________________
सत्य-असत्याचे रहस्य
दादाश्री : कलियुगाची शास्त्रे आता लिहीली जातील, की जरी तुझ्या आचारात-विचारात - उच्चारात खोटेपणा असेल, पण आता मात्र तू नवीन योजना आख. यास धर्म म्हटले जाते. आत्तापर्यंत असे सांगत होते की तुझे आचार, विचार आणि उच्चार सत्य आहेत आणि ते पुन्हा असेच विशेष होईल अशी तू योजना आख. ती सत्युगाची योजना होती. म्हणून तेव्हा पुन्हा नवीन तसेच्या तसे विशेष होत असे, आणि तेव्हापासून ते वाढत जाते. आणि आता या कलियुगात वेगळ्याच प्रकारे सर्व शास्त्रांची रचना होईल आणि ते सर्वांना हेल्पही करतील. आणि पुन्हा (ती शास्त्रे) काय सांगतील ? की ‘तू चोरी करतोस, त्याची मला हरकत नाही, आणि ‘हरकत नाही' असे जर म्हटले ना, तर ती गोष्ट तो पुस्तकात वाचायला बसेल. आणि ‘चोरी करू नये' असे लिहिलेले पुस्तक फळीवर ठेवून देईल. माणसांचा स्वभाव असा आहे ! 'हरकत नाही' असे म्हटले की ते पुस्तक हातात घेतो. आणि पुन्हा म्हणेलही की ' हे वाचल्याने मला शांती वाटते!'
51
म्हणजे अशी शास्त्रे लिहीली जातील. हे तर आता मी जे बोलत आहे ना, त्यातून आपोआपच नवीन शास्त्रे लिहीली जातील. हे आता समजणार नाही, परंतु नवीन शास्त्रांची निर्मिती होईल.
प्रश्नकर्ता : इतकेच नाही, पण तुम्ही जी पूर्ण मेथड (पद्धत ) वापरली आहे ना, तो नवीन अभिगम आहे.
दादाश्री : हो नवीनच अभिगम होईल! लोक नंतर जुने अभिगम बाजूला सारुन देतील.
प्रश्नकर्ता : पण तुम्ही भविष्य वर्तवले, भविष्य कथन केले, की आता नवीन शास्त्रे लिहीली जातील. तर ती वेळ आता आली आहे का ? !
दादाश्री : हो, ती वेळ आलीच आहे ना ! वेळ परिपक्व होते तेव्हा तसे घडत राहते. वेळ परिपक्व झाल्याने आता सर्व नवीन शास्त्रे रचण्याची सगळी तयारी होत आहे !
जय सच्चिदानंद