच तेवढे बघायचे नाही. ते चार प्रकारे असावे. सत्य असले पाहिजे, प्रिय असले पाहिजे, हितकारक असले पाहिजे आणि मित, म्हणजे कमी शब्दात असले पाहिजे, त्याला सत्य म्हटले जाते. म्हणजे Page #41 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य सत्य, प्रिय, हित आणि मित, असे चारींचा गुणाकार करून बोलशील तर सत्य आहे, नाहीतर असत्य आहे. नग्न सत्य, शोभत नाही नग्न सत्य बोलणे हा भयंकर अपराध आहे. कारण, कित्येक बाबतीत तर सत्य व्यवहारात जसे बोलले जाते तसेच बोलावे. कोणाला दुःख होईल, अशी वाणी सत्य म्हटली जातच नाही. नग्न सत्य म्हणजे केवळ सत्यच बोलले, तर तेही खोटे म्हटले जाईल. 32 नग्न स्वरुपात सत्य कशास म्हणतात ? की स्वतःची आई असेल तिला म्हणेल, ‘तू तर माझ्या बापाची बायको आहेस'! असे म्हटले तर शोभेल का ? हे जरी सत्य असले तरी आई शिव्या देईल ना ? आई काय म्हणेल? ‘मेल्या, तोंड दाखवू नकोस, कारट्या!' अरे, पण मी तर हे सत्यच बोलत आहे. तू माझ्या बापाची बायको आहेस, आणि हे तर सगळेच मान्य करतील अशी गोष्ट आहे ! पण असे बोलू नये. अर्थात् नग्न सत्य बोलायला नको. सत्य, पण प्रिय असले पाहिजे म्हणजे सत्याची व्याख्या काय करण्यात आली आहे ? व्यवहार सत्य कसे असायला हवे ? व्यवहार सत्य कुठपर्यंत म्हटले जाते ? की सत्याचे शेपूट धरून बसला आहात ते सत्य नाही. सत्य म्हणजे साधारणपणे व्यवहारात खरे असले पाहिजे. पण तेही पुन्हा समोरच्याला प्रिय असले पाहिजे. लोक म्हणत नाहीत का की, 'अरे ए, काण्या, तू इकडे ये.' तर त्याला चांगले वाटेल का ? आणि कोणी त्याला हळूवारपणे विचारले की, 'भाऊ, तुमचा डोळा कशाने गेला ?' तेव्हा तो उत्तर देईल की नाही ? आणि त्याला काण्या म्हटले तर ? हे सत्य आहे पण त्याला वाईट वाटेल ना? म्हणून हे उदाहरण दिले. सत्य हे प्रिय असले पाहिजे. नाहीतर जे सत्य समोरच्याला प्रियकारी नसेल तर ते सत्य मानले जात नाही. कोणी वयोवृद्ध असेल तर त्यांना 'आजी' म्हणावे. त्यांना म्हातारी म्हटले तर त्या म्हणतील, 'मेल्या, मला म्हातारी म्हणतोस ? !' Page #42 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य आता त्या असतील ७८ वर्षांच्या, पण कोणी 'म्हातारी' म्हटलेले त्यांना आवडणार नाही. का? तर ते त्यांना अपमानासारखे वाटते. म्हणून आपण त्यांना 'आजी' म्हटले, की 'आजी या' तर त्यांना चांगले वाटेल आणि त्या खूष होतील, ‘काय भाऊ, पाणी हवे आहे का ? प्यायला पाणी देऊ का ?!' असे म्हणतील. म्हणजे पाणी - बीणी सर्व पाजेल. हितकारी, तरच सत्य तेव्हा त्याठिकाणी पुन्हा सावधानता ठेवायला सांगितली आहे. की सत्य हे फक्त प्रिय नाही पण समोरच्याला हितकारी पण असले पाहिजे. समोरच्याला फायदेकारक असले पाहिजे, तर सत्य मानले जाईल. हे तर असे लुटून घेणे, फसवणूक करणे, त्यास सत्य म्हटलेच जाणार नाही ना! म्हणजे फक्त सत्याने भागणार नाही. सत्य असले पाहिजे आणि ते समोरच्याला प्रिय देखील वाटले पाहिजे. समोरच्याला प्रिय वाटेल असा गुणाकार झाला पाहिजे. तसेच फक्त सत्य आणि प्रिय असूनही चालणार नाही, तर ते हितकारी पण असले पाहिजे. 33 समोरच्याला हितकारक होत नसेल तर ते काय कामाचे ? ! गावचा तलाव भरुन गेला असेल तर आपण मुलास सांगू की, 'बघ तलावात एक डाकीण राहते आणि ती खूप नुकसान करते...' असे काहीतरी सांगून आपण त्याला भीती दाखवली तर ते असत्य आहे, पण तरी देखील ते हितकारी आहे ना ? म्हणून ते सत्य मानले जाईल. प्रश्नकर्ता : पण जे हितकारी असेल ते सामान्यतः समोरच्याला प्रिय वाटत नाही. दादाश्री : आता ते हितकारी आहे की नाही, ही आपली मान्यता बहुतेक खोटी असते. आपण असेच मानत असतो की मी तर त्यांच्या हिताचेच सांगतो, तरीही ते माझे ऐकत नाहीत. अरे, हितकारी कुठून आणलेस? हितकारी हा शब्द कुठून आणलास तू ? हितकारी गोष्ट तर कशी असते? समोरच्या माणसाला मारले तरीही तो ऐकेल. म्हणजे समोरच्या माणसाला मारले तरीही तो हितकारी गोष्ट सांगण्याऱ्याचे ऐकेल Page #43 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य की नाही ? कारण की तो समजून जातो की ते माझ्या हितासाठी सांगत आहेत. म्हणून आपली गोष्ट जी समोरच्याला प्रिय वाटत नाही, आणि जरी प्रिय वाटली पण हितकारी नसेल तरीही निरर्थक आहे. मित शिवायचे सत्य, 34 कुरुप आता फक्त एवढ्यानेही चालणार नाही. अशा तिन्ही गोष्टी एका माणसाने केल्या, सत्य सांगितले, प्रिय वाटेल असे बोलले, हितकारी वाटेल असे बोलले. पण आपण सांगू, 'आता पुरे झाले, तुमची गोष्ट मी समजलो. तुम्ही मला जो सल्ला दिला तो माझ्या लक्षात आला, आता मी जातो. ' तर तो आपल्याला काय म्हणेल? 'नाही, जाऊ नको, थांब जरा. माझी गोष्ट पूर्ण ऐक. तू ऐक तरी.' मग ते झाले असत्य. म्हणून भगवंताने मित सांगितले तिथे. मित म्हणजे प्रमाणशीर असले पाहिजे. कमी शब्दात नसेल तर ते सत्य मानले जाणार नाही. कारण की प्रमाणाबाहेर बोललो तर समोरचा मनुष्य कंटाळतो, तेव्हा ते सत्य मानले जात नाही. त्या सत्यापेक्षा रेडिओ चांगला, की आपल्याला जेव्हा स्वीच बंद करायचा असेल तेव्हा बंद करू शकू ! हा रेडिओ बंद करायचा असेल तर होऊ शकेल पण हा जिवंत रेडियो बंद होत नाही. म्हणजे ते मित नसेल तरीही गुन्हा आहे, म्हणून तेही खोटे झाले. प्रमाणापेक्षा जास्त, एक्सेस बोलले गेले तेही खोटे होऊन गेले. कारण त्यामागे त्याचा अहंकार आहे. म्हणून सत्य सांगत असेल तरीही ते वाईट दिसते, हितकारी बोलतात तरीही ते वाईट दिसून येते. कारण ते मित नाही. म्हणजे नॉर्मालिटी असली पाहिजे, तेव्हा ते सत्य मानले जाते. मित म्हणजे समोरच्याला आवडेल इतकीच वाणी, गरजेपुरतेच बोलतो, जास्त बोलत नाही, समोरच्याला जर जास्त वाटत असेल तर तो बोलणे थांबवतो. आणि आपले लोक तर हात पकडून बसवतात. अरे त्यापेक्षा तर रेडियो चांगला, तो पकडून बसवत तर नाही. आणि हा तर हात पकडून बोलतच राहतो. असे हात पकडून बोलणारे पाहिले आहेत का तुम्ही ? 'अरे तुम्ही ऐका, ऐका, माझी गोष्ट ऐका तरी !' बघा कसे असतात ना!! मी पाहिलेत असे . Page #44 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य का ? 