________________
सत्य-असत्याचे रहस्य
बाकी त्याचे नाव गुजराती भाषेत 'सापेक्ष' आहे. सापेक्ष शब्द ऐकला आहे का? तर सापेक्ष आहे की नाही हे जग ? ! हे जग सापेक्ष आहे आणि आत्मा निरपेक्ष आहे. सापेक्ष म्हणजे रिलेटिव, इंग्रजीत रिलेटिव म्हणतात. हल्लीचे लोक गुजराती भाषेचा सापेक्ष शब्द समजत नाही, म्हणून मी 'रिलेटिव' हा इंग्रजी शब्द बोलतो. तुम्ही चकीत झालात की काय ? !
3
दोन प्रकारचे सत्य आहे. एक रिलेटिव सत्य आहे आणि एक रियल सत्य आहे. रिलेटिव सत्य समाजाच्या आधीन आहे, कोर्टाच्या आधीन आहे. मोक्षासाठी ते उपयोगी पडत नाही. ते तुम्हाला 'डेवलपमेन्ट'चे साधन म्हणून उपयोगी पडेल, डेवलपमेन्टसाठी उपयोगी ठरते. आपले नाव काय ?
प्रश्नकर्ता : चंदुभाऊ.
दादाश्री : चंदुभाऊ हे रिलेटिव सत्य आहे. ते अगदीच खोटे नाही. ते इथे तुम्हाला ‘डेवलप' होण्यासाठी उपयोगी होते. पण जेव्हा स्वत: च्या स्वरुपाला ओळखायचे असेल, तेव्हा ते सत्य उपयोगी पडणार नाही. तेव्हा तर हे सत्य अगदीच खोटे ठरेल.
पुन्हा 'हे माझे सासरे आहेत' असे बोलतो, पण ते कुठपर्यंत बोलेल ? बायकोने 'डायवोर्स' घेतला नाही तोपर्यंत. हो, नंतर म्हणायला गेलो की 'माझे सासरे' तर ?
प्रश्नकर्ता : नाही म्हणू शकत.
दादाश्री : म्हणून हे सत्यच नाही. हे तर रिलेटिव सत्य आहे.
प्रश्नकर्ता: ' सासरे होते' असे म्हटले तर ?
प्रश्नकर्ता : 'होते' असे म्हटले तरी शिव्या देतील. कारण त्याचे डोके फिरले आहे आणि आपण असे म्हणाल, त्यापेक्षा मेरी भी चूप आणि तेरी भी चूप!
आता रिलेटिव सत्य रिलेटिवमधूनच उत्पन्न होते, असा नियम आहे. आणि रिलेटिव सत्य म्हणजे विनाशी सत्य. जर तुम्हाला हे सत्य, विनाशी