________________
सत्य-असत्याचे रहस्य रहस्य
वास्तविक सत्य जाणल्यानंतर काहीही जाणून घेण्याचे उरत नाही आणि कल्पित सत्य कितीही जाणले तरी त्याचा अंत येत नाही. अनंत जन्मांपर्यंत जाणत राहिलो तरीही त्याचा अंत येत नाही.
कमतरतेने सर्जित केले स्थापित मूल्य प्रश्नकर्ता : स्थापित मूल्य एखाद्या गुणधर्माच्या कारणाने बनले आहे का?
दादाश्री : कमरतरतेच्या कारणाने! ज्याची कमतरता त्याची खूप किंमत !! बाकी, गणाचे एवढे महत्वच नाही. सोन्यात असे काही खास गुण नाहीत, तसे काही गुण आहेत, पण टंचाईमुळे त्याला किंमत आहे. आता जर खाणीतून भरपूर सोने निघू लागले, तर काय होईल? किंमत कमी होणार.
प्रश्नकर्ता : सुख-दुःख, सत्य-असत्य, ह्या द्वंद्ववाल्या वस्तू आहेत. त्यांना सुद्धा स्थापित मूल्यच म्हणतात ना? या जगात खरे बोलण्याला किंमती म्हटले आहे, खोटे बोलण्याला चांगले म्हटले नाही.
दादाश्री : हो, हे सर्व स्थापित मूल्यच आहेत आणि ही गोष्ट सुद्धा तशीच आहे. ते मूल्य आणि हे मूल्य एकच आहे. तुम्ही जे मानता की, 'हे खरे आहे आणि हे खोटे आहे' हे सर्व स्थापित मूल्यच मानले जाते. हे सर्व अज्ञानाचेच काम आहे. आणि ते ह्या भ्रांत स्वभावाने ठरवले गेले आहे, हा सर्व भ्रांत स्वभावाचा न्याय आहे. कोणत्याही स्वभावात न्याय तर असतो ना! म्हणून ही स्थापित मूल्ये सर्व वेगळ्या प्रकारची आहेत. अर्थात् हे 'सत्य-असत्य' सारे व्यवहारापुरते आहे.
भगवंतांच्या दृष्टीने... ह्या व्यवहार सत्याचा, रिलेटिव सत्याचा दुराग्रह बाळगू नये. ते मूळ स्वभावानेच असत्य आहे. रिलेटिव सत्य कोणास म्हणतात? की समाज व्यवस्था निभावण्यापुरते सत्य! समाजापुरते सत्य, ते भगवंतापुढे सत्य नाही. जर भगवंताला आपण विचारले की, 'की हा असे छान काम करत