35 आत्म्यार्थासाठी खोटे तेच खरे प्रश्नकर्ता : परमार्थासाठी थोडे खोटे बोलले तर त्याचा दोष लागतो दादाश्री : परमार्थ म्हणजे आत्म्यासाठी जे काही करण्यात येते, त्याचा काही दोष लागत नाही आणि देहासाठी जे काहीही करण्यात येते, चुकीचे करण्यात आले तर दोष लागतो आणि चांगले करण्यात आले तर गुण लागतो. आत्म्याकरीता जे काही करण्यात येते, त्यास हरकत नाही. परमार्थ म्हणजे आत्म्यासाठीच तुम्ही सांगत आहात ना ? ! हो, आत्महेतु असेल, आणि त्यासाठी जी-जी कार्ये होत असतात त्यात काही दोष लागत नाही. समोरच्याला आपल्या निमित्ताने दुःख झाले तर मात्र त्याचा दोष लागतो. कषाय करण्यापेक्षा असत्य उत्तम म्हणून आम्ही सांगितले आहे, की आत्मा प्राप्त करण्यासाठी तुम्ही घरच्यांशी असत्य बोलून आलात तरी ते सत्य आहे. बायको म्हणेल, ‘तिथे दादांकडे जाऊ नका.' पण तुमचा हेतू आत्मा प्राप्त करण्याचा आहे, म्हणून तुम्ही असत्य बोलून आलात तरीही जबाबदारी माझ्यावर आहे. कषाय कमी करण्यासाठी घरी गेलो आणि सत्य बोलल्यामुळे घरात कषाय वाढेल असे असेल तर असत्य बोलूनही कषाय बंद केलेले चांगले. तेथे मग सत्याला बाजूला सारून ठेवायचे. 'हे' सत्य अशा ठिकाणी असत्यच आहे ! 'खोट्याने' सुद्धा कषाय थांबवावा जिथे सत्यासाठी थोडा पण आग्रह आहे तिथे ते असत्य होऊन गेले! म्हणून आम्ही सुद्धा खोटे बोलतो ना! हो, कारण त्या बिचाऱ्याला कोणीतरी हैराण करत असेल आणि ह्या लोकांनी तर शेपूट धरुन ठेवलेले आहे. गाढवाचे शेपूट धरले ते धरले ! अरे सोडून दे ना ! त्याने लाथा मारल्या तर सोडून द्यायचे. लाथ मारल्यावर आपल्याला समजते, की हे मी गाढवाचे शेपूट धरुन ठेवले आहे. सत्याचे शेपूट धरायचे नाही. सत्याचे शेपूट धरणे हे असत्यच आहे. धरुन ठेवणे हे सत्य नाहीच. सोडून देणे ते सत्य ! Page #45 -------------------------------------------------------------------------- ________________ 36 सत्य-असत्याचे रहस्य काका विचारत असतील, 'काय फुटले?' तेव्हा आपल्याला जर थोडे खोटे बोलून समजावता आले की 'काका, शेजाऱ्यांच्या घरी काहीतरी फुटले आहे असे वाटते.' तेव्हा काका म्हणतील, 'हो, मग काही हरकत नाही.' म्हणजे अशा ठिकाणी खोटे बोलले तरी हरकत नाही. कारण तिथे जर खरे बोलाल तर काका कषाय(क्रोध) करतील, त्यामुळे त्यांना खूप नुकसान सोसावे लागेल ना! म्हणून तिथे 'सत्याचे' शेपूट धरण्यासारखे नाही. आणि 'सत्याचे' शेपूट धरले, यालाच भगवंताने 'असत्य' म्हटले आहे. 'ते' सत्य काय कामाचे? । बाकी, खरे-खोटे हे तर एक लाईन ऑफ डिमार्केशन (भेदरेषा) आहे, नाही की खरोखर तसेच आहे. 'सत्याचे जर शेपूट धराल तर ते असत्य म्हटले जाईल,' तेव्हा ते भगवंत कसे होते? ! सांगणारे कसे होते?! 'अहो साहेब, सत्याला पण तुम्ही असत्य म्हणता?' 'हो, शेपूट का धरुन ठेवले?' समोरचा म्हणेल की 'नाही, असेच आहे.' तर आपण सोडून द्यावे. हे खोटे बोलण्याचे फक्त आम्हीच शिकवले आहे, या जगात दुसऱ्या कोणीही शिकवले नाही. पण याचा जर कोणी दुरुपयोग केला तर जबाबदारी त्याची स्वत:चीच. बाकी, आम्ही तर यातून सटकण्याचा मार्ग दाखवितो, की भाऊ, या काकांना कषाय होऊ नये म्हणून तू असे कर. नाहीतर त्या काकांना कषाय झाले तर ते तुमच्यावर कषाय करतील. 'तुला अक्कल नाही, बायकोला काही बोलत नाही. ती मुलांना नीट सांभाळत नाही. ही काचेची भांडी सर्व फोडून टाकते.' म्हणजे ही अशी सुरवात होते, आणि वाढत जाऊन मग भांडण पेटते! घरात कषायचे वातावरण झाले की मग भांडण पेटते. त्यापेक्षा पेटताच त्यावर टोपली झाकून द्यावी! यात तर अशाप्रकारे समाधान करता येईल. पण हे खोटे आणि खरे असे शब्दच नसतात. ती तर डिमार्केशन लाईन आहे. व्यवहार सुटतो 'ड्रामाने' व्यवहार म्हणजे काय? दोघांना समोरासमोर संतोष झाला पाहिजे. Page #46 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य 5 / व्यवहाराने तर राहावे लागेल ना? अतिशय उच्च प्रकारचा सुंदर व्यवहार असेल तेव्हा 'शुद्ध उपयोग' राहतो. प्रश्नकर्ता : उच्च प्रकारचा व्यवहार ठेवायचा असेल तर काय करावे? दादाश्री : भावना करावी. लोकांचा व्यवहार पाहावा, आमचा व्यवहार पाहावा. पाहिल्याने सर्वकाही जमते. व्यवहार म्हणजे समोरच्याला संतोष देणे ते. व्यवहाराला 'कट ऑफ'(बंद) करू नये. ती तर आत्महत्या केली असे म्हटले जाईल. व्यवहार तर हळूहळू संपुष्टात आला पाहिजे. हे विनाशी सत्य आहे, म्हणून सोडून द्यायचे नाही. ही तर एक प्रकारची बेसिक एरेन्जमेन्ट आहे. म्हणून लग्नही करायचे आणि 'ही माझी बायको आहे' असेही म्हणायचे. बायकोला असेही म्हणायचे, की 'तुझ्या शिवाय मला करमत नाही.' असे तर बोलावेच लागते. असे नाही म्हटले तर संसाराचे गाडे कसे चालेल? आम्ही सुद्धा अजूनपर्यंत हिराबाला (दादाश्रींच्या पत्नी) असे म्हणत असतो, 'तुम्ही असता तेव्हा आम्हाला खूप चांगले वाटते. पण आता आम्ही येथे जास्त राहू शकत नाही ना'! प्रश्नकर्ता : नि:स्वार्थ कपट! दादाश्री : हो, नि:स्वार्थ कपट ! त्यास ड्रामा(नाटक) म्हणतात. धीस इज ड्रामेटिक!(हे नाटकीय आहे) म्हणजे हे आम्ही सुद्धा अभिनय करत असतो तुमच्याशी. आम्ही जसे दिसत असतो, ज्या गोष्टी करीत असतो, त्याप्रमाणे खरेतर आम्ही नाही आहोत. हे सर्व तर तुमच्याशी अभिनय करीत असतो, नाटक-ड्रामा करीत असतो. म्हणजे व्यवहार सत्य कशाला म्हणतात? की कोणत्याही जीवाला नुकसान होणार नाही अशाप्रकारे वस्तू घेतो, वस्तू ग्रहण करतो, कोणत्याही जीवाला दुःख होणार नाही अशी वाणी बोलतो. कोणत्याही जीवाला दु:ख होणार नाही असे वर्तन करतो. हे मूळ सत्य आहे, व्यवहाराचे मूळ सत्य हेच आहे. अर्थात् कोणाला दुःख होणार नाही हा सर्वात मोठा सिद्धांत. वाणीने दुःख होणार नाही, वर्तनाने दुःख होणार नाही आणि मनाने कोणासाठी खराब विचार केला जाणार नाही. हे सर्वात मोठे सत्य आहे, Page #47 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य व्यवहार सत्य आहे, आणि तेही पुन्हा वास्तवात 'रियल' सत्य नाही. हे सर्वात अंतिम व्यवहार सत्य आहे ! प्रश्नकर्ता : तर मग सत्याला परमेश्वर म्हणतात ते काय आहे ? दादाश्री : या जगात व्यवहार सत्याचा परमेश्वर कोण ? तेव्हा म्हणे, जो मन-वचन-कायेने कोणाला दुःख देत नाही, कोणाला त्रास देत नाही, तो व्यवहार सत्याचा परमेश्वर आणि कॉमन सत्याला कायद्याच्या रुपात ठेवले. बाकी तेही सत्य नाही. हे सर्व व्यवहार सत्य आहे. 