________________
सत्य-असत्याचे रहस्य
दादाश्री : हे इच्छा नसताना अनिवार्यपणे करावे लागते, त्याचा पश्चाताप झाला पाहिजे. अर्धा तास बसून पश्चाताप केला पाहिजे, की 'हे करायचे नाही तरीही करावे लागते.' आपला पश्चाताप जाहीर केला म्हणजे आपण गुन्ह्यातून सुटलो. असे करण्याची आपली इच्छा तर नाही, तरीही ते जबरदस्तीने करावे लागते, याचे प्रतिक्रमण करावे लागते. आणि कित्येक लोक म्हणतात की, 'भाऊ, हे जे आम्ही करतो तेच बरोबर आहे, असेच केले पाहिजे.' तर त्यांचे उलटे होईल. असे करून खुष होतील, अशीही माणसं आहेत ना ! हे तर तुम्ही हळूकर्मी (हळवे कर्मवाले) आहात म्हणून तुम्हाला पश्चाताप तरी होतो. बाकी इतर लोकांना तर पश्चातापही होत नाही.
28
प्रश्नकर्ता : पण पुन्हा रोज तसे खोटे करणारच आहोत...
दादाश्री : खोटे करण्याचा प्रश्न नाही. तुम्ही पश्चाताप करता तोच तुमचा भाव आहे. जे झाले ते झाले. ते तर आज 'डिस्चार्ज' आहे आणि डिस्चार्जमध्ये कुणाचेही चालत नाही. 'डिस्चार्ज' म्हणजे आपोआप स्वाभाविकपणे परिणमित होणे. आणि चार्ज म्हणजे काय ? की स्वत:च्या भावासहित असते ते. कित्येक लोक चुकीचे कृत्य करतात तरीही त्यांचा भाव असाच असतो की 'हे बरोबरच होत आहे' तर तो मारला गेलाच समजा. पण ज्याला पश्चाताप होतो, त्याची मात्र ही चूक संपेल.
'दोन नंबरचे' लुटारु
प्रश्नकर्ता : पण आमच्या जीवनात तर असे काही प्रसंग येतात, तेव्हा आम्हाला खोटे बोलावेच लागते. तेव्हा काय करावे ?
दादाश्री : कित्येक ठिकाणी खोटे बोलणे चांगले, आणि कित्येक ठिकाणी खरे बोलणे तेही चांगले. भगवंत तर 'संयम आहे की नाही' एवढेच पाहतात. संयम म्हणजे कोणत्याही जीवाला दुःख तर देत नाही ना? खोटे बोलून दुःख देऊ नये. कित्येक कायदे (नियम) कायमसाठी असतात आणि कित्येक कायदे टेम्पररी असतात. जे टेम्पररी आहे त्यास लोक कायमचे करून टाकतात म्हणून फार अडचणी येतात. टेम्पररीशी