________________
10
सत्य-असत्याचे रहस्य
सत्य उभे असत्याच्या आधारावर... प्रश्नकर्ता : सत्य, खोट्याच्या आधारावर आहे, हे कशा प्रकारे?
दादाश्री : सत्य कशा प्रकारे ओळखले जाईल? खोटे अस्तित्वात आहे म्हणून तर सत्य ओळखले जाते.
म्हणजे हे सत्य तर असत्याच्या आधारावर टिकून राहिले आहे आणि असत्याचा आधार आहे म्हणून हे सत्य पण असत्यच आहे. बाहेर जे सत्य म्हटले जाते ना, त्याचा आधार काय? ते कशामुळे सत्य म्हटले जाते? असत्य आहे म्हणून सत्य म्हटले जाते. त्याचा आधार असत्य असल्या कारणाने ते स्वतः पण असत्य आहे.
परम सत्च्या प्राप्तीचा पुरुषार्थ प्रश्नकर्ता : ते परम सत्य मिळविण्यासाठी मनुष्याने काय पुरुषार्थ करावा?
दादाश्री : जगाला जे सत्य वाटते ते सत्य जेव्हा तुम्हाला विपरीत वाटेल तेव्हा तुम्ही सत्च्या बाजूने जाल. म्हणजे एखाद्याने चंदुभाऊला (आपल्याला) दोन शिव्या दिल्या तर मनात असे वाटेल की ते 'आपल्याला सत्कडे जाण्यासाठी ढकलत आहे. असत्कडे प्रत्येक जण ढकलतो पण सत्कडे जाण्यासाठी धक्का कोण मारणार? या जगातील लोकांचे जे विटामीन आहे ते परम सत् प्राप्त करण्यासाठी 'विष-पॉइजन' आहे. आणि ह्या लोकांचे-जगाचे जे विष आहे ते परम सत् प्राप्त करण्यासाठी विटामीन आहे. कारण, दोघांची दृष्टी वेगळी आहे, दोघांची रीत वेगळी आहे, दोघांची मान्यता वेगळी आहे.
प्रश्नकर्ता : बरेच लोक निरनिराळे मार्ग दाखवतात. जसे की 'जप करा, तप करा, दान करा.' तर काही लोक नकारात्मक मार्ग दाखवितात की 'हे नका करू, ते नका करू.' तर यात खरे कोणते?
दादाश्री : हे जप-तप-दान, हे सर्व सत्य म्हटले जाईल आणि सत्य म्हणजे विनाशी! आणि जर परम सत्य तुम्हाला पाहिजे असेल तर