38 समोरच्याला समजत नाही तेव्हा... प्रश्नकर्ता : घरात मी खरे बोलतो पण मला कोणी समजून घेत नाही आणि समजून न घेतल्यामुळे ते लोक माझ्या सांगण्याचा उलट अर्थ काढतात. दादाश्री : अशा वेळी आपल्याला त्या गोष्टीपासून वेगळे राहावे लागते आणि मौन ठेवावे लागते. त्यातही इतर कोणाचा दोष तर नसतोच. दोष तर आपलाच असतो. अशीही कित्येक माणसे असतात की जी आपल्या शेजारीच असतात, व आपल्या कुटुंबियांसारखेच राहतात आणि आपण काही बोलण्यापूर्वीच ते पूर्णपणे समजूनही जातात, आता अशीही माणसे आसपास असतात, पण ती माणसे आपल्याला का नाही भेटली आणि हे लोकच का भेटले ? ! हे सिलेक्शन कोणी केले ? म्हणजे या जगात सगळेच प्रकार आहेत, पण त्यांचाशी आपला सामना होत नाही, यात चूक कोणाची ? म्हणून जेव्हा घरचे आपल्याला समजून घेत नाहीत तेव्हा मौन राहावे, दुसरा उपायच नाही. विरोधकासमोर एडजस्टमेन्ट प्रश्नकर्ता : दुसऱ्याच्या समजूतीनुसार चुकीचे वाटत असेल तर काय करावे ? दादाश्री : हे जे सर्व सत्य आहे ते व्यवहारापुरते सत्य आहे. मोक्षात जायचे असेल तर सर्वच खोटे आहे. सर्वांचे प्रतिक्रमण तर करावेच लागते. Page #48 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य मी आचार्य आहे, याचे सुद्धा प्रतिक्रमण करावे लागेल. मी स्वतः ला आचार्य मानले त्याचेही प्रतिक्रमण करावे लागेल. अरे, कारण मी शुद्धात्मा आहे. 39 म्हणजे हे सारे खोटे आहे. सर्व खोटे, हे तुमच्या लक्षात येते की नाही? हे नाही समजल्यामुळे तुम्ही असे म्हणता की, 'मी सत्य सांगत आहे.' अरे, सत्य सांगितले तर त्याचा कोणीही विरोध करणार नाही. आता मी इथे काही बोलतोय, तर समोर कोणी विरोध करायला उठतो का? वादविवाद होतो का ? मी जे बोलत असतो ते सर्वजण ऐकतच राहतात ना ? प्रश्नकर्ता : हो ऐकतच राहतात. दादाश्री : वादविवाद करीत नाही ना ? म्हणजे हे सत्य आहे. ही वाणी सत्य आहे आणि सरस्वती आहे. आणि ज्या वाणीमुळे संघर्ष होतो ती वाणी खोटी, संपूर्ण खोटी आहे. समोरचा कोणी म्हणेल, 'बिन अकलेचे नुसते, तुम्ही तर काही बोलूच नका' म्हणजे मग तोही खोटा आणि हाही खोटा आणि ऐकणारे सुद्धा खोटे ! ऐकणारे काही बोलले नसतील, ते सर्वच खोटे, पूर्ण समूहच खोटा. प्रश्नकर्ता : आपल्या कर्माचे उदयच असे असतील म्हणून, समोरच्याला आपले खरे असेलेलेही खोटेच वाटत असेल तर ? दादाश्री : खरे नसतेच. कोणतीही व्यक्ति खरे बोलू शकतच नाही. खोटेच बोलते. खरे असलेले तर समोरचा मान्य करेलच, आणि ते खरे, अन्यथा ते स्वतःच्या समजुतीने मानलेले सत्य आहे. स्वतः मानलेल्या सत्याचा लोक काही स्वीकार करीत नाहीत. म्हणून भगवंतांने कोणाचे सत्य म्हटले आहे ? तेव्हा म्हणे, वीतराग वाणी ही सत्य आहे. वीतराग वाणी म्हणजे काय ? वादी मान्य करतो आणि प्रतिवादी सुद्धा मान्य करतो. त्यास प्रमाण मानण्यात येते. बाकी सारी तर राग-द्वेषपूर्ण वाणी, खोटी - लबाड. तुरुंगात घालण्यासारखी. यात सत्य असेल का? रागी वाणीतही सत्य नसते आणि द्वेषी वाणीतही सत्य नसते. यात सत्य आहे असे तुम्हाला वाटते? हे आम्ही जे इथे Page #49 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य बोलत आहोत, ते तुमचा आत्मा मान्य करतो. येथे वादविवाद नसतो. आपल्या इथे वादविवाद कधीही झाला आहे का? कदाचित एखादा मनुष्य समजण्यात थोडासा कमी पडला असेल! पण दादांच्या शब्दांवर आजवर कोणी विवाद उपस्थित केला नाही. कारण ही आत्म्याची शुद्ध प्युअर गोष्ट आहे. आता मला सांग, राग-द्वेषपूर्ण वाणी खरी म्हटली जाईल का? प्रश्नकर्ता : नाही म्हटली जाणार, पण व्यवहार सत्य म्हटले जाईल ना? दादाश्री : व्यवहार सत्य म्हणजे निश्चयात असत्य आहे. व्यवहार सत्य म्हणजे समोरच्याला जर ते फीट (अनुकूल) झाले तर ते सत्य आणि फीट झाले नाही तर ते असत्य. व्यवहार सत्य हे वास्तवात सत्य नाहीच. प्रश्नकर्ता : आपण सत्य मानत असलो पण ते समोरच्याला फीट होत नसेल तर? दादाश्री : फीट होत नसेल तर ते सर्व खोटे. आम्ही सुद्धा सांगत असतो ना! एखाद्याला जर आमची गोष्ट समजली नसेल तर आम्ही त्याची चूक काढत नाही. आमचीच चूक आहे असे म्हणतो, की, 'भाऊ आमची अशी कोणती चूक (कमतरता) आहे की ज्यामुळे त्याला हे समजले नाही. गोष्ट समजलीच पाहिजे.' आम्ही आमचा दोष पाहतो. समोरच्याचा दोष पाहतच नाही. मला समजावता आले पाहिजे. म्हणजे समोरच्याचा दोष नसतोच. समोरच्याचा दोष पाहतो, ही तर भयंकर मोठी चूक समजली जाते. समोरच्याचा दोष आम्हाला वाटतच नाही, कधीच वाटला नाही. अशाप्रकारे होतो मतभेदाचा निकाल प्रश्नकर्ता : दुष्कृत्या समोरही लढायचे नाही का? अनिष्टते समोर? दादाश्री : लढल्याने तुमची शक्ति व्यर्थ जाईल. म्हणून भावना Page #50 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य करा की समाधान आणायचे आहे. नेहमी 'आर्बिट्रेशन'नेच फायदा आहे. दुसऱ्या भानगडीत पडण्यासारखे नाही. याहून पुढे गेलो तर नुकसान! आता 'आर्बिट्रेशन केव्हा होते? जेव्हा दोन्ही पार्टीचे असे भाव असतील की 'आम्हाला निकालच आणायचा आहे.' तरच 'आर्बिट्रेशन' होते. हो, तेव्हाच चांगल्या प्रकारे समाधान येऊ शकते. मतभेद होतो तिथे आपले शब्द मागे घेणे ही समंजस पुरुषांची परंपरा आहे. जिथे मतभेद होतात तिथे आपण समजावे की भिंतीशी आपटलो. आता तिथे कोणाचा दोष? भिंतीचा दोष म्हणावा? आणि खऱ्या गोष्टीसाठी कधीही मतभेद होत नाही. आपली गोष्ट खरी आहे आणि समोरच्याची खोटी आहे, पण संघर्ष झाला म्हणून ती खोटी आहे. या जगात खरे काहीच नसते. समोरच्याने हरकत घेतली ते सर्वच खोटे. सगळ्या बाबतीत दुसरे हरकत घेतात?! माझे खरे, हाच अहंकार हा तर स्वत:चा 'इगोइजम' (अहंकार) आहे की 'हे माझे खरे आहे आणि त्याचे खोटे आहे.' व्यवहारात जे काही 'खरे-खोटे' बोलण्यात येते ते