________________
सत्य-असत्याचे रहस्य
सत्य आवडत असेल तर त्यातच खुष राहा. आणि जर हे आवडत नसेल तर ह्या रियल सत्यात या.
4
व्यक्ति-व्यक्तिंचे भिन्न सत्य
प्रश्नकर्ता : सत्य प्रत्येकाचे वेगवेगळे असते का ?
दादाश्री : सत्य प्रत्येकाचे वेगवेगळे असते, पण सत्याचा प्रकार एकच असतो. हे सर्व रिलेटिव सत्य आहे, हे विनाशी सत्य आहे.
व्यवहारात सत्याची गरज आहे, पण ते सत्य निरनिराळे असते. चोर म्हणेल, 'चोरी करणे हे सत्य आहे. ' लबाड म्हणेल, 'लबाडी करणे हे सत्य आहे.' आपापले सत्य वेगवेगळे असतात. असे घडते की नाही ?
प्रश्नकर्ता : घडते.
दादाश्री : ह्या सत्याला भगवंत सत्य मानतच नाहीत. इथे जे सत्य आहे ना, ते तिथे सत्य धरले जात नाही. कारण, हे विनाशी सत्य आहे, रिलेटिव सत्य आहे. आणि तिथे तर हे रिलेटिव चालणार नाही, तिथे तर रियल सत्य पाहिजे.
सत्य आणि असत्य हे दोन्ही द्वंद्व आहेत, दोन्ही विनाशी आहते. प्रश्नकर्ता : तर 'सत्य आणि असत्य' हे आपण स्वत:च मानून घेतले आहे का ?
दादाश्री : सत्य आणि असत्य हे आपल्याला मायेमुळे दिसत असते की 'हे खरे आणि हे खोटे.' आणि पुन्हा हे 'सत्य आणि असत्य' सर्वांसाठी सारखे नाही. तुम्हाला जे सत्य वाटते ते दुसऱ्याला असत्य वाटते. ह्यांना जे असत्य वाटत असेल ते दुसऱ्यांना सत्य वाटते. अर्थात् सर्वांचे (मत) एकसारखे नाही. अरे, चोर काय म्हणतात की, 'भाऊ, चोरी करणे हा तर आमचा धंदा आहे. त्यात तुम्ही आमची निंदा का करता? आणि आम्ही तुरुंगातही जातो पण त्यात तुम्हाला का खटकते ? ! आम्ही आमचा धंदा करीत आहोत.' चोर, ही सुद्धा एक 'कम्युनिटी' (समाज) आहे. एक आवाज आहे ना, त्यांचा! खाटीक स्वतःचा धंदा करत असेल तर तो