________________
सत्य-असत्याचे रहस्य
करण्यात आले, तर मग कॉजेसचे फळ आणि त्याचेही पुन्हा फळ, हे येणार नाही. __म्हणून आम्ही काय सांगतो? जरी खोटे बोलले गेले, पण 'खोटे बोलायला नको' असा तुझा विरोध आहे ना? हो, तर मग तुला खोटे बोलणे आवडत नाही हे नक्की झाले, असे म्हटले जाईल. खोटे बोलण्याचा तुझा अभिप्राय नाही ना, मग तुझी जबाबदारी संपली.
प्रश्नकर्ता : पण ज्याला खोटे बोलण्याची सवयच असेल, त्याने काय करावे?
दादाश्री : त्याने मग त्याचबरोबर प्रतिक्रमण करण्याची सवयही करून घ्यावी लागेल. आणि त्याने जर प्रतिक्रमण केले तर मग जबाबदारी आमची आहे.
म्हणून अभिप्राय बदला! खोटे बोलणे हे जीवनाचा अंत करण्यासारखे आहे, जीवनाचा अंत आणणे आणि खोटे बोलणे हे दोन्ही एकसमान आहे, असे 'ठरवावे लागते. आणि पुन्हा सत्याचे शेपूटही धरुन बसू नका.
द्रव्यात खोटे, भावात सत्य प्रश्नकर्ता : हा जो आम्ही व्यापार करतो, त्यात कुणाला सांगितले की, 'तू माझा माल वापर, तुला त्यातून एक-दोन टक्के देऊ.' हे तर खोटेच काम आहे ना?
दादाश्री : खोटे काम होत आहे, ते तुम्हाला आवडते की नाही आवडत?
प्रश्नकर्ता : आवडणे हा तर दुसरा प्रश्न आहे. पण आवडत नसेल तरीही करावे लागते, व्यवहारासाठी.
दादाश्री : हो. म्हणून जे करावे लागते, ते अनिवार्य आहे. तर यात तुमची इच्छा काय आहे? असे करायचे की नाही करायचे?
प्रश्नकर्ता : असे करण्याची इच्छा नाही, पण तरी करावे लागते.