सर्व 'इगोइजम' आहे. तरी देखील व्यवहारात कोणते खरे आणि कोणते खोटे? तर ज्या गोष्टी मनुष्याला किंवा कोणत्याही जीवाला नुकसानकारक आहेत, त्यांना आपण खोट्या म्हणतो. व्यवहारास नुकसानकारक आहेत, सामाजिक नुकसानकारक आहेत, जीवांना नुकसानकारक आहेत, लहान जीवांना किंवा दुसऱ्या जीवांना नुकसानकारक आहेत, ह्या सगळ्यांना आपण खोटे म्हणू शकतो. दुसरे काही 'खरे-खोटे' नसतेच, दुसरे सर्व करेक्टच' आहे. मग प्रत्येकाचे ड्रॉइंग वेगळेच असते. ते सर्व ड्रॉइंग कल्पित आहे, खरे नाही. जेव्हा या कल्पितामधून निर्विकल्पाकडे येतो, निर्विकल्पाची हेल्प घेतो, तेव्हा निर्विकल्पता उत्पन्न होते. ही (निर्विकल्पता) जरी एका सेकंदासाठीही झाली, की मग कायमसाठी होऊन गेली! तुम्हाला समजली का ही गोष्ट? प्रश्नकर्ता : हो. दादाश्री : हो. एकदा समजून घ्यायची गरज आहे की हे ड्रॉइंग Page #51 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य कसे आहे ! हे सगळे ड्रॉइंग समजून घेतले की, मग आपल्याला त्याच्याविषयी प्रिती राहणार नाही. नाही खोटे काही देवाकडे 42 बाकी या जगात ज्या गोष्टी चुकीच्या झाल्या असे पाहण्यात येते, त्याचे तर अस्तित्वच नाही. ह्या चुकीच्या गोष्टींचे अस्तित्व तुमच्या कल्पनेने तयार झालेले आहे. भगवंताला या जगात कधीही कोणतीही गोष्ट चुकीची वाटलीच नाही. प्रत्येकजण जे काही करीत आहे ते स्वतःच्या जोखिमदारीवरच करीत आहे. यात कोणतीही गोष्ट चुकीची नाही. आज चोरी करून आणतो, तो नंतर लोन घेऊन परत करेल. आणि जो दान करत आहे, तो आज लोन देऊन नंतर परत मिळवेल. यात काय खोटे आहे ? भगवंताला कधीही चुकीचे वाटले नाही. एखाद्या व्यक्तिला साप चावला तर भगवंत जाणतात की हा त्याचा हिशोब फेडला गेला. हिशोब चुकता करतो, यात मग कोणी गुन्हेगार नाहीच ना ! चुकीची वस्तुच नाही ना ! विनाशीचा आग्रह कशाला ? आणि असा जो न्याय करतो ना, तो आग्रही असतो. 'बस, तुला असे करावेच लागेल.' तुम्हाला माहित आहे का हे ? त्याला सत्याचे शेपूट म्हणतात. त्यापेक्षा तर तो अन्याय करणारा चांगला की 'हो, भाऊ तू सांगशील तसे. ' लौकिक सत्य ही सापेक्ष वस्तू आहे. काही कालावधी नंतर ते असत्य होऊन जाते. म्हणून त्याचा आग्रह नसतो, पकड नसते. भगवंताने सांगितले आहे की पाच जण जे सांगतील ते मान्य कर, तुझा आग्रह धरु नकोस. जो आग्रह धरेल तो वेगळा आहे. ताणाल, आग्रह धराल, तर ते तुम्हालाही नुकसानकारक आणि समोरच्यालाही नुकसानकारक! हे सत्य-असत्य हे ‘रिलेटिव सत्य आहे, व्यवहार सत्य आहे, त्याचा आग्रह नसावा. ' हे सत्य विनाशी सत्य आहे, म्हणून त्याचा आग्रह बाळगू नका. ज्यात लाथ लागते ते सत्यच नाही. कधीतरी एखाद-दोन लाथा लागतील, Page #52 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य पण इथे तर सतत लाथा लागतच राहतात. जे सत्य आपल्याला गाढवाच्या लाथा खाऊ घालते, त्यास सत्य कसे म्हणू शकतो? म्हणून आपल्यात म्हण आहे ना, गाढवाचे शेपूट धरले ते धरले! सोडत नाही स्वत:च्या सत्याला! अर्थात् सत्य हे पद्धतशीर असले पाहिजे. सत्य कोणाला म्हणावे हे 'ज्ञानी'कडून समजून घ्यावे. आणि जे सत्य विनाशी असेल, त्या सत्यासाठी किती भांडण केले पाहिजे? नॉर्मालिटी तर त्याच्या मर्यादेपर्यंतच असते ना! रिलेटिवच आहे, मग त्याची जास्त ओढाताण करू नये. ते सोडून द्यायचे, शेपूट धरुन बसू नये. वेळ आल्यावर सोडून द्यावे. अहंकार, तिथे सर्वच असत्य सत्य-असत्य कोणीही विचारत नाही. मनुष्याने असा विचार तर केला पाहिजे की माझे सत्य आहे तरीही समोरची व्यक्ति का स्वीकारत नाही? कारण ती सत्य गोष्ट सांगण्यामागे आग्रह आहे, कटकट आहे ! सत्य त्यास म्हटले जाते की जे समोरचा स्वीकारत असेल. भगवंतांने सांगितले आहे की समोरचा ताणत असेल आणि तुम्ही सोडत नसाल तर तुम्ही अहंकारी आहात, आम्ही सत्याला पाहत नाही. भगवंताकडे सत्याची किंमत नाही. कारण की हे व्यवहारिक सत्य आहे. आणि व्यवहारात अहंकार वापरला, म्हणून आपण सोडून द्यावे. तुम्ही खूप जोराने ओढत असाल आणि मी सुद्धा जोरात ओढले, तर तुटणार. यात मग दुसरे काय होईल?! म्हणून भगवंताने म्हटले की दोरी तोडू नका. नैसर्गिक दोरी आहे ही! आणि तोडल्यानंतर गाठ पडेल. आणि पडलेली गाठ काढणे ते तुमच्या हातात राहत नाही. ते मग निसर्गाच्या हातात गेले. म्हणून तुमच्या हातात आहे तोपर्यंत निसर्गाच्या हातात जाऊ देऊ नका. निसर्गाच्या कोर्टात परिस्थिती फारच बिघडेल! निसर्गाच्या कोर्टात जाऊ नये, यासाठी जेव्हा आपल्या लक्षात आले की तो खूप ओढत आहे आणि तोडून टाकणार आहे त्यापेक्षा आपण सोडून द्यावे. पण सैल सोडले, तर तेही नियमानुसार सोडा. नाहीतर ते सर्व खाली पडतील. म्हणून हळूहळू सोडा. आम्ही सुद्धा हळूवारपणे सोडतो. कोणी आग्रह Page #53 -------------------------------------------------------------------------- ________________ 44 सत्य-असत्याचे रहस्य धरुन बसला असेल, तर आम्ही हळूवारपणे सोडतो. नाहीतर पडेल बिचारा, मग काय होईल?! सत्याचा आग्रह कुठपर्यंत योग्य? प्रश्नकर्ता : तर सत्याचा आग्रह धरावा की नाही? दादाश्री : सत्याचा आग्रह धरावा, पण किती? की त्याचा दराग्रह व्हायला नको. कारण की 'तिथे' तर काही सत्यच नाही. सर्व सापेक्ष आहे. आग्रह, स्वतःच्या ज्ञानाचा कुणाचेही खोटे तर नसतेच या जगात. सर्व विनाशी सत्य आहे, मग त्यात कशासाठी पकड पकडावी (आग्रह धरावा)?! तरीसुद्धा समोरचा आग्रह धरुन बसला तर आम्ही सोडून देतो. आपण त्याला सांगून मोकळे व्हायचे, एवढेच, आपण आपली भावना व्यक्त केली पाहिजे की 'भाऊ, हे असे आहे !' पण त्याचा आग्रह धरु नये. स्वत:च्या ज्ञानाचा ज्याला आग्रह नाही, तो मुक्तच आहे ना! प्रश्नकर्ता : स्वत:चे ज्ञान म्हणजे कोणते ज्ञान? दादाश्री : स्वत:च्या ज्ञानाचा आग्रह नाही, याचा अर्थ काय की जेव्हा स्वतःचे ज्ञान दुसऱ्याला समजावतो, तेव्हा समोरची व्यक्ति म्हणेल, 'नाही, तुमची गोष्ट खोटी आहे.' म्हणजे तो स्वत:च्या गोष्टीचा आग्रह धरतो, त्यास धरुन ठेवणे असे म्हणतात. एकदा विनंती करायची की, 'भाऊ, तुम्ही परत एकदा गोष्टीला