________________
संपादकीय सत्याला समजण्यासाठी, सत्याला प्राप्त करण्यासाठी प्रत्येक परमार्थी जीव तोडून पुरुषार्थ करीत असतो. पण सत्य-असत्याची यथार्थ भेदरेखा न समजल्याने गोंधळून जातो. सत्, सत्य आणि असत्य, अशा तीन प्रकारे स्पष्टीकरण देऊन आत्मज्ञानी संपूज्य दादाश्रींनी सर्व गुंतागुंतीस सुलभतेने सोडवले आहे.
सत् म्हणजे शाश्वत तत्व आत्मा. आणि सत्य-असत्य हे तर व्यवहारात आहे. व्यवहार सत्य सापेक्ष आहे. दृष्टीबिंदच्या आधारे आहे. जसे मांसाहार करणे हे हिंदूंसाठी चुकीचे आहे पण मुस्लिमांसाठी ते बरोबर आहे. यात सत् कुठे आले? सत् सर्वांना स्वीकार्य असते. यात काही परिवर्तन होत नाही.
ब्रह्म सत्य आणि जगही सत्य आहे. ब्रह्म रियल सत्य आहे आणि जग रिलेटिव सत्य आहे. हा सिद्धांत देऊन दादाश्रींनी कमालच केली. ह्या जगाला मिथ्या मानणे कुणाच्याही मनास पटत नाही. प्रत्यक्ष अनुभवास येणाऱ्या वस्तुला मिथ्या कशाप्रकारे मानू शकतो?! तर मग खरे काय? ब्रह्म अविनाशी सत्य आहे आणि जग विनाशी सत्य आहे! त्यामुळे इथे समाधान होऊन जाते.
मोक्षमार्गात सत्याची अनिवार्यता किती? जिथे पुण्य-पाप, शुभअशुभ, सुख-दुःख, चांगल्या-वाईट सवयी यांसारख्या अनेक द्वंदांचा अंत येतो, जिथे रिलेटिवला स्पर्श करणारा एक परमाणू सुद्धा राहत नाही, अशा द्वंद्वातीत दशेत, ‘परम सत् स्वरुपात', जगाने मानलेले 'सत्य' किंवा 'असत्य' कितपत 'खरे' ठरते? जिथे रियल सत् आहे तिथे व्यवहारातील सत्य किंवा असत्य ग्रहणीय किंवा त्याज्य न होता निकाली होतात, ज्ञेय स्वरुप बनतात!
संसार सुखाची कामना आहे तोपर्यंत व्यवहार सत्याची निष्ठा आणि असत्याची उपेक्षा गरजेची आहे. चुकून असत्याचा आश्रय घेतला तर तिथे 'प्रतिक्रमण' रक्षक बनते. पण जिथे आत्मसुखाच्या प्राप्तीची आराधना