________________
सत्य-असत्याचे रहस्य
कसे आहे ! हे सगळे ड्रॉइंग समजून घेतले की, मग आपल्याला त्याच्याविषयी प्रिती राहणार नाही.
नाही खोटे काही देवाकडे
42
बाकी या जगात ज्या गोष्टी चुकीच्या झाल्या असे पाहण्यात येते, त्याचे तर अस्तित्वच नाही. ह्या चुकीच्या गोष्टींचे अस्तित्व तुमच्या कल्पनेने तयार झालेले आहे. भगवंताला या जगात कधीही कोणतीही गोष्ट चुकीची वाटलीच नाही. प्रत्येकजण जे काही करीत आहे ते स्वतःच्या जोखिमदारीवरच करीत आहे. यात कोणतीही गोष्ट चुकीची नाही. आज चोरी करून आणतो, तो नंतर लोन घेऊन परत करेल. आणि जो दान करत आहे, तो आज लोन देऊन नंतर परत मिळवेल. यात काय खोटे आहे ? भगवंताला कधीही चुकीचे वाटले नाही. एखाद्या व्यक्तिला साप चावला तर भगवंत जाणतात की हा त्याचा हिशोब फेडला गेला. हिशोब चुकता करतो, यात मग कोणी गुन्हेगार नाहीच ना ! चुकीची वस्तुच नाही ना !
विनाशीचा आग्रह कशाला ?
आणि असा जो न्याय करतो ना, तो आग्रही असतो. 'बस, तुला असे करावेच लागेल.' तुम्हाला माहित आहे का हे ? त्याला सत्याचे शेपूट म्हणतात. त्यापेक्षा तर तो अन्याय करणारा चांगला की 'हो, भाऊ तू सांगशील तसे. '
लौकिक सत्य ही सापेक्ष वस्तू आहे. काही कालावधी नंतर ते असत्य होऊन जाते. म्हणून त्याचा आग्रह नसतो, पकड नसते.
भगवंताने सांगितले आहे की पाच जण जे सांगतील ते मान्य कर, तुझा आग्रह धरु नकोस. जो आग्रह धरेल तो वेगळा आहे. ताणाल, आग्रह धराल, तर ते तुम्हालाही नुकसानकारक आणि समोरच्यालाही नुकसानकारक! हे सत्य-असत्य हे ‘रिलेटिव सत्य आहे, व्यवहार सत्य आहे, त्याचा आग्रह नसावा. '
हे सत्य विनाशी सत्य आहे, म्हणून त्याचा आग्रह बाळगू नका. ज्यात लाथ लागते ते सत्यच नाही. कधीतरी एखाद-दोन लाथा लागतील,