समजून घेण्याचा प्रयत्न तर करा.' त्यावर तो म्हणेल, 'नाही, आम्ही समजून घेतले; तुमची गोष्ट खोटीच आहे.' तेव्हा मग तुम्ही तुमचा आग्रह सोडून द्यावा. आम्ही असे सांगू इच्छितो. आज काय वार आहे? प्रश्नकर्ता : शुक्रवार. दादाश्री : आम्ही एखाद्याला सांगितले, 'शुक्रवार'. तेव्हा तो म्हणेल, 'नाही, शनिवार.' तेव्हा आम्ही सांगतो, तुम्ही पुन्हा एकदा पाहा तरी.' Page #54 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य 45 तेव्हा तो म्हणतो, 'नाही, आज शनिवारच आहे.' म्हणून मग आम्ही आग्रह धरुन ठेवत नाही, सोडून देतो. आणि हे फक्त सांसारिक व्यवहारातच नाही, ज्ञानात सुद्धा असेच करतो. आम्ही स्वत:च्या ज्ञानाचा सुद्धा आग्रह धरत नाही. कुठे डोकेफोड करत बसायचे? रात्रभर डोकेफोड केली तरी तो तर भिंतीसारखाच आहे. तो काही स्वतःचा आग्रह सोडत नाही, त्यापेक्षा आपण सोडून दिलेले बरे. नाहीतर हा जो पकडून ठेवण्याचा अहंकार आहे तो निघत नाही, आणि तो निघाल्याशिवाय आपण सुटू शकत नाही, आपली मुक्ति होत नाही. 'हे माझे खरे आहे' हा एक प्रकारचा अहंकार आहे, त्यालाही काढावे तर लागेल ना? हरला, तो जिंकला आपण समोरासमोर व्हायला आलेलो नाही, आपली खरी गोष्ट दाखविण्यास आलो आहोत. संघर्ष केला की, 'तुझे खोटे आहे, व आमचे खरे आहे' असा वाद आम्ही घालत नाही. 'भाऊ, तुझ्या दृष्टीने तुझे खरे' असे सांगून पुढे चालायला लागतो. नाहीतर यास ज्ञानाची विराधना केली असे म्हटले जाईल. ज्ञानात विराधक भाव नसावा. कारण ती त्याची दृष्टी आहे. त्याला आपण खोटे कसे म्हणू शकतो? पण यात जो आग्रह सोडतो तो वीतराग मार्गाचा, आणि यात जो जिंकतो तो वीतराग मार्गाचा नाही, मग जरी तो जिंकला असेल तरीही. असे आम्ही स्पष्ट सांगतो. आम्हाला काही हरकत नाही. आम्ही उघडपणे सांगू शकतो. आम्ही तर जगापासून हरून बसलो आहोत. आम्ही समोरच्याला जिंकविले तर बिचाऱ्याला झोप तरी येईल. मला नाहीतरी आरामशीर झोप येते, हरल्यावरही झोप. आणि तो जर हरला तर त्याला झोप येणार नाही, तेव्हा मग त्याचा त्रास मलाच होणार ना! तो बिचारा माझ्यामुळे झोपू शकला नाही ना?! अशी हिंसा आमच्यात नसते! कोणत्याही प्रकारची हिंसा आमच्यात नसते. एखादा मनुष्य खोटे बोलतो, उलट-सुलट बोलतो, त्यात त्याचा दोष नाही. तो कर्माच्या उदयाच्या आधीन बोलतो. पण तुमच्याकडून उदयाधीन बोलले गेले तर तुम्ही मात्र त्याचे जाणकार असले पाहिजे की, Page #55 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य 'हे चुकीचे बोलले गेले.' कारण तुमच्याकडे पुरुषार्थ आहे. हे 'ज्ञान' प्राप्ती झाल्यानंतर तुम्ही पुरुष झाला आहात. प्रकृतीत कोणत्याही प्रकारचे किंचितही हिंसक वर्तन नसेल, हिंसक वाणी नसेल, हिंसक मनन नसेल, असे जेव्हा होईल त्या दिवशी तुमची तीनशे साठ डिग्री पूर्ण झालेली असेल! एवढाच आग्रह स्वीकार्य प्रश्नकर्ता : माझ्या बाबतीत कसे होते? की खरेच बोलले पाहिजे, खरेच केले पाहिजे, खोटे करायचेच नाही. खोटे करतो ते बरोबर नाही असा माझा आग्रह होता. दादाश्री : आत्म्याचे हित पाहावे. बाकी, खरे बोलावे पण हे खरे म्हणजे संसारहित आहे आणि हे खरे आत्म्याच्या बाबतीत तर खोटेच आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अति आग्रह धरु नये. आग्रह धरुच नये. महावीर भगवानांच्या मार्गात आग्रह हे विष आहे. फक्त एक आत्म्याचाच आग्रह, दुसरा कोणताच आग्रह नाही, आत्म्याचा आणि आत्म्याच्या साधनांचा आग्रह ! आग्रह, हेच असत्य या जगात असे कुठलेही सत्य नाही की ज्याचा आग्रह करण्यासारखा असेल! ज्याचा आग्रह केला ते सत्यच नाही. महावीर भगवान काय सांगत होते? सत्याग्रह पण नसावा. सत्याचा आग्रह पण नसावा. सत्याचा आग्रह अहंकाराशिवाय होऊ शकत नाही. आग्रह म्हणजे ग्रासीत. सत्याचा आग्रह असो की वाटेल तो आग्रह असो पण ग्रासित म्हटले जाणार. या सत्याचा आग्रह धराल पण ते सत्य जर आउट ऑफ नॉर्मालिटी झाले, तर ते असत्य आहे. आग्रह धरणे ही वस्तुच सत्य नाही. आग्रह धरला म्हणजे असत्य झाले. भगवंत निराग्रही असतात, दुराग्रही नसतात. भगवंतात सत्याग्रह सुद्धा नसतो. सत्याग्रह संसारी लोकांमध्येच असतो. भगवंत तर निराग्रही Page #56 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य असतात. आम्ही सुद्धा निराग्रही असतो. आम्ही कोणत्याही भानगडीत पडत नाही. नाहीतर याचा कधी अंतच येणार नाही. अंत येईल असे नाहीच मुळी. आग्रह, सत्याचाही नाही, असत्याचाही नाही आम्ही या सत्याचा आग्रह करीत नाही. कारण हे सत्य 'एक्ॉक्टली' नाही, आणि तशी ही खोटी वस्तू पण नाही. पण हे रिलेटिव सत्य आहे आणि आम्ही आहोत रियल सत्यावर लक्ष ठेवणारे! रिलेटिवची आम्ही दखल घेत नाही, रिलेटिवमध्ये आग्रह नसतो. आम्हाला तर सत्याचाही आग्रह नाही, याचा अर्थ मला असत्याचा आग्रह आहे असे नाही. तिथे मग कोणत्याही वस्तुचा आग्रहच नसतो! असत्याचाही आग्रह नसावा आणि सत्याचाही आग्रह नसावा. कारण सत्यअसत्य असे काही नसतेच. वास्तविकतेत असे काही नाहीच. हे तर रिलेटिव सत्य आहे. संपूर्ण जगाने रिलेटिव सत्याचा आग्रह धरुन ठेवला आहे, पण रिलेटिव सत्य हे विनाशी आहे. हो, स्वभावानेच विनाशी आहे. कोणते खरे? सोडले ते की धरुन ठेवले ते? हे जे व्यवहार सत्य आहे, त्याचा आग्रह धरणे ही किती भयंकर जोखिम आहे ? सर्वच मान्य करतात का, या व्यवहार सत्याला? चोर तर मान्य करणारच नाही, घ्या आता! काय वाटते तुम्हाला? चोरांच्या कम्युनिटीचाही एक आवाज आहे ना?! हे सत्य तर तिथे असत्यच ठरते! म्हणजे हे सर्व रिलेटिव सत्य आहे, काही ठाव ठिकाणा नाही. आणि अशा सत्यासाठी लोक मरायला तयार होतात. अरे, सत्साठी मरायला तयार व्हायचे आहे. सत् अविनाशी असते आणि हे सत्य तर विनाशी आहे. दादाश्री : सत्मध्ये आग्रह नसतोच. प्रश्नकर्ता : सत्मध्ये आग्रह असू शकतच नाही ना! आग्रह संसारात असतो. संसारात सत्याचा आग्रह असतो. आणि सत्याच्या आग्रहाबाहेर Page #57 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य गेलात, म्हणून मग मताग्रह म्हणा, कदाग्रह म्हणा, दुराग्रह म्हणा, शेवटी ते सर्व हटाग्रहात जाते. 