________________
सत्य-असत्याचे रहस्य
पण इथे तर सतत लाथा लागतच राहतात. जे सत्य आपल्याला गाढवाच्या लाथा खाऊ घालते, त्यास सत्य कसे म्हणू शकतो? म्हणून आपल्यात म्हण आहे ना, गाढवाचे शेपूट धरले ते धरले! सोडत नाही स्वत:च्या सत्याला! अर्थात् सत्य हे पद्धतशीर असले पाहिजे. सत्य कोणाला म्हणावे हे 'ज्ञानी'कडून समजून घ्यावे.
आणि जे सत्य विनाशी असेल, त्या सत्यासाठी किती भांडण केले पाहिजे? नॉर्मालिटी तर त्याच्या मर्यादेपर्यंतच असते ना! रिलेटिवच आहे, मग त्याची जास्त ओढाताण करू नये. ते सोडून द्यायचे, शेपूट धरुन बसू नये. वेळ आल्यावर सोडून द्यावे.
अहंकार, तिथे सर्वच असत्य सत्य-असत्य कोणीही विचारत नाही. मनुष्याने असा विचार तर केला पाहिजे की माझे सत्य आहे तरीही समोरची व्यक्ति का स्वीकारत नाही? कारण ती सत्य गोष्ट सांगण्यामागे आग्रह आहे, कटकट आहे !
सत्य त्यास म्हटले जाते की जे समोरचा स्वीकारत असेल. भगवंतांने सांगितले आहे की समोरचा ताणत असेल आणि तुम्ही सोडत नसाल तर तुम्ही अहंकारी आहात, आम्ही सत्याला पाहत नाही. भगवंताकडे सत्याची किंमत नाही. कारण की हे व्यवहारिक सत्य आहे. आणि व्यवहारात अहंकार वापरला, म्हणून आपण सोडून द्यावे.
तुम्ही खूप जोराने ओढत असाल आणि मी सुद्धा जोरात ओढले, तर तुटणार. यात मग दुसरे काय होईल?! म्हणून भगवंताने म्हटले की दोरी तोडू नका. नैसर्गिक दोरी आहे ही! आणि तोडल्यानंतर गाठ पडेल. आणि पडलेली गाठ काढणे ते तुमच्या हातात राहत नाही. ते मग निसर्गाच्या हातात गेले. म्हणून तुमच्या हातात आहे तोपर्यंत निसर्गाच्या हातात जाऊ देऊ नका. निसर्गाच्या कोर्टात परिस्थिती फारच बिघडेल! निसर्गाच्या कोर्टात जाऊ नये, यासाठी जेव्हा आपल्या लक्षात आले की तो खूप ओढत आहे आणि तोडून टाकणार आहे त्यापेक्षा आपण सोडून द्यावे. पण सैल सोडले, तर तेही नियमानुसार सोडा. नाहीतर ते सर्व खाली पडतील. म्हणून हळूहळू सोडा. आम्ही सुद्धा हळूवारपणे सोडतो. कोणी आग्रह