________________
12
सत्य-असत्याचे रहस्य
'मी चंदुभाऊ आहे' हे नावाच्या आधाराने खरे आहे, पण खरोखर 'तुम्ही कोण आहात' ह्या आधाराने खोटे आहे. खरोखर तुम्ही कोण आहात हे जर जाणून घेतले तर तुम्हाला वाटेल की हे खोटे आहे. आणि तुम्ही 'चंदुभाऊ' कुठपर्यंत? तर जोपर्यंत तुम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही 'चंदुभाऊ' आणि 'ज्ञान' प्राप्त झाल्यानंतर वाटते की 'चंदुभाऊ' सुद्धा असत्य आहे.
सत्य, पण काळानुसार सत्य हे सापेक्ष आहे, पण जे सत् आहे ते निरपेक्ष आहे, त्यास कोणतीही अपेक्षा लागू होत नाही.
प्रश्नकर्ता : सत् आणि सत्यात दुसरा काय फरक असेल?
दादाश्री : सत्य विनाशी आहे आणि सत् अविनाशी आहे. दोन्ही स्वभावाने वेगळे आहेत. सत्य हे जगाला लागू होते, व्यवहाराला लागू होते आणि सत् हे निश्चयाला लागू होते. म्हणून व्यवहाराला जे सत्य लागू होते ते विनाशी आहे. आणि सच्चिदानंदचे सत् हे अविनाशी आहे, परमनन्ट आहे. बदलू शकतच नाही, सनातन आहे. जेव्हा सत्य तर वेळोवेळी बदलत राहते, त्यास पालटण्यास वेळ लागत नाही.
प्रश्नकर्ता : म्हणजे सत्य हे आपल्या दृष्टीने सनातन नाही?
दादाश्री : सत्यही सनातन वस्तू नाही, सत् हे सनातन आहे. हे सत्य तर काळाच्या आधाराने बदलत राहते.
प्रश्नकर्ता : हे कशा प्रकारे? जरा समजवा.
दादाश्री : काळानुसार सत्य बदलते. भगवान महावीरांच्या काळात जर कधी भेसळ केली ना, तर लोक त्यांना ठार मारुन जाळून टाकायचे. आणि आता? हा काळ तर असा आला आहे, की सगळीकडे भेसळ केलेलेच मिळत असते ना?! म्हणजे हे सत्य नेहमी बदलतच राहणार. ज्यास पूर्वीचे लोक बहुमूल्य वस्तू मानत होते, त्यास आपण निरर्थक समजून फेकून देतो. पूर्वीचे लोक ज्यास सत्य मानत होते त्यास आपण