48 प्रश्नकर्ता : संसारातही सत्याचा आग्रह कुठे असतो ! दादाश्री : सत्याचा आग्रह करण्यापुरतेच करतात. आता इथे तीन रस्ते आले, तर एक म्हणेल, 'ह्या रस्त्याने चला.' दुसरा म्हणेल, 'नाही ह्या रस्त्याने'. तिसरा म्हणेल, 'नाही ह्या रस्त्याने चला. ' तिघेही वेगवेगळे रस्ते दाखवतात. आणि एक जो स्वतः अनुभवी असेल तोच जाणत असतो की 'हा एकच रस्ता खरा आहे आणि बाकीचे दोन रस्ते चुकीचे आहेत. ' तर त्याने एक-दोन वेळा असे म्हटले पाहिजे की, 'भाऊ, आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत की हाच खरा रस्ता आहे. ' तरी देखील नाही ऐकले तर स्वत:चे मत सोडून देतो तोच खरा आहे. प्रश्नकर्ता : स्वत:चे तर सोडून देतो. पण त्याला माहित आहे की हा चुकीचा रस्ता आहे, तर अशा वेळी तो सोबत कसा जाईल ? दादाश्री : नंतर जे होईल ते खरे पण सोडून द्यावे. आग्रह सुटल्याने, संपूर्ण वीतरागांचे दर्शन पण प्रश्नकर्ता : म्हणजे हा असत्याचा आग्रह तर सोडायचा आहे, सत्याचाही आग्रह सोडायचा आहे ! दादाश्री : हो, म्हणूनच म्हटले आहे ना... जेव्हा सत्याचाही आग्रह सुटून जातो, तेव्हा वीतराग संपूर्ण ओळखले जातात ! सत्याचा आग्रह असतो तोपर्यंत वीतराग ओळखले जात नाहीत. सत्याचा आग्रह करायचा नाही. बघा कसे सुंदर वाक्य लिहिले आहे ! चोरी-खोटे, त्यास हरकत नाही, पण.... कोणी चोर चोरी करत असेल, आणि तो आमच्याजवळ आला व म्हणाला, की 'मी तर चोरीचा धंदा करत आहे तर आता मी काय करू?' Page #58 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य 49 तेव्हा मी त्याला म्हणेन की, 'तू कर, मला हरकत नाही. पण चोरीची अशी जोखिमदारी येते. तुला जर ती जोखिमदारी सहन होत असेल तर तू चोरी कर. आम्हाला हरकत नाही.' त्यावर तो म्हणेल की, 'साहेब, यात तुम्ही काय उपकार केलेत?! जबाबदारी तर माझ्यावर येणारच आहे.' तेव्हा मी सांगेन की माझे उपकार म्हणून मी तुला सांगतो की तू 'दादां'च्या नावाने प्रतिक्रमण कर किंवा महावीर भगवानांच्या नावाने प्रतिक्रमण कर, की 'हे भगवंता, मला हा चोरीचा धंदा करायचा नाही पण तरीही करावा लागतो. त्याची मी क्षमा मागतो.' अशाप्रकारे क्षमा मागत रहा आणि धंदाही करीत रहा. जाणूनबुजून करू नकोस. जेव्हा तुला आतून इच्छा होईल की 'आता मला हा चोरीचा धंदा करायचा नाही' त्यानंतर तू ते बंद कर. तुझी इच्छा आहे ना, धंदा बंद करण्याची? पण तरीही आतून धक्का लागला आणि करावा लागला, तर देवाची माफी माग. बस, एवढेच! दुसरे काही करायचे नाही. चोराला असे सांगू शकत नाही की 'उद्यापासून धंदा बंद करून टाक. असे सांगितल्याने काहीही निष्पन्न होणार नाही. असे चालणारच नाही ना! 'हे सोडून द्या, ते सोडून द्या' असे म्हणूच शकत नाही. आम्ही काहीही सोडायचे सांगतच नाही, या पाचव्या आयात (कालचक्राचा बारावा भाग) सोडण्याचे सांगण्यासारखेच नाही. तसेच असेही सांगण्यासारखे नाही की हे ग्रहण करा. कारण की सोडल्याने सुटेल असेही नाही. हे विज्ञान बिलकूल अपरिचित वाटते लोकांना! कधी ऐकलेले नाही, पाहिलेले नाही, जाणलेले नाही! आत्तापर्यंत तर लोकांनी काय म्हटले? की हे वाईट कर्म सोडा आणि चांगले कर्म करा. पण त्याच्यात सोडण्याचीही शक्ति नाही आणि बांधण्याची शक्तिही नाही आणि उगाचच गात रहातात की, 'तुम्ही असे करा.' तेव्हा तो सांगतो की, 'माझ्याकडून होत नाही, मला सत्य बोलायचे आहे पण बोलले जात नाही.' तेव्हा आम्ही नवीन विज्ञान शोधून काढले. 'भाऊ, तुला असत्य बोलण्यास हरकत नाही ना? ते तर तुला जमेल ना? तर आता जेव्हा असत्य बोलशील तेव्हा इतके मात्र कर, त्याचे तू अशाप्रकारे प्रतिक्रमण कर.' चोरी केली तर लोक त्याला सांगतात, 'नाही, चोरी करणे तू बंदच कर.' पण हे कसे Page #59 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य बंद होईल ?! बद्धकोष्ठता झाली असेल, त्याला जुलाब येण्यासाठी औषध द्यावे लागते, आणि ज्याला जुलाब झाले असतील त्याला बंद करण्यासाठीही औषध द्यावे लागते, हे जग काय आपोआप चालेल असे आहे का ? ... तर जोखिमदारी नाही 50 प्रश्नकर्ता : प्रत्येक चुकीसाठी आपण जर पश्चाताप करीत राहिलो, तर त्याचे पाप बांधलेच जाणार नाही ना ? दादाश्री : नाही, पाप तर बांधले जाते. गाठ बांधलेली आहे, ती गाठ तर आहेच, पण ती जळलेली गाठ आहे. म्हणून मग पुढील जन्मात असा हलकासा हात लावला तर गळून पडते. जो पश्चाताप करतो त्याची गाठ जळून जाते. गाठ तर राहतेच. सत्य बोलले तरच गाठ पडत नाही. पण सत्य बोलले जाईल अशी स्थिती नाही. परिस्थिती वेगळी आहे. प्रश्नकर्ता : तर मग खरे केव्हा बोलता येईल ? दादाश्री : जेव्हा सर्व संयोग सरळ असतील तेव्हा खरे बोलता येईल. त्यापेक्षा पश्चाताप कर ना ! त्याची गॅरन्टी आम्ही घेतो. तू वाटेल तसा गुन्हा केलास, पण त्याचा पश्चाताप कर. मग तुला जोखिमदारी येणार नाही, याची गॅरन्टी. जबाबदारी आमच्यावर आहे. आमच्या जबाबदारीवर बोलत आहोत. शास्त्र, एडजेस्टेबल पाहिजेत चौथ्या आऱ्याची शास्त्रे पाचव्या आयत फीट होत नाहीत. म्हणून हे नवे शास्त्र रचले जात आहे. आता हे नवे शास्त्र कामी येईल. चौथ्या आऱ्याची शास्त्रे चौथ्या आऱ्याच्या शेवटपर्यंत चालतात, नंतर ती कामी येत नाहीत. कारण की पाचव्या आऱ्याचे मनुष्य वेगळे, त्यांची गोष्ट वेगळी, त्यांचा व्यवहारही वेगळ्याच प्रकारचा आत्मा तर त्याचा तोच आहे. पण व्यवहार मात्र पूर्णपणे बदलून गेला ना ! संपूर्णपणे !! आता जुनी शास्त्रे चालणार नाहीत प्रश्नकर्ता : मग कलियुगातील शास्त्रे आता लिहीली जातील? Page #60 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य-असत्याचे रहस्य दादाश्री : कलियुगाची शास्त्रे आता लिहीली जातील, की जरी तुझ्या आचारात-विचारात - उच्चारात खोटेपणा असेल, पण आता मात्र तू नवीन योजना आख. यास धर्म म्हटले जाते. आत्तापर्यंत असे सांगत होते की तुझे आचार, विचार आणि उच्चार सत्य आहेत आणि ते पुन्हा असेच विशेष होईल अशी तू योजना आख. ती सत्युगाची योजना होती. म्हणून तेव्हा पुन्हा नवीन तसेच्या तसे विशेष होत असे, आणि तेव्हापासून ते वाढत जाते. आणि आता या कलियुगात वेगळ्याच प्रकारे सर्व शास्त्रांची रचना होईल आणि ते सर्वांना हेल्पही करतील. आणि पुन्हा (ती शास्त्रे) काय सांगतील ? की ‘तू चोरी करतोस, त्याची मला हरकत नाही, आणि ‘हरकत नाही' असे जर म्हटले ना, तर ती गोष्ट तो पुस्तकात वाचायला बसेल. आणि ‘चोरी करू नये' असे लिहिलेले पुस्तक फळीवर ठेवून देईल. माणसांचा स्वभाव असा आहे ! 