________________
सत्य-असत्याचे रहस्य
49
तेव्हा मी त्याला म्हणेन की, 'तू कर, मला हरकत नाही. पण चोरीची अशी जोखिमदारी येते. तुला जर ती जोखिमदारी सहन होत असेल तर तू चोरी कर. आम्हाला हरकत नाही.' त्यावर तो म्हणेल की, 'साहेब, यात तुम्ही काय उपकार केलेत?! जबाबदारी तर माझ्यावर येणारच आहे.' तेव्हा मी सांगेन की माझे उपकार म्हणून मी तुला सांगतो की तू 'दादां'च्या नावाने प्रतिक्रमण कर किंवा महावीर भगवानांच्या नावाने प्रतिक्रमण कर, की 'हे भगवंता, मला हा चोरीचा धंदा करायचा नाही पण तरीही करावा लागतो. त्याची मी क्षमा मागतो.' अशाप्रकारे क्षमा मागत रहा आणि धंदाही करीत रहा. जाणूनबुजून करू नकोस. जेव्हा तुला आतून इच्छा होईल की 'आता मला हा चोरीचा धंदा करायचा नाही' त्यानंतर तू ते बंद कर. तुझी इच्छा आहे ना, धंदा बंद करण्याची? पण तरीही आतून धक्का लागला आणि करावा लागला, तर देवाची माफी माग. बस, एवढेच! दुसरे काही करायचे नाही.
चोराला असे सांगू शकत नाही की 'उद्यापासून धंदा बंद करून टाक. असे सांगितल्याने काहीही निष्पन्न होणार नाही. असे चालणारच नाही ना! 'हे सोडून द्या, ते सोडून द्या' असे म्हणूच शकत नाही. आम्ही काहीही सोडायचे सांगतच नाही, या पाचव्या आयात (कालचक्राचा बारावा भाग) सोडण्याचे सांगण्यासारखेच नाही. तसेच असेही सांगण्यासारखे नाही की हे ग्रहण करा. कारण की सोडल्याने सुटेल असेही नाही.
हे विज्ञान बिलकूल अपरिचित वाटते लोकांना! कधी ऐकलेले नाही, पाहिलेले नाही, जाणलेले नाही! आत्तापर्यंत तर लोकांनी काय म्हटले? की हे वाईट कर्म सोडा आणि चांगले कर्म करा. पण त्याच्यात सोडण्याचीही शक्ति नाही आणि बांधण्याची शक्तिही नाही आणि उगाचच गात रहातात की, 'तुम्ही असे करा.' तेव्हा तो सांगतो की, 'माझ्याकडून होत नाही, मला सत्य बोलायचे आहे पण बोलले जात नाही.' तेव्हा आम्ही नवीन विज्ञान शोधून काढले. 'भाऊ, तुला असत्य बोलण्यास हरकत नाही ना? ते तर तुला जमेल ना? तर आता जेव्हा असत्य बोलशील तेव्हा इतके मात्र कर, त्याचे तू अशाप्रकारे प्रतिक्रमण कर.' चोरी केली तर लोक त्याला सांगतात, 'नाही, चोरी करणे तू बंदच कर.' पण हे कसे