________________
सत्य-असत्याचे रहस्य
बंद होईल ?! बद्धकोष्ठता झाली असेल, त्याला जुलाब येण्यासाठी औषध द्यावे लागते, आणि ज्याला जुलाब झाले असतील त्याला बंद करण्यासाठीही औषध द्यावे लागते, हे जग काय आपोआप चालेल असे आहे का ? ... तर जोखिमदारी नाही
50
प्रश्नकर्ता : प्रत्येक चुकीसाठी आपण जर पश्चाताप करीत राहिलो, तर त्याचे पाप बांधलेच जाणार नाही ना ?
दादाश्री : नाही, पाप तर बांधले जाते. गाठ बांधलेली आहे, ती गाठ तर आहेच, पण ती जळलेली गाठ आहे. म्हणून मग पुढील जन्मात असा हलकासा हात लावला तर गळून पडते. जो पश्चाताप करतो त्याची गाठ जळून जाते. गाठ तर राहतेच. सत्य बोलले तरच गाठ पडत नाही. पण सत्य बोलले जाईल अशी स्थिती नाही. परिस्थिती वेगळी आहे.
प्रश्नकर्ता : तर मग खरे केव्हा बोलता येईल ?
दादाश्री : जेव्हा सर्व संयोग सरळ असतील तेव्हा खरे बोलता येईल.
त्यापेक्षा पश्चाताप कर ना ! त्याची गॅरन्टी आम्ही घेतो. तू वाटेल तसा गुन्हा केलास, पण त्याचा पश्चाताप कर. मग तुला जोखिमदारी येणार नाही, याची गॅरन्टी. जबाबदारी आमच्यावर आहे. आमच्या जबाबदारीवर बोलत आहोत.
शास्त्र, एडजेस्टेबल पाहिजेत
चौथ्या आऱ्याची शास्त्रे पाचव्या आयत फीट होत नाहीत. म्हणून हे नवे शास्त्र रचले जात आहे. आता हे नवे शास्त्र कामी येईल. चौथ्या आऱ्याची शास्त्रे चौथ्या आऱ्याच्या शेवटपर्यंत चालतात, नंतर ती कामी येत नाहीत. कारण की पाचव्या आऱ्याचे मनुष्य वेगळे, त्यांची गोष्ट वेगळी, त्यांचा व्यवहारही वेगळ्याच प्रकारचा आत्मा तर त्याचा तोच आहे. पण व्यवहार मात्र पूर्णपणे बदलून गेला ना ! संपूर्णपणे !!
आता जुनी शास्त्रे चालणार नाहीत
प्रश्नकर्ता : मग कलियुगातील शास्त्रे आता लिहीली जातील?