________________
सत्य-असत्याचे रहस्य
29
तर एडजस्टेबल होऊन, त्यानुसार निकाल करून पुढे जात राहायचे, त्यासाठी रात्रभर कशाला बसून राहायचे?
प्रश्नकर्ता : मग व्यवहार कशाप्रकारे करावा?
दादाश्री : विषमता उत्पन्न होऊ देऊ नये. समभाव राखून निकाल करावा. आपल्याला जिथून काम करवून घ्यायचे असेल तेथील मॅनेजर म्हणेल, 'दहा हजार रुपये द्याल तर तुमचा पाच लाखाचा चेक पास करून देईन. आता आपल्या प्रामाणिक व्यापारात नफा तरी किती असणार? पाच लाख रुपयात दोन लाख आपल्या घरचे असतात आणि तीन लाख लोकांचे असतात, मग ते लोक पैश्यांसाठी चकरा मारत राहतील हे बरे वाटते का? म्हणून आपण त्या मॅनेजरला सांगावे. 'भाऊ, मला नफा उरलेला नाही.' असे जेम-तेम समजावून, पाच हजारात जमवून घ्यावे. नाहीतर शेवटी दहा हजार देऊनही आपला चेक मिळवून घ्यावा. आता तुम्ही तिथे 'मी लाच का द्यावी?' असा जर विचार कराल, तर मग त्या सगळ्यांना कोण उत्तर देईल? तो मागणारा शिव्या देईल, मोठ मोठ्या! जरा समजून घ्या, जशी वेळ असेल त्यानुसार समजून काम करा!
लाचेचा गुन्हा नाही. ज्यावेळेस, जो व्यवहार आला, त्या व्यवहारात तुला एडजस्ट होता आले नाही, त्याचा गुन्हा आहे. आता इथे तुम्ही किती आग्रह धरुन ठेवाल? असे आहे ना की, आपल्याकडून एडजस्ट होईल, म्हणजे जोपर्यंत लोक आपल्याला शिव्या देत नाहीत आणि आपल्याजवळ बँकेत पैसे असतील, तोपर्यंत आग्रह धरावा. पण तो खर्च बँकेतील जमा रकमेपेक्षा जास्त जात असेल, आणि पैसे मागणारे शिव्या देत असतील तेव्हा मग काय करावे? तुम्हाला काय वाटते?
प्रश्नकर्ता : हो, बरोबर आहे.
दादाश्री : मी तर आमच्या व्यापारात सरळ सांगत होतो की, 'भाऊ, देऊन या पैसे. आपण जरी चोरी करत नसू, किंवा काही चुकीचे करत नसू, तरीही पैसे देऊन या.' नाहीतर लोकांना चकरा मारायला लावणे, हे आपल्यासारख्या चांगल्या माणसांचे काम नाही. म्हणून लाच देणे यास मी गुन्हा मानत नाही. ज्या माणसाने आपल्याला माल दिला त्याला आपण