'हरकत नाही' असे म्हटले की ते पुस्तक हातात घेतो. आणि पुन्हा म्हणेलही की ' हे वाचल्याने मला शांती वाटते!' 51 म्हणजे अशी शास्त्रे लिहीली जातील. हे तर आता मी जे बोलत आहे ना, त्यातून आपोआपच नवीन शास्त्रे लिहीली जातील. हे आता समजणार नाही, परंतु नवीन शास्त्रांची निर्मिती होईल. प्रश्नकर्ता : इतकेच नाही, पण तुम्ही जी पूर्ण मेथड (पद्धत ) वापरली आहे ना, तो नवीन अभिगम आहे. दादाश्री : हो नवीनच अभिगम होईल! लोक नंतर जुने अभिगम बाजूला सारुन देतील. प्रश्नकर्ता : पण तुम्ही भविष्य वर्तवले, भविष्य कथन केले, की आता नवीन शास्त्रे लिहीली जातील. तर ती वेळ आता आली आहे का ? ! दादाश्री : हो, ती वेळ आलीच आहे ना ! वेळ परिपक्व होते तेव्हा तसे घडत राहते. वेळ परिपक्व झाल्याने आता सर्व नवीन शास्त्रे रचण्याची सगळी तयारी होत आहे ! जय सच्चिदानंद Page #61 -------------------------------------------------------------------------- ________________ नऊ कलमे (दररोज तीन वेळा बोलायची) १. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याचा किंचितमात्र पण अहम् दुभावणार (दुखावणार) नाही, दुभाविला जाणार नाही किंवा दुभावण्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ति द्या. मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याचा किंचितमात्र पण अहम् दुभावणार नाही अशी स्याद्वाद वाणी, स्याद्वाद वर्तन आणि स्याद्वाद मनन करण्याची परम शक्ति द्या. २. हे दादा भगवान ! मला कोणत्याही धर्माचे किंचितमात्र पण प्रमाण दुभावणार नाही, दुभावले जाणार नाही किंवा दुभावण्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ति द्या. मला कोणत्याही धर्माचे किंचितमात्र पण प्रमाण दुभावले जाणार नाही, अशी स्याद्वाद वाणी, स्याद्वाद वर्तन आणि स्याद्वाद मनन करण्याची परम शक्ति द्या. ३. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी उपदेशक, साधु, साध्वी किंवा आचार्य यांचा अवर्णवाद, अपराध, अविनय न करण्याची परम शक्ति द्या. ४. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्या प्रति किंचितमात्र पण अभाव, तिरस्कार कधीही केला जाणार नाही, करविला जाणार नाही किंवा कर्त्याच्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ति द्या. ५. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याशी कधीही कठोर भाषा, तंतीली (टोचणारी) भाषा न बोलण्याची, न बोलावयाची किंवा बोलण्या प्रति अनुमोदन न करण्याची अशी परम शक्ति द्या. कोणी कठोर भाषा, तंतीली भाषा बोलले तर मला मृदु-ऋजु भाषा बोलण्याची परम शक्ति द्या. ६. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्या प्रति स्त्रीपुरुष किंवा नपुंसक, कोणताही लिंगधारी असो, तर त्या संबंधी किंचितमात्र पण विषयविकार संबंधी दोष, इच्छा, चेष्टा- चाळे किंवा Page #62 -------------------------------------------------------------------------- ________________ विचार संबंधी दोष न करण्याची, न करविण्याची किंवा कर्त्याच्या प्रति अनुमोदन न करण्याची अशी परम शक्ति द्या. मला निरंतर निर्विकार राहण्याची परम शक्ति द्या. ७. हे दादा भगवान! मला कोणत्याही रसमध्ये लुब्धपणा न करण्याची अशी शक्ति द्या. समरसी आहार घेण्याची परम शक्ति द्या. ८. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याचा प्रत्यक्ष किंवा परोक्ष, जिवंत किंवा मृत्यु पावलेल्या, कोणाचाही किंचितमात्र पण अवर्णवाद, अपराध, अविनय केला जाणार नाही, करविला जाणार नाही किंवा कर्त्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ति द्या. ९. हे दादा भगवान! मला जगत कल्याण करण्याचे निमित्त बनण्याची परम शक्ति द्या, शक्ति द्या, शक्ति द्या. (एवढेच तुम्ही दादा भगवान यांच्याजवळ मागायचे. ही दररोज मिकेनिकली (यंत्रवत्) वाचण्याची वस्तू नाही, अंतरात ठेवण्याची वस्तू आहे. ही दररोज उपयोगपूर्वक भावना करण्याची वस्तू आहे. एवढ्या पाठात सर्व शास्त्रांचे सार येऊन जाते.) वेगळे होण्याची सामायिक हे शुद्धात्मा भगवान, तुम्ही वेगळे आहात आणि चंदुभाऊ वेगळे आहेत. हे शुद्धात्मा भगवान, तुम्ही रियल आहात आणि चंदुभाऊ रिलेटिव आहे. हे शुद्धात्मा भगवान, तुम्ही परमेनन्ट आहात आणि चंदुभाऊ टेम्पररी आहे (१० ते ५० मिनिटांपर्यंत उपयोगपूर्वक म्हणायचे) मी आणि चंदुभाऊ (चंदुभाऊच्या जागी स्वत:चे नाव समजायचे), दोघेही वेगळेच आहोत, असे वेगळे राहण्याची मला शक्ति द्या. मला आपल्यासारखेच वेगळे राहण्याची शक्ति द्या. मी आणि चंदुभाऊ, वेगळे रहावेत. चंदुभाऊ काय करतात, त्याला पाहायचे आणि जाणायचे, हेच माझे काम. - दादाश्री Page #63 -------------------------------------------------------------------------- ________________ शुद्धात्मा प्रति प्रार्थना (दररोज एक वेळा बोलायची) हे अंतर्यामी परमात्मा! आपण प्रत्येक जीवमात्रांमध्ये विराजमान आहात, तसेच माझ्यामध्ये पण विराजमान आहात, आपले स्वरूप हेच माझे स्वरूप आहे, माझे स्वरूप शुद्धात्मा आहे. हे शुद्धात्मा भगवान ! मी आपल्याला अभेदभावे अत्यंत भक्तीपूर्वक नमस्कार करीत आहे. अज्ञानतेमुळे मी जे जे **दोष केले आहेत, त्या सर्व दोषांना आपल्या समक्ष जाहीर करीत आहे. त्याचे हदयपूर्वक खूप पश्चाताप करीत आहे आणि आपल्याजवळ क्षमा प्रार्थित आहे. हे प्रभू! मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा आणि पुन्हा असे दोष करू नये अशी आपण मला शक्ति द्या, शक्ति द्या, शक्ति द्या. हे शुद्धात्मा भगवान ! आपण अशी कृपा करा की आमचे भेदभाव मिटून जावे आणि अभेद स्वरूप प्राप्त व्हावे. आम्ही