________________
44
सत्य-असत्याचे रहस्य
धरुन बसला असेल, तर आम्ही हळूवारपणे सोडतो. नाहीतर पडेल बिचारा, मग काय होईल?!
सत्याचा आग्रह कुठपर्यंत योग्य? प्रश्नकर्ता : तर सत्याचा आग्रह धरावा की नाही?
दादाश्री : सत्याचा आग्रह धरावा, पण किती? की त्याचा दराग्रह व्हायला नको. कारण की 'तिथे' तर काही सत्यच नाही. सर्व सापेक्ष आहे.
आग्रह, स्वतःच्या ज्ञानाचा कुणाचेही खोटे तर नसतेच या जगात. सर्व विनाशी सत्य आहे, मग त्यात कशासाठी पकड पकडावी (आग्रह धरावा)?! तरीसुद्धा समोरचा आग्रह धरुन बसला तर आम्ही सोडून देतो. आपण त्याला सांगून मोकळे व्हायचे, एवढेच, आपण आपली भावना व्यक्त केली पाहिजे की 'भाऊ, हे असे आहे !' पण त्याचा आग्रह धरु नये. स्वत:च्या ज्ञानाचा ज्याला आग्रह नाही, तो मुक्तच आहे ना!
प्रश्नकर्ता : स्वत:चे ज्ञान म्हणजे कोणते ज्ञान?
दादाश्री : स्वत:च्या ज्ञानाचा आग्रह नाही, याचा अर्थ काय की जेव्हा स्वतःचे ज्ञान दुसऱ्याला समजावतो, तेव्हा समोरची व्यक्ति म्हणेल, 'नाही, तुमची गोष्ट खोटी आहे.' म्हणजे तो स्वत:च्या गोष्टीचा आग्रह धरतो, त्यास धरुन ठेवणे असे म्हणतात. एकदा विनंती करायची की, 'भाऊ, तुम्ही परत एकदा गोष्टीला समजून घेण्याचा प्रयत्न तर करा.' त्यावर तो म्हणेल, 'नाही, आम्ही समजून घेतले; तुमची गोष्ट खोटीच आहे.' तेव्हा मग तुम्ही तुमचा आग्रह सोडून द्यावा. आम्ही असे सांगू इच्छितो. आज काय वार आहे?
प्रश्नकर्ता : शुक्रवार.
दादाश्री : आम्ही एखाद्याला सांगितले, 'शुक्रवार'. तेव्हा तो म्हणेल, 'नाही, शनिवार.' तेव्हा आम्ही सांगतो, तुम्ही पुन्हा एकदा पाहा तरी.'