________________
सत्य-असत्याचे रहस्य
करा की समाधान आणायचे आहे. नेहमी 'आर्बिट्रेशन'नेच फायदा आहे. दुसऱ्या भानगडीत पडण्यासारखे नाही. याहून पुढे गेलो तर नुकसान! आता 'आर्बिट्रेशन केव्हा होते? जेव्हा दोन्ही पार्टीचे असे भाव असतील की 'आम्हाला निकालच आणायचा आहे.' तरच 'आर्बिट्रेशन' होते. हो, तेव्हाच चांगल्या प्रकारे समाधान येऊ शकते.
मतभेद होतो तिथे आपले शब्द मागे घेणे ही समंजस पुरुषांची परंपरा आहे. जिथे मतभेद होतात तिथे आपण समजावे की भिंतीशी आपटलो. आता तिथे कोणाचा दोष? भिंतीचा दोष म्हणावा? आणि खऱ्या गोष्टीसाठी कधीही मतभेद होत नाही. आपली गोष्ट खरी आहे आणि समोरच्याची खोटी आहे, पण संघर्ष झाला म्हणून ती खोटी आहे. या जगात खरे काहीच नसते. समोरच्याने हरकत घेतली ते सर्वच खोटे. सगळ्या बाबतीत दुसरे हरकत घेतात?!
माझे खरे, हाच अहंकार हा तर स्वत:चा 'इगोइजम' (अहंकार) आहे की 'हे माझे खरे आहे आणि त्याचे खोटे आहे.' व्यवहारात जे काही 'खरे-खोटे' बोलण्यात येते ते सर्व 'इगोइजम' आहे. तरी देखील व्यवहारात कोणते खरे आणि कोणते खोटे? तर ज्या गोष्टी मनुष्याला किंवा कोणत्याही जीवाला नुकसानकारक आहेत, त्यांना आपण खोट्या म्हणतो. व्यवहारास नुकसानकारक आहेत, सामाजिक नुकसानकारक आहेत, जीवांना नुकसानकारक आहेत, लहान जीवांना किंवा दुसऱ्या जीवांना नुकसानकारक आहेत, ह्या सगळ्यांना आपण खोटे म्हणू शकतो. दुसरे काही 'खरे-खोटे' नसतेच, दुसरे सर्व करेक्टच' आहे. मग प्रत्येकाचे ड्रॉइंग वेगळेच असते. ते सर्व ड्रॉइंग कल्पित आहे, खरे नाही. जेव्हा या कल्पितामधून निर्विकल्पाकडे येतो, निर्विकल्पाची हेल्प घेतो, तेव्हा निर्विकल्पता उत्पन्न होते. ही (निर्विकल्पता) जरी एका सेकंदासाठीही झाली, की मग कायमसाठी होऊन गेली! तुम्हाला समजली का ही गोष्ट?
प्रश्नकर्ता : हो. दादाश्री : हो. एकदा समजून घ्यायची गरज आहे की हे ड्रॉइंग