________________
सत्य-असत्याचे रहस्य
आहे.' तेव्हा भगवंत म्हणतात, हा ह्याचे फळ भोगेल आणि तो त्याचे फळ भोगेल. जसे पेरेल तसे फळ भोगेल. त्यात मला काही घेणे-देणे नाही. आंबा लावेल तर आंबा मिळेल, आणि दुसरे काही लावेल तर दुसरे मिळेल !
9
प्रश्नकर्ता : हे असे का ? भगवंताने त्यात थोडातरी फरक केला पाहिजे ना ?
दादाश्री : फरक केले तर ते भगवंतच नाहीत. कारण भगवंतासाठी ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत.
प्रश्नकर्ता : पण व्यवहारात जर असे करत गेलो तर अनर्थ होईल.
दादाश्री : व्यवहारात असे करू नये. पण भगवंताकडे असा वेगळेपणा नाही. ते तर दोघांना समानच पाहतात. भगवंत कुणाचाही पक्षपात करत नाहीत. हो, कसे समंजस आहेत भगवंत ! समजदार आहेत ना ? !
आपल्या इथे तर कर्जबाजारीही असतात आणि श्रीमंत माणसेही असतात. आपले लोक कर्जबाजारी व्यक्तिला कुत्सित नजरेने पाहतात आणि श्रीमंताचे गुणगान गातात. पण भगवंत असे नाहीत. भगवंताला कर्जबाजारीही सारखे आणि श्रीमंतही सारखे. दोघांना रिझर्वेशन सारखेच देतात !
प्रश्नकर्ता : आपण हे निश्चितपणे कसे सांगू शकतो की भगवंतांने दोघांना समानच पाहिले आहे ? !
दादाश्री : कारण की देव द्वंद्वातीत आहेत, म्हणून द्वंद्वाला एक्सेप्ट (स्वीकार) करीत नाहीत. द्वंद्व हे संसार चालवण्यासाठीचे साधन आहे आणि भगवंत तर द्वंद्वातीत आहेत. म्हणून आपण असे म्हणू शकतो की भगवंत हे दोन्हीही एक्सेप्ट करीत नाहीत.
व्यवहाराला ज्यांनी खरे मानले, त्यांना प्रेशर, हार्टअॅटॅक आणि असे सर्व झाले आणि व्यवहाराला ज्यांनी खोटे मानले ते तगडे झाले. दोन्ही किनाऱ्यावरील रखडत राहिले. व्यवहारात असूनही आम्ही वीतराग आहोत !