आपल्यात अभेद स्वरूपाने तन्मायाकार राहू. ___** (जे जे दोष झाले असतील ते मनात जाहीर करावे.) प्रतिक्रमण विधि प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने देहधारी...... (ज्याच्या प्रति दोष झाला असेल त्या व्यक्तिचे नाव) च्या मन-वचन-कायेचे योग, भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्माहून भिन्न असे हे शुद्धात्मा भगवान! आपल्या साक्षीने, आजच्या दिवसापर्यंत जे जे ** दोष झाले आहेत, त्यांची क्षमा मागत आहे, हृदयपूर्वक खूप पश्चाताप करीत आहे. मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. आणि पुन्हा असे दोष कधीही करणार नाही, असा दृढ निश्चय करीत आहे, त्यासाठी मला परम शक्तिद्या ** क्रोध-मान-माया-लोभ, विषय-विकार, कषाय इत्यादीपासून त्या व्यक्तिला दुःख दिले गेले असेल त्या सर्व दोषांना मनात आठवायचे. Page #64 -------------------------------------------------------------------------- ________________ ; (दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके) मराठी 1. भोगतो त्याची चूक 13. पति-पत्नीचा दिव्य व्यवहार 2. एडजस्ट एवरीव्हेर 14. समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य 3. जे घडले तोच न्याय 15. मानव धर्म 4. संघर्ष टाळा 16. मृत्युवेळी, आधी आणि नंतर 5. मी कोण आहे ? 17. सेवा-परोपकार क्रोध 18. दान चिंता 19. त्रिमंत्र 8. प्रतिक्रमण 20. वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी 9. भावना सुधारे जन्मोजन्म 22. सत्य-असत्याचे रहस्य 11. पाप-पुण्य 23. वाणी, व्यवहारात 12. आई-वडील आणि मुलांचा व्यवहार 24. पैशांचा व्यवहार हिन्दी 1. ज्ञानी पुरुष की पहचान 20. प्रेम 2. सर्व दुःखों से मुक्ति 21. माता-पिता और बच्चों का व्यवहार 3. कर्म का सिद्धांत 22. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य आत्मबोध 23. दान ___ मैं कौन हूँ? 24. मानव धर्म 6. वर्तमान तीर्थकर श्री सीमंधर... 25. सेवा-परोपकार 7. भुगते उसी की भूल 26. मृत्यु समय, पहले और पश्चात 8. एडजस्ट एवरीव्हेयर 27. निजदोष दर्शन से... निर्दोष 9. टकराव टालिए 28. पति-पत्नी का दिव्य व्यवहार 10. हुआ सो न्याय 29. क्लेश रहित जीवन 11. चिंता 12. क्रोध 31. अहिंसा 13. प्रतिक्रमण 32. सत्य-असत्य के रहस्य 14. दादा भगवान कौन ? 33. चमत्कार 15. पैसों का व्यवहार 34. पाप-पुण्य 16. अंत:करण का स्वरूप 35. वाणी, व्यवहार में... 17. जगत कर्ता कौन ? 36. कर्म का विज्ञान 18. त्रिमंत्र 37. आप्तवाणी - 1 से 8 और 13 (पूर्वार्ध) 19. भावना से सुधरे जन्मोजन्म 38. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य (पूर्वार्ध-उत्तरार्ध) * दादा भगवान फाउन्डेशन द्वारे गुजराती, हिन्दी आणि इंग्रजी भाषेत सुद्धा बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहे. वेबसाइट www.dadabhagwan.org वर सुद्धा आपण ही सगळी पुस्तके प्राप्त करू शकता। * प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित होत आहे. Page #65 -------------------------------------------------------------------------- ________________ संपर्क सूत्र दादा भगवान परिवार अडालज : त्रिमंदिर, सीमंधर सिटी, अहमदाबाद-कलोल हाईवे, पोस्ट : अडालज, जि.-गांधीनगर, गुजरात - 382421. फोन : (079) 39830100 राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल), पोस्ट : मालियासण, जि.-राजकोट. फोन : 9924343478 भुज : त्रिमंदिर, हिल गार्डनच्या मागे, एयरपोर्ट रोड. फोन : (02832) 290123 अंजार : त्रिमंदिर, अंजार-मुंद्रा रोड, सिनोग्रा पाटीया जवळ, सिनोग्रा गाँव, ता-अंजार. फोन : 9924346622 मोरबी : त्रिमंदिर, पो-जेपुर (मोरबी), नवलखी रोड, ता-मोरबी, जि-राजकोट, फोन : (02822) 297097 सुरेन्द्रनगर : त्रिमंदिर, लोकविद्यालय जवळ, सुरेन्द्रनगर-राजकोट हाईवे, मुळी रोड. फोन : 9879232877 अमरेली : त्रिमंदिर, लीलीया बायपास चोकडी, खारावाडी. फोन : 9924344460 गोधरा : त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन समोर, गोधरा, (जि.-पंचमहाल). फोन : (02672) 262300 वडोदरा : त्रिमंदिर, बाबरिया कोलेज जवळ, वडोदरा-सुरत हाई-वे NH-8, वरणामा गाँव. फोन : 9574001557 अहमदाबाद : दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद-380014. फोन : (079) 27540408 वडोदरा : दादा मंदिर, 17, मामानी पोळ-मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन समोर, सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335 मुंबई : 9323528901 दिल्ली : 9810098564 कोलकता : 9830093230 चेन्नई : 9380159957 जयपुर : 9351408285 भोपाल : 9425024405 इन्दौर : 9039936173 जबलपुर : 9425160428 रायपुर : 9329644433 भिलाई : 9827481336 पटना : 7352723132 अमरावती : 9422915064 : 9590979099 हैदराबाद : 9989877786 :9422660497 जालंधर : 9814063043 U.S.A. : (D.B.V. I.) +1 877-505-DADA (3232) U.K. : +44 330-111-DADA (3232) UAE : +971557316937 Kenya : +254 722722 063 Singapore : +6581129229 Australia : +61 421127947 New Zealand: +64210376434 Website : www.dadabhagwan.org बेंगल पण Page #66 -------------------------------------------------------------------------- ________________ सत्य आणि असत्यामधील भेद काय? असत्य हे तर असत्य आहेच. परंतु हे जे सत्य आहे ना, ते व्यवहार सत्य आहे, खरे सत्य नाही. हा जावई तो काय कायमचा जावई नसतो, सासरा सुद्धा कायमचा नसतो. निश्चय सत्य असते त्यास सत् म्हटले जाते, ते अविनाशी असते. आणि जे विनाशी असते त्यास सत्य म्हटले जाते. पण पुन्हा हे सत्य देखील असत्य होऊन जाते, असत्य ठरते. पण तरी सांसारिक सुख पाहिजे असेल तर असत्यावरुन सत्यावर आले पाहिजे. आणि मोक्षाला जायचे असेल तर हे (व्यवहार)सत्यही जेव्हा असत्य ठरेल तेव्हा मोक्ष होईल! -दादाश्री ISAN 978-93-85121-749 9-789386321749 Printed in India Price Rs20 dadabhagwan.org